Home » सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार हे 3 मोठे सिनेमे

सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार हे 3 मोठे सिनेमे

वर्ष 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा एक धमाकेदार सिनेमे रिलीज झाले आहेत. यामध्ये स्री-2 सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यात कोणते धमाकेदार सिनेमे रिलीज होणार याबद्दल सविस्तर...

by Team Gajawaja
0 comment
Movies Release on September
Share

Movies Release in September : वर्ष 2024 मध्ये गेल्या काही महिन्यांआधी इंडस्ट्रीमध्ये दिग्गज कलाकारांचे काही सिनेमे प्रदर्शित झाले. या सिनेमांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. अशातच येत्या सप्टेंबर महिन्यात तीन टॉप सिनेमे समोर येणार आहेत. दरम्यान, सिनेमातील स्टार कास्ट ते कथेमध्ये मोठे बदल दिसून येणार आहेत. जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यात बॉक्स ऑफिसवर कोणते सिनेमे प्रदर्शित होणार याबद्दल अधिक….

द बकिंघम मर्डर
करिना कपूरचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘द बकिंघम मर्डर’ सिनेमा येत्या 13 सप्टेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमात ऐश टंडन, रणवीर बरार, कीथ एलन आणि करिना कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

इमरजेंसी
वर्ष 1975 मध्ये भारतात लावण्यात आलेल्या इमरजेंचीच्या काळावर आधारित असणारा कंगना राणौतचा आगामी सिनेमा ‘इमरजेंसी’ रिलीज होणार आहे. सिनेमा प्रेक्षकांना 6 सप्टेंबरपासून सिनेमागृहांमध्ये पाहता येणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन कंगना राणौतने केले आहे. कंगनाव्यतिरिक्त सिनेमात श्रेयस तळपडे, अनुपम खेर, मिलिंद सोमण आणि महिला चौधरी झळकणार आहे.

देवरा पार्ट-1
ज्युनियर एनटीआर स्टारर ‘देवरा पार्ट-1’ सिनेमा येत्या 27 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. सिनेमात ज्युनियर एनटीआरसह हिंदी सिनेमातील अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सैफ अली खान झळकणार आहे. (Movies Release in September)

हे देखील सिनेमे होणार रिलीज
या तीन सिनेमांव्यतिरिक्त बॉक्स ऑफिसवर ‘हॅप्पी टीचर्स डे’, ‘द इमोर्टल’, ‘अश्वत्थामा’, ’26 ब्लॅक नोव्हेंबर’, ‘हवा सिंह’, ‘इति’ असे सिनेमे रिलीज होणार आहेत. याशिवाय राजकुमार रावचा सिनेमा ‘सेकंड इनिंग’, रितेश देशमुखचा ‘विस्फोट’, प्रभासचा ‘स्पिरिट’ आणि अनुष्का शर्माचा ‘चकदा एक्सप्रेस’ प्रदर्शित होणार आहे.


आणखी वाचा :
अभिनयाआधी एकेकाळी कॉफी शॉपमध्ये काम करायची श्रद्धा कपूर
‘मी जिवंत आहे’ श्रेयस तळपदेने केली संतापजनक पोस्ट

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.