Home » राष्ट्रपतींनी मुघल गार्डनचे नाव बदलल्याने राजकीय वातावरण तापले

राष्ट्रपतींनी मुघल गार्डनचे नाव बदलल्याने राजकीय वातावरण तापले

by Team Gajawaja
0 comment
Mughal Garden
Share

देश-परदेशातून येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण बिंदू राहिलेल्या ऐतिहासिक मुघल गार्डनचे नाव बदलण्यात आले आहे. त्याचसोबत याची ओळखी आता बदलली जाणार आहे. या गार्डनला अमृत उद्यान या नावाने ओळखले जाणार आहे. अशातच नाव बदलल्याने राजकीय वातावरण तापले आहे. एका बाजूला भाजपने या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने याचा विरोध करत असे म्हटले की, देश हा असमंज्यस हातात गेला आहे. (Mughal Garden)

हे गार्डन सामान्य जनतेसाठी खुले होण्यापूर्वी ही घोषणा केली गेली. मुघल गार्डनची ओळख ही फार जुनी असून ती आता बदलली जाणार आहे. यामुळेच राजकरण तापले आहे. विरोधकांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यास सुरुवात केली आहे. नाव बदलण्यामागील कारण असे ही मुघलांचा केला जाणारा तिरस्कार असे बोलले जात आहे. काँग्रसने असे म्हटले की, भाजपला असे वाटते की, नाव बदलण्याने विकास होत आहे.यालाच विकास असे म्हणतात असे भाजपला वाटते.

Mughal Garden
Mughal Garden

कोणी काय म्हटले?
काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी असे म्हटले की, भाजप सरकारची ही सवय आहे रस्ते, शहरांची नावे बदलतात. आता गार्डनचे नाव ही बदलले. नाव बदलण्याच्या प्रथेवर हल्ला करत त्यांनी म्हटले की, नवे सरकार येईल ते सुद्धा नाव बदलेल. त्यानंतर आणखी एक सरकार येईल ते ही नावात बदल करतील. सरकारने आपले काम करावे, विकास करावा.

इस्लामिक स्कॉलर साजिद रशीदी यांनी सुद्धा नावात बदल केल्याच्या प्रकारावर निंदा केली आहे. त्यांचा असा आरोप आहे की, हिंदूंना खुश करण्यासाठी मुघल गार्डनचे नाव बदलले गेले. जर या सरकारला नावातच बदल करायचा होता तर त्यांनी खोटी आश्वासनं दिली नसती. जर असेच सुरु राहिले तर मोदी यांना महात्मा गांधी बनवले जाईल. एखादा समूह त्यांना राष्ट्रपती मानेल. हे नाव बदलण्यामधेच युद्ध सुरु होईल.

तर इतिहासकार फिरोज बख्त यांनी असे म्हटले की, आजादीच्या अमृत मोहत्सवाची वेळ आहे. याचा हवाला देत मुघल गार्डला अमृ उद्यानाचे नाव दिले गेले आहे. काही लोक याला इतिहासासोबत छेडछाड केल्याचे बोलले जात आहे. मात्र काहीजण असे ही मानत आहेत की, हे हे नामकरण धार्मिक प्रिझममधून पाहिले जाऊ नये.(Mughal Garden)

हे देखील वाचा- का सुरू आहे पीएम मोदी यांच्यावरील BBC डॉक्युमेंट्रीवरुन वाद…?

अमृत उद्यानाबद्दल थोडक्यात
राष्ट्रपती भवनात एकूण ५ गार्डन आहेत. त्यापैकीच एक मुघल गार्डन होते. त्याला आता अमृत उद्यानाने ओळखले जाणार आहे. १५ एकर विस्तारलेल्या या उद्यानात १३८ प्रकारची गुलाब, १० हजारांहून अधिक ट्युलिप आणि ७० विविध प्रजातिंचे जवजवळ ५ हजार हंगामी फुलं आहेत. याचे डिझाइन १९१७ मध्ये सर एटविन लुटियंस यांनी तयार केले होते.

अमृत उद्यानाला इंग्रजांनी उभारले. पण असे म्हटले जाते की, याचे डिझाइन हे ताजमहलाच्या येथील बागीचे आणि जम्मू-कश्मीरच्या बागेंपासून प्रेरित आहे. यामुळेच त्याला मुघल गार्डन असे म्हटले गेले. काही लोकांनी असा तर्क लावला की भारतातील एक मोठ्या लोकसंख्येसोबत भावनिक रुपात जोडले जाण्यासाठी इंग्रजांनी हे नाव ठेवले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.