Home » Mother’s Day : मदर्स डे चा इतिहास आणि त्याची सुरूवात कशी झाली?

Mother’s Day : मदर्स डे चा इतिहास आणि त्याची सुरूवात कशी झाली?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mother's Day
Share

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ खरंच आईविना प्रत्येक व्यक्ती पोरकी असते. आई आपल्यासोबत असते, आपल्या जवळपास असते तेव्हा तिची किंमत आपल्याला नसते. मात्र जेव्हा ती नसते तेव्हा आपल्याला तिची उणीव आणि तिची आपल्या आयुष्यातली खरी जागा लक्षात येते. आपण कितीही मोठे झालो तरी आईशिवाय आपले अस्तित्व कायम शून्य आहे. (Mother’s Day)

असे म्हटले जर की, मनुष्य या जगामध्ये सर्वच ऋण फेडू मात्र मातृ ऋण कधीच फेडू शकत नाही. खरे देखील आहे, कारण आई आपल्या गर्भामध्ये ९ महिने आपल्या बाळाला सांभाळते आणि प्रसूतीच्या अकल्पनीय अशा पीडा सहन करून बाळाला जन्म देते. या जगामध्ये बाळाला आणण्याचे संपूर्ण श्रेय आईलाच जाते. त्यामुळे आपण आपल्या आईचे मानू तितके आभार कमी आहे. मात्र आपण नेहमीच आपल्या आईला गृहीत धरतो. तिचे काम, तिच्या जबाबदाऱ्या, तिची कर्तव्य सर्वच गोष्टी ती प्रामाणिकपणे पार पाडत असते. मात्र आपण तिच्यासाठी कधीच काही खास करत नाही की, तिच्याशी दोन शब्द प्रेमाने बोलत नाही. (Marathi Top News)

कदाचित याचसाठी आपल्याला वर्षातला एक दिवस दिला असेल, ज्या दिवशी आपण आपल्या आईला ती आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे हे सांगू शकतो. हा दिवस असतो मदर्स डे. मदर्स डेच्या निमित्ताने एक दिवस आपण आपल्या आईसाठी नक्कीच काहीतरी करू शकतो तिला स्पेशल फील करून देऊ शकतो. आज ११ मे रोजी संपूर्ण जगामध्ये मदर्स डे साजरा होत आहे. या निमित्ताने जाणून घेऊया मदर्स डेचा इतिहास आणि माहिती. (MArathi LAtest News)

Mother's Day

मदर्स डे ची सुरूवात अमेरिकेत १९०८ मध्ये झाली. एना जार्विस (Anna Jarvis) नावाच्या महिलेने या दिवसाची सुरूवात केली. जार्विस यांचे त्यांच्या आईवर खूप प्रेम होते. त्यांच्या आई एक समाजसेविका होत्या. त्यांच्या आईच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी म्हणून आईसाठी एक विशेष दिवस सुरू करण्याचा निर्णय एना जार्विस यांनी घेण्याचे ठरवले. एना जार्विसने १९०८ मध्ये तीने मदर्स डे इंटरनॅशनल असोसिएशनची स्थापना केली. या असोसिएशनचा मुख्य उद्देश होता, तो मातांना आदर देण्यासाठी एक राष्ट्रीय दिवस साजरा करणे. एनाच्या प्रयत्नांमुळे १९१४ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुडरो विल्सन यांनी मदर्स डे ला एक राष्ट्रीय सुट्टी म्हणून मान्यता दिली. या दिवसाला युरोपमध्ये मदरिंग संडे असं म्हटले जाते. (Marathi Trending News)

एना जार्विस यांनी मदर्स डे या दिवसाची पायाभरणी केली असेल, परंतु मातृदिनाची औपचारिक सुरुवात ९ मे १९१४ रोजी झाली. अमेरिकन संसदेत कायदा केला आणि मे महिन्याच्या दुसऱ्या रविवार हा मदर्स डे साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस अमेरिका, युरोप आणि भारतासह अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. (Marathi Top News)

=======

हे देखील वाचा :  India : भारत-पाकमध्ये शस्त्रसंधी, जाणून घ्या शस्त्रसंधी म्हणजे काय?

=======

मदर्स डे हा दिवस १०० पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जातो, आणि प्रत्येक देशात हा दिवस साजरा करण्याची तारीख वेगळी असू शकते. विविध संस्कृती आणि परंपरांनुसार मातेसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या पद्धतीही भिन्न असू शकतात. तरीही, या दिवसाचे प्रमुख प्रतीक म्हणून सफेद कार्नेशन (White Carnation) फूल मानले जाते. सफेद कार्नेशन फूल मातांच्या प्रेमाचा आणि त्यागाचा प्रतीक म्हणून ओळखले जाते. (International News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.