Home » मोती साबण आणि दिवाळी नक्की कनेक्शन काय ?

मोती साबण आणि दिवाळी नक्की कनेक्शन काय ?

by Team Gajawaja
0 comment
Moti Soap And Diwali
Share

नुकताच नवरात्रोस्तव पार पाडला. पण जशी नवरात्र संपली, तशी आता सर्वांना ओढ लागलीये ती दिवाळीची. आता दिवाळी म्हटल्यावर फराळ आल्या, पणत्या आल्या, उटणं आलं आणि त्याचबरोबर आवर्जून येणारी गोष्ट म्हणजे मोती साबण. आज दिवाळी आणि मोतीसाबण हे जणू समीकरणच आहे. ‘‘उठा उठा दिवाळी आली. मोती स्नानाची वेळ झाली’’ असं म्हणत दिवाळीच्या मंगल पर्वाला जोडलेला अविभाज्य असा हा ब्रॅण्ड. त्याची कथादेखील तितकीच रंजक आहे . पण काय आहे ती स्टोरी? जाणून घेऊया. (Moti Soap And Diwali)

आपल्या लहानग्यांचा आवडता सण म्हटलं, कि पहिलं नाव तोंडावर येत ते म्हणजे दिवाळी ! हीच दिवाळी आणि मोती साबण हे एक समीकरणच आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘अलार्म काकांच्या जाहिरातीमुळे मोती साबणाबद्दल लोकांच्या मनात परत एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला आहे. दिवाळी आहे आणि नरकचतुर्दशीचे अभ्यंग स्नान करतांना मोती साबण नाहीये असं फार कमी मराठी घरात होत असावं. गोलाकार अस हा साबण सगळ्यांसाठीच फार खास आहे. सत्तरच्या दशकात टॉमको, अर्थात टाटा ऑइल मिल्सने मोती या साबणाची निर्मिती केली. हा साबण अनेक अर्थाने वेगळा होता. गुलाब, चंदन इत्यादी फ्लेवर्समध्ये उपलब्ध असलेल्या या साबणाने सुरुवातीपासूनच शाही थाट दाखवला. या साबणाने सतत स्वतःला उच्च आवडीनिवडीशी आणि मोती या संकल्पनेशी जोडून ठेवलं. चौकोनी वडय़ांच्या आकारात येणाऱ्या साबणांच्या काळात मोती आकाराने मोठा आणि गोल होता. (Social News)

मोती या नावाला साजेसा आकार त्याला जाणीवपूर्वक देण्यात आला होता. त्याची २५ रु किंमत त्याकाळाच्या तुलनेत अधिक होती. ऐंशीच्याा दशकातील मोती साबणाच्या प्रिंटेड जाहिरातीत समुद्रकिनारी भल्यामोठय़ा शिंपल्यात ठेवलेला मोती साबण कित्येकांना आठवत असेल. एकूण हा साबण बऱ्यापैकी लोकप्रिय होता. मात्र १९९३ साली टॉमको कंपनी हिंदुस्थान लिव्हर कंपनीत समाविष्ट झाली आणि हिंदुस्थान लिव्हरने हा साबण विशिष्ट प्रसंगी वापरायलाच हवा, अशा मंगल, उत्सवी, पवित्र संकल्पनेशी जोडला. पुढे दिवाळी आणि मोती हे नातं नव्वदीत दृढ झालं. पण मधल्या काळात या साबणावर फारसं लक्ष दिलं गेलं नाही. (Moti Soap And Diwali)

आणि २०१३ मध्ये ती जाहिरात आली. टिपिकल चाळीचं वातावरण, तिन्ही पिढय़ांचा जाहिरातीत केलेला वापर आणि मुख्य म्हणजे ‘‘उठा उठा दिवाळी आली’’ ही पंचलाइन. या सगळ्या गोष्टी ग्राहकांना मोती साबण ही आपली जणू एक परंपरा आहे असं दाखवण्यासाठी वापरण्यात आल्या, आणि तशी वातावरणनिर्मिती याद्वारे करण्यात आली. याच काळात सोशल मीडियाचा प्रभाव वाढला होता. त्यामुळे वर्षभर कुठेही न दिसणारा हा मोती साबण दिवाळीत मात्र तेजीत आला. एखादं उत्पादन जाहिरातीमुळे पुन्हा कसं चर्चेत येऊ शकतं, याचं मोती साबण हे उत्तम उदाहरण आहे. (Social News)

खरंतर मोती साबणाहून चंदनाचा साबण म्ह्णून दर्जा, सुगंध या दृष्टीने मैसूर सॅण्डल सोपचं स्थान अधिक वरचं आहे. सन १९१६ मध्ये मैसूरचे महाराज कृष्णराज वोडीयार चौथे यांनी दिवाण विश्वेश्वरय्या यांच्या मदतीने मैसूर सॅण्डलवूड ऑइल फॅक्टरी सुरू केली. पहिल्या महायुद्धामुळे परदेशी निर्यात होणारा चंदनाचा ओघ कमी झाला होता आणि इतक्या चंदनाचं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर त्यांनी या चंदन फॅक्टरीतून शोधलं. एका परदेशी हितचिंतकाने चंदनी साबण त्यांना भेट दिला. त्यातून मैसूर सॅण्डल सोपची कल्पना विकसित झाली. खर तर मोती साबणाहून चंदनाचा साबण म्ह्णून दर्जा, सुगंध या दृष्टीने मैसूर सॅण्डल सोपचं स्थान अधिक वरचं आहे. सन १९१६ मध्ये मैसूरचे महाराज कृष्णराज वोडीयार चौथे यांनी दिवाण विश्वेश्वरय्या यांच्या मदतीने मैसूर सॅण्डलवूड ऑइल फॅक्टरी सुरू केली. पहिल्या महायुद्धामुळे परदेशी निर्यात होणारा चंदनाचा ओघ कमी झाला होता आणि इतक्या चंदनाचं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर त्यांनी या चंदन फॅक्टरीतून शोधलं. एका परदेशी हितचिंतकाने चंदनी साबण त्यांना भेट दिला. (Moti Soap And Diwali)

त्यातून मैसूर सॅण्डल सोपची कल्पना विकसित झाली. वास्तविक अस्सल चंदनतेलापासून बनणारा हा जगातील एकमेव साबण आहे. पण त्याचा वापर दक्षिण भारतापुरता मर्यादित राहिला आणि त्याहीपेक्षा चाळिशीच्या आतल्या कस्टमरला आकर्षित करण्याचे प्रयत्न मैसूर सॅण्डल सोपकडून कमी पडले. म्हणूनच उत्तम दर्जा असूनही मोती साबणाप्रमाणे हवा निर्माण करण्यात मैसूर सॅण्डलला यश मिळाले नाही. मोती साबण मात्र वेगाने वर आला. थोडक्यात मैसूर सॅण्डलचं अपयश मोतीच्या पथ्यावर पडलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (Social News)

पण हे कितीही खर असलं तरीही मोती साबणाची आठवण ही दिवाळीतच का येते? हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. तर अभ्यंगस्नान हे उटण्याशिवाय केलं जात नाही. उटण ही एक सुवासिक आयुर्वेदिक पावडर आहे. आता अभ्यंगस्नान करतांना आधी उटण लावल जातंहे तर आपल्याला माहीतच आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आणि ९० च्या दशकांत बाजारात आलेल्या विविध साबणासमोर मोतीला तग धरण्यासाठी म्ह्णून या कंपनीने ‘उटण्या’ चा फ्लेवर असलेला साबण, अशी याची जाहिरात केली. त्यामुळे मोती साबण हा खास दिवाळीसाठीच तयार करण्यात आला आहे अशी लोकांची मानसिकताच झाली. आज मोती साबणाची क्रेझ महाराष्ट्रच नाही तर, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातही आहे. या राज्यांच्या काही भागात अभ्यंगस्नानाला खूप महत्व आहे. त्यामुळे या तीन राज्यात मोती साबणाला जास्त मागणी आहे. (Moti Soap And Diwali)

======

हे देखील वाचा :  अंबाजोगाईची योगेश्वरी देवी

======

एक काळ असा होता, जेव्हा कितीही हलाखीची परिस्थिती असली, तरी कोणतीही व्यक्ती दिवाळीच्या वेळेस मोती साबण विकत घेतांना विचार करायची नाही. दिवाळीच्या किराणा यादीत मोती साबण हा नेहमीच असायचा. आज उटणं, सुवासिक द्रव्य या सर्व गोष्टी अभ्यंगस्नानात आपापल्या परीने काम करत असूनही मोती साबणाशिवाय हे स्नान अपूर्ण वाटावं इतपत या ब्रॅण्डने दिवाळीशी घरोबा केला आहे. दिवाळी म्हणजे दिवे, दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे कंदील तसंच दिवाळी म्हणजे मोती साबण हि न सुटणारी नाळ आहे आहे. ९० च्या दशकातील प्रत्येकजण हा मोती साबणाकडे एक बालपणीची आठवण म्हणून बघतो आणि विकतही घेतो. मोती साबणाला एका वस्तूपेक्षा एक परंपरा म्हणून तोकांनी मान्य केलं आहे. आणि हि परंपरा अशीच सुरु राहणार यात काही वाद नाही ! मग ? तुम्ही दिवाळीच्या लिस्टमध्ये मोती साबण ऍड केला कि नाही ? (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.