Home » ‘इतकी’ आलिशान आहे मुकेश अंबानींच्या मुलांची जीवनशैली, आहेत करोडोंचे मालक

‘इतकी’ आलिशान आहे मुकेश अंबानींच्या मुलांची जीवनशैली, आहेत करोडोंचे मालक

by Team Gajawaja
0 comment
Mukesh Ambani’s Children Lifestyle
Share

अंबानी कुटुंब वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकदा चर्चेत असते. मुकेश अंबानी (Mukesh Ambani’s Children Lifestyle) नुकतेच आशियातील पहिल्या क्रमांकाच्या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आले आहेत. तर दुसरीकडे अंबानी कुटुंबाची होणारी धाकटी सून राधिका मर्चंटही मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अरंगेत्रम संस्थेच्या सोहळ्यामुळे चर्चेत होती. अंबानी कुटुंबाप्रमाणे आलिशान जीवनशैली जगणे, प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. अंबानी कुटुंबात वेळोवेळी होणाऱ्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या संपत्तीबद्दल अशा गोष्टी पाहायला मिळतात, ज्या सर्वांना चकित करतात. 

जगातील टॉप १० श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी ६व्या क्रमांकावर आहेत. परंतु अशा श्रीमंत व्यक्तीच्या मुलांची जीवनशैली कशी असते, हे तुम्हाला माहिती आहे का? मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना तीन मुले असून, त्यांची नावे ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी आहेत. २०१८ मध्ये ईशा अंबानीचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले होते. त्याचवेळी आकाश अंबानी आणि श्लोका यांच्या लग्नाचीही देशभरात खूप चर्चा झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या धाकट्या मुलाची होणारी पत्नी राधिका मर्चंटचा अरंगेत्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता. तर चला जाणून घेऊया की, मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांची जीवनशैली कशी आहे. (Mukesh Ambani’s Children Lifestyle)

ईशा अंबानीची जीवनशैली 

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, अमेरिकेच्या येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि दक्षिण आशियाई अभ्यासात बॅचलर डिग्री मिळवली. अंबानी कुटुंबाने तिच्या लग्नात सुमारे १०० दशलक्ष डॉलर, म्हणजेच ७२० कोटी रुपये खर्च केले होते. लग्नानंतर ईशा पती पीरामलसोबत वरळी येथील गुलिटा नावाच्या बंगल्यात राहते. या बंगल्याची किंमत २०१२ मध्ये सुमारे ४५० कोटी रुपये होती, जो ईशा अंबानीचे सासरे अजय पीरामल यांनी त्यांच्या मुलगा-सुनेला लग्नात भेट म्हणून दिला होता.

ईशा अंबानीची एकूण संपत्ती

पालकांव्यतिरिक्त, ईशा अंबानीची एकूण संपत्ती सुमारे ६६८ कोटी रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अनेक कंपन्यांमध्ये ती महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. याशिवाय ईशा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अजियो फॅशन ऑनलाइन ब्रँडचीही मालकिण आहे. (Mukesh Ambani’s Children Lifestyle)

आकाश अंबानीची जीवनशैली 

ईशा अंबानीचा जुळा भाऊ आकाश अंबानी हा मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आहे. आकाश अंबानीने धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली. तो पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात गेला. आकाश अंबानीला खेळाची खूप आवड आहे. (Mukesh Ambani’s Children Lifestyle)

आकाश अंबानीची एकूण संपत्ती

आकाश अंबानीने प्रसिद्ध खेळाडूंच्या जर्सी आणि बॅटचा संग्रह केला आहे. २०१९ मध्ये आकाश आणि श्लोकाचे लग्न झाले. तो २७ मजली अँटिलियामध्ये पत्नीसोबत राहतो. आकाश अंबानीला वाहनांचीही खूप आवड आहे. त्याच्याकडे जगातील सर्वात महागडी कार बेंटले बेंटेगा, रेंज रोव्हर वोग, रोल्स रॉयस फॅंटम ड्रॉपहेड कूप, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज सीरीजची अनेक वाहने आहेत. आकाश रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये उच्च पदावर आहे आणि कंपनीचे अनेक मोठे प्रकल्प हाताळत आहे. (Mukesh Ambani’s Children Lifestyle)

===========

हे देखील वाचा – ‘पार्टी – गेट’ प्रकरण: बोरिस जॉनसन यांच्यासमोर आता नवं आव्हान 

===========

अनंत अंबानीची जीवनशैली 

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यानेही आपल्या भावंडांप्रमाणेच सुरुवातीचे शिक्षण धीरूभाई अंबानी स्कूलमधून केले आणि त्यानंतर आइसलँडमधील ब्राऊन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच अनंत अंबानीला दम्याचा त्रास आहे. औषधांमुळे त्याचे वजन खूप वाढले होते. १०८ किलो वजनाच्या अनंतने अवघ्या १८ महिन्यांत आपले वजन कमी करून सर्वांना चकित केले होते. (Mukesh Ambani’s Children Lifestyle)

अनंत अंबानीची एकूण संपत्ती

आजोबा धीरूभाई अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातील अनंत अंबानीचे भाषण चांगलेच व्हायरल झाले होते. ज्यामध्ये तो म्हणाला की, “रिलायन्स हे माझे जीवन आहे. माझे सर्वकाही रिलायन्ससाठीच आहे.” अनंत अंबानी हा त्याची आई नीता अंबानीसह मुंबई इंडियन्सचा सह-मालक आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बांधलेल्या ओबेरॉय हॉटेलने आपल्या हॉटेलचे नाव अनंत अंबानीच्या नावावर ठेवले आहे. याचे नाव हॉटेल ओबेरॉय अनंत विलास असे आहे. २०२० च्या अहवालानुसार, अनंत अंबानीची एकूण संपत्ती ७३.८ अब्ज डॉलर आहे. (Mukesh Ambani’s Children Lifestyle)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.