Home » इंटरनेटवरुन सिनेमा डाउनलोड करणे किंवा डाउनलोडिंग वेबसाइट चालवणे बेकायदेशीर असते का?

इंटरनेटवरुन सिनेमा डाउनलोड करणे किंवा डाउनलोडिंग वेबसाइट चालवणे बेकायदेशीर असते का?

by Team Gajawaja
0 comment
Movie download
Share

जेव्हा कधी एखादा नवा सिनेमा प्रदर्शित होतो त्यावेळी बहुतांश लोक तो सिनेमा डाऊनलोड कुठून करता येईल याचे मार्ग शोधत असतात. अशातच सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याची पायरसी केल्यास सिनेमाला मोठा फटका बसतो. मात्र नवा सिनेमा अगदी सहजच इंटरनेटवरील विविध वेबसाइटवर उपलब्ध होते. त्यामुळे सिनेमा एकदा डाउनलोड केल्यानंतर त्याची लिंक किंवा व्हिडिओ हा अगदी सहज एकमेकांना शेअऱ केला जातो. मात्र इंटरनेटवरुन सिनेमा डाउनलोड करण्यासंबंधित काय नियम आहेत ते पाहू. पण जो व्यक्ती असे करतो तो हे काम बेकायदेशीररित्या करत असतो. त्याचसोबत असा ही प्रश्न उपस्थितीत राहतो की डाउनलोड केलेला सिनेमा पाहणे हे बेकायदेशीर आहे का ? इंटरनेटवर सिनेमा डाउनलोड (Movie download) संबंधित काय नियम आहे त्याबद्दल सर्वकाही आपण येथे जाणून घेऊयात.

तुम्हाला माहिती असेल जर एखादा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे आपल्याला जेव्हा कळते तेव्हा काही वेबसाइटची नाव सर्वात वरती असतात. अशातच सरकारने अशा पद्धतीच्या काही वेबसाइटवर बंदी घातली आहे. जेथे पायरेटेड सिनेमे अगदी सहज मिळतात आणि तेथून डाउनलोड करता येतात. त्यामुळे अशा प्रकारच्या वेबसाइट विविध पद्धतीने चालवणे आणि तेथून सिनेमे डाउनलोड करणे धोकादायक असू शकतो. हे करणे बेकायदेशीरच आहे.

Movie download
Movie download

पायरेटेड सिनेमा पाहणे बेकायदेशीर आहे?
टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, याचे उत्तर काही वर्षांपूर्वी बॉम्बे हायकोर्टने आपल्या निर्णयात दिले होते. त्यावेळी कोर्टाने असे म्हटले होते की, या प्रकारचे कंन्टेट पाहणे कोणताही अपराध नाही. पण कोर्टाने असे ही स्पष्ट केले होचे की, याचे सार्वजनिक रुपात वितरण आणि विक्री किंवा भाड्याने देणे हा अपराध आहे. असे करण्यासाठी कंन्टेटच्या मालकाची परवानगी घ्यावी लागते आणि त्यानंतर तुम्ही हे काम करु शकता.

हे देखील वाचा- चित्रीकरणादरम्यान बाल कलाकारांचे होत होते हाल; NCPCR ने जारी केली नवीन मार्गदर्शक तत्त्वे

दरम्यान काही वर्षापूर्वी इंटरनेटवर मॅसेज जाहीर केले जात होते की, पायरेटेड कंन्टेंट पाहणे, डाउनलोड करणे किंवा दाखवणे कॉपीराइट कायदा, १९५७ च्या विविध कलमाअंतर्गत अपराधाच्या रुपात दंडनीय आहे. मात्र त्यानंतर हायकोर्टाने असे म्हटले होते की, असे कंन्टेंट पाहणे बेकायदेशीर नाही आहे.(Movie download)

तुम्ही डाउनलोड करु शकता का?
सिनेमा डाउनलोड करणे याबद्दल आपण स्पष्टपणे बोलू शकत नाही. कारण काही स्थिती आणि जुने निर्णय यावर निर्भर करतात. सिनेमा डाउनलोज करण्यासाठी ज्या काही वेबसाइट आहेत त्यापैकी काहींकडे कंन्टेंट स्वतंत्र रुपात परवाना असल्याने ते दाखवू शकतात. त्यामुळे तुम्हाला असे करण्याची परवानगी आहे आणि तुम्ही डाउनलोड करु शकता. मात्र काही कंन्टेंट हे कॉपीराइटमुळे डाउनलोड करता येत नाहीत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.