Home » जेव्हा शक्तिशाली बादशहावर नूरजहां यांनी गाजवली होती आपली हुकूमत

जेव्हा शक्तिशाली बादशहावर नूरजहां यांनी गाजवली होती आपली हुकूमत

by Team Gajawaja
0 comment
Mughal Queen Nur Jahan
Share

मुघलांनी भारतावर जवळजवळ ३०० वर्ष राज्य केले. मुघल इतिहासात नूरजहां हिला सर्वाधिक शक्तिशाली महिलेचा दर्जा दिला गेला. नूरजहांने विशाल मुघल साम्राज्यावर एकटीने राज्य केले. इतिहास सांगतो की, मुघल सल्तनची सुत्रा आपल्या हाती अशीच आली नव्हती. त्यामागे सुद्धा काही कारणे होती. नूरजहां जेवढी कलाप्रेमी होती तेवढीच ती हुशार ही होती. आदमखोर वाघाची शिकार करुन गावकऱ्यांना बचाव करण्याची गोष्ट असो किंवा एकापेक्षा एक सुंदर-भव्य महल, कबर किंवा मकबरे अथवा मस्जिद बनवण्याची बाब असो. याच कारणामुळे नूरजहांचे किस्से भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशाच्या साहित्यात आज सुद्धा जीवंत आहे. (Mughal Queen Nur Jahan)

आता आपण पाहूयात त्या कथेची जी एक विधवा कशी मुघल साम्राज्याची कशी सर्वेसर्वा झाली आणि ज्याला पाहून लोक घाबरायचे त्याच्यावर त्याने कशी आपली हुकूमत चालवली याबद्दल अधिक.

शाही परिवाराशी कोणताही संबंध नव्हता
कथा त्या काळातील आहे जेव्हा महिला सर्वसामान्यपणे खुलेपणाने दिसून येत नव्हत्या. पडद्यांमागूनच त्यांचा आवाज ऐकू यायचा. धक्कादायक बाब अशी की, पुरुषांचे जेव्हा वर्चस्व होते तेव्हा आपला झेंडा फडकवणारी नूरजहां ही सामान्य परिवारातील होती. तिचा शाही परिवाराशी कोणताही संबंध नव्हता.

नुरजहांचे खरं नाव मेहरुन्निसा होता. नूरजहां ही अशी उपाधि आहे जी मुघल बादशाह जहांगीर सोबत लग्न केल्यानंतर मिळाली. नूरजहां हिचा जन्म १५७७ मध्ये कंधार येथे झाला होता. जो आज अफगाणिस्तानच्या नावाने ओळखला जातो. आई-वडिल फारसी होत आणि त्यांनी सफवी शासनाला कंटाळून इराण सोडून कंधारलाच आपले घर बनवले होते. विविध देशात राहण्याच्या कारणास्तव नूरजहां हिचे पालनपोषण विविध संस्कृती आणि परंपरांमध्ये झाले.

तिचे पहिले लग्न मुघल साम्राज्यासाठी काम करणारे अलीकुली खा याच्यासोबत झाले होते. असे म्हटले जाते की, अलीकुलीने एके दिवशी सिंहाची शिकार केली. त्याच्या बहादुरीच्या कारणास्तव मुघल बादशाहने त्याला शेर अफगान अशी उपाधी दिली. शेर अफघानची तैनाती मुघल साम्राज्याच्या बंगालमध्ये होती. त्यासाठी लग्नानंतर नूरजहां आपल्या नवऱ्यासह बंगालला गेली. तिने एका मुलीला जन्म दिला.

Mughal Queen Nur Jahan
Mughal Queen Nur Jahan

नवऱ्याच्या मृत्यू आणि इतिहासाला कलाटणी देणारा हिस्सा
एककाळ असा होता की, अकबरचा विश्वासू मानला जाणारा नूरजहां हिच्या नवऱ्यावर जहांगीरच्या विरोधात कट रचल्याचे आरोप लावले गेले. असे झाल्यानंतर जहांगीरने नूरजहांच्या नवऱ्याला आपल्या शाही दरबारात हजर होण्याचे आदेश दिले गेले. (Mughal Queen Nur Jahan)

याच गोष्टीवरुन बंगालचे गर्वनर आणि शेर अफगान यांच्यामध्ये झालेल्या युद्धात शेर अफगान याचा मृत्यू झाला. नवऱ्याच्या मृत्यूनंतर नूरजहां हिला जहांगीरच्या शाही महलात राहण्यासाठी जागा दिली गेली. १६११ मध्ये नौरेजच्या वेळी मीनाबाजार मध्ये जहांगीरने तिला पाहिले आणि त्याला ती आवडली. जहांगीरला तिच्यावर प्रेम जडले आणि आपली बेगम मानू लागला होता. कधी मेहरन्निसा म्हणून ओळखली जाणारी महिलेला आपली नूरजहां बेगमची उपाधि त्याने दिली.

मुघल साम्राज्याची सुत्र नूरजहांच्या हाती आली
तो असा काळ होता जेव्हा मुघल साम्राज्यात मोठे बदल होत होते. जहांगीरला आधीपासूनच दारु पिण्याची सवय होती. काही इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की, लग्नानंतर त्याची दारु पिण्याची सवय आणखी वाढली गेली. यामुळे त्याने राज्याकडे लक्ष देणे बंद केले. नूरजहांला मुघल साम्राज्याची कमान दिली गेली आणि तिलाच महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार दिले गेले. नूरजहांच्या शासनामुळे जहांगीरला कधीच त्रास झाला नाही. एक काळ असा ही आला की, मुघल साम्राज्याच्या आदेशात नूरजहांचा हस्तक्षेप दिसून येऊ लागला. त्यामुळे स्पष्टपणे पुष्टी होत होती की, कशी नूरजहां आपला दबदबा वाढवत आहे.

हे देखील वाचा- २० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी तब्बल ३० वर्ष कायद्याची लढाई, राजघराण्याची वाचा ही कथा

दबदबा ऐवढा वाढला की पुरुषांसाठी बनवलेल्या हॉलमध्ये बैठक झाली
मुघल साग्राज्यात वेगाने नूरजहांचा दबदबा वाढत होता. वर्ष १६१७ मध्ये चांदीच्या नाण्यांवर नूरजहां आणि जहांगीरचे नाव लिहिले गेले होते. त्या काळात शिक्क्यांवर महिलांचे नाव असणे म्हणजे फार मोठी गोष्ट होती. त्याचवेळी व्यापारी ते कोर्टाच्या रेकॉर्डर पर्यंत नूरजहां हिल विशेष दर्जा दिला जाऊ लागला.

इतिहासकार रुबी लाल हिने आपले पुस्तक ‘एप्रेंस: द अस्टोनिशिंग रेन ऑफ नूरजहां’ मध्ये एक असा किस्सा लिहिला आहे ज्यामध्ये नूरजहांच्या वाढत्या प्रभावाचे उदाहरण दिले गेले आहे. तिने असे लिहिले आहे की, नूरजहां आपल्या काळात शाही अंगणात आली होती जो फक्त पुरुषांसाठीच आरक्षित होता.

पुरुषांच्या जगात नूरजहांने आपला दबदबा वाढवला होता. शिकार करणे, आपल्या नावाची नाणी जारी करणे, इमारती आपल्या पसंदीनुसार डिझाइन करणे आणि शाही फरमान जाहीर करण्याचे अधिकार आपल्या हाती घेतले होते. ऐवढेच नव्हे तर गरिब महिलाांना मदत करणे ते मागास वर्गाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सुद्धा नूरजहांने मोठी भुमिका निभावली होती. जेव्हा जहांगीरला बंदी केले गेले तेव्हा बादशाहचा बचाव करण्यासाठी सैन्याची कमान सुद्धा तिने सांभाळली. त्यामुळे तिचे नाव मुघल इतिहासात सोनेरी अक्षरात लिहिले गेले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.