तोंडात येणाऱ्या अल्सरमुळे काही खाता-पिता येत नाही. त्यामुळे असे झाल्यानंतर काही वेळेस आपली चिडचड होते. अल्सर येण्याची समस्या ही खासकरुन जेव्हा पोटातील गरमी आणि पित्त वाढते तेव्हा येते.काही वेळेस शरिरातील विटामीन बी ची कमतरता, लोहाची कमतरता, फुड इन्फेक्शन सारख्या आजारांमुळे सुद्धा होते. अशा स्थितीत लोकांना तोंडात अधिक जळजळ होण्यासह दुखते. त्याचसोबत काही खाल्लं तरी ते सहन होत नाही. अशावेळी तुम्ही औषधं घेण्यासह काही घरगुती उपायांनी सुद्धा अल्सर बरा करु शकतात. तर याच बद्दल अधिक जाणून घेऊयात.(Mouth Ulcers)
अल्सरची लक्षणं काय आहेत?
तोंडात अल्सर येण्यापूर्वी तुम्हाला घश्याच्या येथए, जीभेवर, ओठांवर किंवा ताळुच्या येथे दुखणे सुरु होते. अशावेळी तुम्हाला काही खाताना घश्याच्या येथे दुखते. त्याचसोबत अल्सरसचा रंग हा ग्रे, पिवळा किंवा सफेद असू शकतो. त्याच्या बाजूची कडा ही लाल रंगाची असते. अल्सर झाल्यानंतर तोंडात जळजळ होण्यास सुरुवात होते.
-गाईचे ताजं दुध
तोंडात आलेल्या अल्सरसाठी तुम्ही गाईचे कच्चे आणि ताजे दुध प्यावे. खरंतर गाईच्या दुधात एंन्टी माइक्रोबियल गुण असतात. असे मानले जाते की, ते इंफेक्शनला कमी करु शकतात. त्याचसोबत अल्सरचे दुखणे ही कमी होते आणि जळजळीपासून दिलासा मिळतो. त्यामुळे तोंडात आलेल्या अल्सरसाठी गाईचे ताजे दुध पिणे फायदेशीर ठरु शकते.

-मध लावा
मधाचे अनेक फायदे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे घरगुती उपायांपैकी मध हे अल्सरसाठी फायदेशीर ठरु शकते. मधात अँन्टीबॅक्टेरा असतात त्याचसोबत ते अँन्टी एलर्जीक सुद्धा आहे. अल्सरमुळे होणारी जळजळ ही मध लावल्याने कमी होते. त्यामुळे तुम्हाला जेव्हा तोंडात अल्सर येईल तेव्हा एक चमचा मध घेऊन ते सर्वत्र लावावे. काही वेळ मध तसेच ठेवा आणि नंतर पाणी प्या.(Mouth Ulcers)
-विड्याचे पान
विड्याचे पान हे तोंडात येणारे अल्सर कमी करतात. यामुळे माउथ इंन्फेक्शन होत नाही. या व्यतिरिक्त जळजळ ही यामुळे कमी होते. जेव्हा तुम्ही विड्याचे पान खडीसारखासोबत खातात तेव्हा तुमच्या पोटाला थंडावा मिळतो. त्यामुळे अल्सर आल्यानंतर विड्याचे पान हे खडीसाखरासोबत तुम्ही हळूहळू चावून खा.
हे देखील वाचा- महिलांनाच का होते अधिक थायरॉइडची समस्या? ‘या’ घरगुती उपायांनी करा उपचार
-ग्रीन टी
ग्रीन टी आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. त्यामुळे अल्सर आल्यानंतर ग्रीन टी चे सेवन करुन अल्सरच्या समस्येपासून तुम्हाला दिलासा मिळू शकतो.
-डेअरी प्रोडक्ट्स खा
दुधापासून बनवण्यात आलेले पदार्थ, जसे दही, दूध आणि पनीरचे सेवन करा. त्यामुळे विटामीन बी ची कमतरता भरुन निघेल.