Home » MS Dhoni : लोकप्रियतेसोबतच कमाईच्या बाबतीतही आहे धोनी ‘सुपरकिंग’

MS Dhoni : लोकप्रियतेसोबतच कमाईच्या बाबतीतही आहे धोनी ‘सुपरकिंग’

by Jyotsna Kulkarni
0 comment
MS Dhoni
Share

आज, ७ जुलै २०२५ रोजी, भारतीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक, असलेल्या एमएस अर्थात महेंद्रसिंग धोनी त्याचा ४४वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटला धोनीने त्याच्या खेळाने एक वेगळेच वलय प्राप्त करून दिले. भारतीय क्रिकेट हे कायम ‘धोनी’ या नावाशिवाय अपूर्ण राहील. ‘तो आला त्याने पाहिले आणि तो जिंकला’ हे धोनीला अगदी चपखल सूट होणारे आहे. धोनी जरी आज निवृत्त झाला असला तरी त्याची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिग्गज क्रिकेटपटूने मैदानावर आपल्या चमकदार कामगिरीने मोठा नावलौकिक मिळवला आहे. (MS Dhoni)

मैदानावर शांत स्वभाव, अचूक निर्णय क्षमता आणि धडाडीच्या खेळींसाठी ओळखला जाणारा ‘कॅप्टन कूल’ आजही लोकप्रिय आहे. धोनीचे फॅन्स केवळ देशात नाही तर परदेशातही खूप आहेत. धोनीने त्याच्या आयुष्यात अफाट यश पाहिले. आज धोनी जरी क्रिकेट खेळत नसला तरी तो आयपीएलचे सामने खेळतो. त्यामुळे कायमच त्याच्या फॅन्सला आयपीएलची प्रतीक्षा असते. त्याला मैदानावर खेळताना पाहणे म्हणजे केवळ ‘सुख’ असते. त्याचा वर्ल्डकप फायनलचा तो हेलिकॉप्टर शॉट आजही एकही जणं विसरलेला नाही. धोनीने त्याच्या कारकिर्दीमध्ये खूपच यश पाहिले, प्रसिद्धी मिळवली, लोकप्रियता मिळवली यासोबतच त्याने प्रचंड संपत्ती देखील कमावली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनीची ब्रँड व्हॅल्यू टॉपलाच आहे. धोनी कोट्यवधी संपत्तीचा धनी आहे. आज धोनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया धोनीच्या एकूण संपत्तीबद्दल. (Todays Marathi HEadline)

MS Dhoni

धोनीने २००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धोनी त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये एकदिवसीय, टी२० आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारांचे क्रिकेट सामने खेळाला. यासोबतच त्याने या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे. २००७ टी-२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव भारतीय कर्णधार आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा विजेता देखील धोनीनेच बनवले आहे. (Top Headline)

धोनीची मुख्य कमाई जरी क्रिकेटमधून होत असली तरी तो यासोबतच इतर अनेक मार्गानी कोट्यवधींची कमाई करतो. धोनीचे अनेक मोठे व्यवसाय देखील आहेत. त्याने कपडे, हॉटेल आणि क्रीडा व्यवस्थापन कंपन्यांसह अनेक मोठ्या स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक केली आहे. महेंद्रसिंग धोनीचा रिती स्पोर्ट्स नावाच्या व्यवस्थापन कंपनीत हिस्सा आहे. ही क्रीडा व्यवस्थापन कंपनीद्वारे जगातील अनेक मोठ्या आणि दिग्गज खेळाडूंचे व्यवस्थापन हाताळते. यासोबतच धोनीने फॅशन, मनोरंजन आणि रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्याची कंपनी ‘धोनी एंटरप्रायजेस’ विविध स्टार्टअप्स आणि क्रीडा प्रकल्पांमध्ये सहभागी आहे. ‘रांची रेज’ हा हॉकी संघ, ‘धोनी स्पोर्ट्स’, शिवाय फिल्म प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातूनही धोनी बक्कळ कमाई करतो. (Marathi Top Headline)

MS Dhoni

ब्रँड एंडोर्समेंट, व्यवसाय, आणि इतर वैयक्तिक गुंतवणुकीतून धोनीचं वार्षिक उत्पन्न कोट्यवधींमध्ये आहे. अनेक प्रसिद्ध कंपन्यांसोबत तो ब्रँड पार्टनरशिप करतो. धोनी हा प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँड, Seven, चा मालक असून, धोनी जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो. त्याने त्याच्या मूळ गावी रांचीमध्ये माही रेसिडेन्सी नावाचे एक मध्यम श्रेणीचे हॉटेल देखील सुरु केले आहे. जे Airbnb, Oyo आणि MakeMyTrip सारख्या लोकप्रिय हॉस्पिटॅलिटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. (Marathi Trending News)

धोनीची एकूण संपत्ती सध्या १२० मिलियन डॉलर्सहून अधिक म्हणजेच जवळपास १००० कोटींहून जास्त आहे. आयपीएलमध्ये १८ सीझन खेळलेला माही, या लीगमधून २०४ कोटींपेक्षा अधिक कमावतो. २०१८ ते २०२१ दरम्यान त्याचा वार्षिक पगार १५ कोटी होता, तर २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्याला ४ कोटींना रिटेन केले. त्याची ब्रँड व्हॅल्यू २०२५ मध्ये ८०३ कोटींवर होती. ज्यातून तो दरवर्षी किमान ५० कोटी कमावतो. त्याने प्रॉपर्टीमध्ये देखील मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. त्याच्याकडे रांचीमधील फार्महाऊससोबतच रांची, पुणे, देहरादून, मुंबई आणि दुबईमध्येही घरे आहे. रांचीच्या फार्महाऊसमध्ये त्याने घोड्यांपासून ते ऑर्गेनिक शेतीपर्यंत अनेक गोष्टींची व्यवस्था केली आहे. (Marathi Top News)

=============

हे ही वाचा : 

China : 60 लाख गाढवांची कत्तल करुन चीन करतो काय !

=============

धोनीच्या लक्झरी गाड्या
धोनीकडे लक्झरी कार्स आणि बाईक्सचा मोठा संग्रह आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये Rolls Royce, Ferrari, Audi Q7, Hummer H2, Jeep Grand Cherokee, Pontiac Firebird यांसारख्या अनेक लक्झरी ब्रँड्सच्या गाड्या आहेत. त्याचप्रमाणे, त्याच्याकडे अनेक सुपर बाईक्स देखील आहेत. कावासाकी निंजा H2, डुकाटी 1098, यामाहा RD350 आदी अनेक महागड्या ब्रँडच्या बाइक्स आहेत. (Top Stories)

धोनीने बंगळुरूमध्ये एमएस धोनी ग्लोबल स्कूल देखील उघडले आहे, जी सीबीएसई इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. मायक्रोसॉफ्टच्या सत्या नाडेला यांच्याशी भागीदारी करून धोनीची ही शाळा विद्यार्थ्यांना एक अनोखा शैक्षणिक अनुभव प्रदान करते. त्याचवेळी, धोनीने पेय ब्रँड आणि चॉकलेट कंपनी 7इंक ब्रूजमध्येही मोठी गुंतवणूक केली असून धोनीच्या सिग्नेचर हेलिकॉप्टर शॉटपासून प्रेरित होऊन त्यांनी कॉप्टर 7 लाँच केले. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.