जेव्हा मुघलांच्या इतिहासाबद्दल लिहिले गेले तेव्हा हरम आणि बादशाहाच्या अय्याशीचे काही किसे ही त्यात लिहिले गेले. असा हरम ज्यामध्ये काही रहस्य दडलेली होती.इटालियन प्रवासी मनूची आणि डच व्यापारी फ्रांसिस्को पेलसर्टने हरम आणि मुघल बादशहांबद्दल अशा काही आपल्या आठवणी सांगितल्या की, ज्या खरोखर हैराणा करणाऱ्या होत्या. त्यांनी असे स्पष्टपणे लिहिले सुद्धा आहे की, मुघल बादशाह कशा प्रकारे भोग विलासात बुडालेले असायचे. फ्रांसिस्को पेलसर्टने असाच एक किस्सा मुघल बादशाह जहांगीर बद्दलचा लिहिला आहे. पेलसर्ट हळूहळू जहांगिरचे जवळचे मित्र झाले होते आणि त्यांना काही रहस्यात्मक गोष्टी सुद्धा कळल्या. (Mughal History)
फ्रांसिस्को पेलसर्टने मुघल बादशाहावर एक पुस्तक लिहिले आणि त्याला नाव दिले ‘जहांगीर इंडिया’. पुस्तकात असा खुलासा करण्यात आला आहे की, जहांगीर असा एक मुघल शासक होता ज्याने वयाच्या पंचवीसाव्या वयात २० लग्न केले होते. पुस्तकात तो भोग-विलासात बुडालेला बादशहा होता असे लिहिले आहे. त्याच्या हरममध्ये ३०० हून अधिक महिला होत्या. त्याच्या संपूर्ण आयुष्यात या महिलांची संख्या नेहमीच वाढत गेली.
जहांगीरच्या काळातील हरम किती भव्य होता याचा अंदाजा अशा गोष्टीवरुन लावता येतो की, त्याने आपल्या २० पेक्षा अधिक पत्नींच्या देखरेखीसाठी दास्यांची रांगच लावली होती. प्रत्येक पत्नीच्या देखभालीसाठी २० दास्या असायच्या. त्यांना प्रत्येक महिन्याला भत्ता दिला जायाचा. त्या त्याचा वापर सर्वाधिकपणे दागिने आणि कपड्यांवर करायच्या. याचे कारण होते बादशाह जहांगीर. त्या स्वत: सुंदर दिसाव्यात म्हणून नेहमीच प्रयत्न करायच्या. जेणेकरुन त्या बादशाहच्या नजरेस पडतील. त्याला आकर्षित करता येईल.
पेलसर्टने असे सुद्धा लिहिले आहे की, जहांगीर आपल्या बेगमला भेटण्यासाठी प्लॅन करायचा आणि त्यासाठी खास तयारी सुद्धा केली जायची. बेगमची खोली सुंदर सजवली जायची. अत्तरचा सुगंध सर्वत्र परसलेला असायचा. दास्या रेशमाच्या पंख्यांनी हवा घालायच्या. काही दास्या गुलाब जल शिंपडायच्या आणि महिलांनी घेरलेला बादशाह जहांगीर अफीम आणि उत्तेजिक करणाऱ्या गोष्टी आपल्या सोबत ठेवायचा. (Mughal History)
हेही वाचा- सुर्योदयापूर्वी उठून ‘हे’ काम करायचा अकबर
तर हरम मध्ये बेगमपेक्षा कोणती इतर दासी त्याला आवडायची तर तो तिच्यासोबत एक रात्र घालवायचा. जर ती जहांगीरला खुश करण्यास यशस्वी झाली तर तिला बक्षीस सुद्धा दिले जायचे. ती नेहमीच बादशाहाची लाडकी व्हायची. जर एखादी दासी बादशाहला खुश करू शकली नाही तर तिला कधीच त्याच्या समोर आणले जायचे नाही. हेच कारण होते की, दास्या मुघल बादशाहांना आवडायच्या आणि नाही सुद्धा. त्यांना नाखुश करण्यासाठी कोणतीही कसर त्या सोडायच्या नाहीत. भले त्यांना मासिक भत्त्यामधील पैसे दागिने आणि कपड्यांसाठी खर्च करावे लागले तरीही त्या आवर्जुन खरेदी करायच्या.