Home » १३ वेळा हल्ले केल्यानंतरही मुघल-इंग्रजांना जिंकता आला नाही लोहागढ

१३ वेळा हल्ले केल्यानंतरही मुघल-इंग्रजांना जिंकता आला नाही लोहागढ

by Team Gajawaja
0 comment
Mughal History
Share

मुघलांनी देशातील काही राज्यांवर आपला ताबा मिळवला होता. त्यांनी त्या राज्यांना लुटले सुद्धा. त्यानंतर इंग्रजांनी देशाला गुलाम बनवले. पण राजस्थान मधील लोहागढ किल्ला मात्र त्यांच्या हाती लागला नाही. या किल्ल्यावर १३ वेळा हल्ले केले पण दुश्मनांचा कधीच विजय झाला नाही. लोहगढची निर्मिती १७३३ मध्ये महाराजा सूरजमल यांनी केला होता. या निर्मितीसाठी जवळजवळ ८ वर्षांचा कालावधी लागला होता. या आठ वर्षात तो असा तयार केला गेला की, त्याचा एक भाग कोसळणे सुद्धा फार मुश्किल होते. (Mughal History)

इतिहासकार जेम्स टॉड याबद्दल असे सांगतात की, महाराजा सूरजमल यांनी लोहागड किल्ल्याची बांधणीसाठी माती तर वापरली पण त्यावेळी खास सामानचा सुद्धा वापर केला होता. या अजेय किल्ल्याला तयार करण्यासाठी चिक्कण माती, चुना, भुसा आणि गोबरचा वापर केला होता. हेच कारण होते की, जेव्हा दुश्मनांकडून यावर हल्ला केला जायचा तेव्हा किल्ल्याला काहीच व्हायचे नाही.

या किल्ल्याची बांधणी करताना अशी रणनिती तयार केली गेली की, कशा प्रकारे या किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी आलेल्या दुश्मनांना रिकाम्या हाती जावे लागेल. किल्ल्याच्या चारही बाजूला दरी तयार करण्यात आली होती. ती १०० फूट रुंद होती. जेणेकरुन दुश्मनांना ती पार करणे अधिकच मुश्किल होईल. ऐवढेच नव्हे तर दरी ६० फूट खोल होती. यामध्ये मगरी सुद्धा सोडण्यात आल्या होत्या.

महाराज सूरजमलने अशी व्यवस्था मुद्दामच केली होती. असे सांगितले जाते की, जेव्हा कधी आक्रमणाची स्थिती निर्माण व्हायची तेव्हा मगरींना खाणं टाकणं बंद करायचे. जेणेकरुन जर दुश्मन पाण्यात उतरल्यानंतर मगर त्यांना आपले खाणं बनवायचे. तसेच एखाद्या दुश्मनाने जरी दरी पार करुन भींतीवर चढण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा सद्धा त्याला मुश्किल व्हायचे. किल्ल्यावर असलेले रक्षक त्या दुश्मनावर हल्ला करुन त्याला खाली पाडायचे. (Mughal History)

हेही वाचा- भगवान शंकराचे ‘हे’ अनोखे समुद्री मंदिर…

लोहागढ पाडण्यासाठी इंग्रज आणि मुघलांनी यावर १३ वेळा हल्ले केले. इंग्रजांनी यावर हल्ला करण्यासाठी चार मोठे सैन्य तयार करत किल्ल्याला घेराव घातला. पण त्यात ही त्यांना अपयश आले. इतिहासकारांच्या मते, १८०५ मध्ये ब्रिटिश जनरल लार्क लेकने आक्रमण केले. पण या दरम्यान त्याच्या ३ हजार सैनिकांचा मृत्यू झाला. ऐवढ्या मोठ्या संख्येने सैनिकांचा मृत्यू पाहिल्यानंतर कधीच त्याची हिंम्मत झाली नाही की, तेथे ते जातील. हिंमत हरल्यानंतर लॉर्ड महाराजाजवळ येत करारासाठी सुद्धा विचारले. लोहागढं किल्ल्यासाठी काही गेट लावण्यात आले आहेत. त्याला विविध नावं दिली गेली आहेत. जसे की, अटल बंध गेट, नीमदा गेट. आता हे एक राष्ट्रीय स्मारक आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.