Mufasa The Lion King : शाहरुख खानला बॉलिवूडमधील बादशाह म्हटले जाते. शाहरुखची तगडी फॅन फॉलोइंग आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुहाना खानने गेल्या वर्षी झोया अख्तरच्या सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. दुसऱ्या बाजूला आर्यनही एका सीरिजचे दिग्दर्शन करत आहे. शाहरुखच्या दोन्ही मुलांनी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले आहेत. आता तिसरा मुलगा अब्राहमनेही सिनेमातून डेब्यू करण्यास तयार आहे.
खरंतर, नुकत्याच मुफासा द लायन किंगचा ट्रेलर जारी करण्यात आला. या सिनेमाच्या पहिल्या पार्टला शाहरुख खान आणि आर्यन खानने आपला आवाज दिला होता. या प्रोजेक्टमध्ये अब्राहमला देखील संधी देण्यात आली आहे. शाहरुख आणि आर्यन मुफासा- द लायन किंगच्या हिंदी वर्नजमधील मुफासा आणि सिम्बाला आवाज देण्यासाठी तयार आहे. याशिवाय अब्रहाम देखील तरुण मुफासाला आपला आवाज देत डेब्यू करणार आहे. खरंतर, याबद्दल अधिकृत माहिती सिनेमाच्या हिंदी ट्रेलरमधून समोर आले आहे.
View this post on Instagram
द लायन किंग सिनेमा
वर्ष 2019 मध्ये हिंदीमध्ये डब करण्यात आलेल्या द लायन किंग मध्ये शाहरुखने आपल्या दमदार आवाजाने लाखो लोकांची मनं जिंकली होती. हुशार आणि दयाळू राजाची त्याची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती. आर्यन खानने सिम्बाच्या भूमिकेला आवाज दिला होता. (Mufasa The Lion King)