देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाने त्यांची भावी सून राधिका मर्चंटसाठी, मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अरंगेत्रम सोहळा आयोजित केला होता. ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेक मोठे उद्योगपती आले होते. अंबानी कुटुंबातील उत्सव नेहमीच हाय प्रोफाइल राहिले आहेत. मुलगी ईशा अंबानीचे शाही लग्न असो किंवा मोठा मुलगा आकाश अंबानीच्या लग्नाचा सोहळा. त्यांच्या कुटुंबात होणारा प्रत्येक कार्यक्रम देशाचे लक्ष वेधून घेतो. (Mukesh Ambani lifestyle and networth)
मुकेश अंबानींचा समावेश केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील अव्वल श्रीमंतांमध्ये होतो. अलीकडेच आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश होण्याचा मान पुन्हा एकदा मुकेश अंबानींना मिळाला. त्यांनी पुन्हा एकदा आशियातील नंबर वन अब्जाधीश होण्याच्या शर्यतीत गौतम अदानी यांचा पराभव केला. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ६.५ अब्ज डॉलरची झेप नोंदवली गेली असून, ते जगातील सर्वोच्च श्रीमंतांमध्ये पुन्हा सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. मुकेश अंबानी यांची कमाई, आलिशान जीवनशैली आणि एकूण संपत्ती याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मुकेश अंबानींचा आलिशान बंगला
मुंबई स्थित अँटिलियाचे नाव तुम्ही ऐकले असेलच. सोशल मीडियावर आलिशान घरांच्या फोटोंमध्ये तुम्हाला अँटिलियाचे फोटोही पाहायला मिळतील. अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे घर आहे. अँटिलिया हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. फोर्ब्सने आपल्या वेबसाईटवर सर्वोच्च अब्जाधीशांच्या २० आलिशान घरांच्या यादीत मुकेश अंबानी यांच्या घराला स्थान दिले आहे. अँटिलिया ही २७ मजली इमारत आहे, ज्याची रचना अतिशय सुंदर करण्यात आली आहे, जी आतूनही आकर्षक आहे. ४,००,००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले हे घर २०१० मध्ये पूर्ण झाले. अँटिलियाची किंमत सुमारे एक ते दोन अब्ज डॉलर्स आहे. (Mukesh Ambani lifestyle and networth)
मुकेश अंबानींच्या गाड्या
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आलिशान घरात करोडोंच्या गाड्यांचे कलेक्शन आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे तीन व्हॅनिटी व्हॅनसह जगातील सर्वात महागड्या कार आहेत. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये बेंटले, रोल्स रॉयस, मर्सिडीज बेंझसह विविध ब्रँडच्या गाड्यांच्या विविध मॉडेल्सचा समावेश आहे. (Mukesh Ambani lifestyle and networth)
मुकेश अंबानींचे खासगी विमान
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी अनेकदा परदेशात फिरत असतात. त्यांच्याकडे प्रवासासाठी वाहने तर आहेतच, पण त्यांच्याकडे आकाशात उडण्यासाठी स्वतःचे खासगी विमानही आहे. त्यांच्याकडे परदेशात किंवा भारतात प्रवास करण्यासाठी तीन हेलिपॅड आहेत. मुकेश अंबानी यांच्या कार आणि खासगी विमानाची किंमत सुमारे १०७ कोटी रुपये आहे. (Mukesh Ambani lifestyle and networth)
हे देखील वाचा: स्वतःच्याच करोडोंच्या मालमत्तेची माहिती महिलेला नव्हती; घर विकणार होती, तेव्हाच सापडला दडलेला खजिना
मुकेश अंबानींचे उत्पन्न
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या लक्झरी जीवनशैलीमागे त्यांचे भरमसाठ उत्पन्न आहे. आपल्या वार्षिक कमाईद्वारे मुकेश अंबानी संपूर्ण अंबानी कुटुंबाच्या लक्झरी जीवनशैलीची पूर्तता करतात. मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यानुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ५२ कोटी आहे. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानींची कंपनी ६ बिलियनपेक्षा जास्त वार्षिक कमाई करते. (Mukesh Ambani lifestyle and networth)
मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती
मुकेश अंबानी यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत तेल आणि वायू व्यवसाय आहे. ते रिलायन्स जिओमधूनही भरपूर कमाई करतात. आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश आणि जगात सहाव्या क्रमांकावर असलेल्या अंबानींची एकूण संपत्ती अलीकडेच १०४.७ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. ते त्यांच्या कमाईचा बराचसा पैसा जागतिक स्तरावर अनेक व्यवसायांमध्ये गुंतवतात. याशिवाय मुकेश अंबानी यांनी सुमारे १४,७०० कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक केली आहे.