Home » 18 जूनला लाँच होणार जगातील वुड फिनिश मोबाइल, जाणून घ्या खासियत

18 जूनला लाँच होणार जगातील वुड फिनिश मोबाइल, जाणून घ्या खासियत

मोटोरोला कंपनीचा नवा फोन येत्या 18 जूनला लाँच केला आहे. अशातत मोटोरोलाचा वुड फिनिश असणाऱ्या फोनची जोरदार चर्चा सुरु आहे. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

by Team Gajawaja
0 comment
Motorola New Smartphone
Share

Motorola New Smartphone : मोटोरोला कंपनीचा नवा फोन Edge 50 Ultra लवकरच लाँच केला जाणार आहे. फोनचा टीझर फ्लिपकार्टवर जारी करण्यात आला आहे. यावरुन कळते की, फोन 18 जूनला दुपारी 12 वाजता लाँच केला जाणार आहे. फोनची खासियत अशी की, हा जगातील पहिलाच असा फोन असणार आहे ज्याचे वुड फिनिश असणार आहे. म्हणजेच लाकडाचे डिझाइन असणारा फोन असेल. याशिवाय खास कटसह अॅल्यूमिनिअर फ्रेम दिली जाईल.

टीझरमध्ये स्पष्टपणे दिसून येतेय की, यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचे फीचर दिले जाईल. हा फोन स्मार्ट कनेक्ट फीचरही मिळमार आहे. याचा कॅमेराही धमाकेदार असणार आहे. मोटोरालाच्या नव्या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s झेन 3 चिपसेट दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय फोनमध्ये 1.5K रेजॉल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा pOLED डिस्प्ले दिला जाईल. स्क्रिनमध्ये 2500 निट्सचा मॅक्सिमम ब्राइटनेस आणि 100 टक्के DCI-P3 कलर गॅमेट कव्हरेज असण्याचा दावा केला आहे. (Motorola New Smartphone)

कंपनीने म्हटलेय की, मोटोरोला कंपनीचा Edge 50 Ultra स्मार्टफोन स्मार्ट फीचरसह येणार आहे. स्मार्ट कनेक्ट फीचरचा अर्थ असा आहे की, युजर्सला आपल्या पीसीवर अॅप स्ट्रिमिंग, टेक्स्ट आणि इमेज कॉपी/पेस्ट करण्यासह डिवाइसमध्ये डेटा शेअर करण्यासह फोनमध्ये वेबकॅमचा वापर करता येऊ शकतो. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे. कॅमेरा सिस्टिममध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजेंस अडॅप्टिव्ह स्टेबिलाइजेशन आणि 100x AI सुपर झूमसारखे आर्टिफिशिअल फीचरही मिळण्याची शक्यता आहे.


आणखी वाचा :
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X संदर्भात मोठे बदल, पोस्टला Like आलेले कळणार नाही
ऑनलाइन गुंतवणूक करण्याआधी व्हा अ‍ॅलर्ट! या लिंकवर क्लिक केल्यास होईल नुकसान

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.