साप पाहिला तरी आणि नावं काढले तरी आपल्याला भीती वाटते. तर सापाच्या विविध प्रजाती जगभरात आढळून येतात. काही साप विषारी तर काही साप बिनविषारी असतात. परंतु जगातील असा एक साप आहे त्याचा एक डंख सुद्धा १०० जणांचा जीव घेऊ शकतो. खरंतर हा साप ऑस्ट्रेलियात आढळून येतो. इनलँन्ड ताइपन असे त्याचे नाव असून त्याला जगातील सर्वाधिक विषारी साप मानले जाते. ऑस्ट्रेलियातील म्युझिमच्यानुसार, त्याला खतरनाक साप मानले जातो. तो आकाराने मध्ये ते लांबलचक असतोच आणि त्याचे डोकं हे आयताकृती असते. इनलँन्ड ताइपनचा सकाळच्या वेळेस शरिराच्या पुढील बाजू अधिक सक्रिय असते. (Most Poisonous Snake)
पहिल्यादा १८७९ मध्ये फ्रेडरिक मॅककॉय आणि नंतर १८८२ मध्ये विलियम जॉन मॅक्ले यांच्याद्वारे या सापाचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र पुढील ९० वर्षांपर्यंत हा वैज्ञानिकांसाठी एक रहस्यच होता. कारण त्याचा कोणताही नमूना मिळत नव्हता. १९७२ मध्ये पुन्हा त्याचा तपास घेई पर्यंत त्याच्या आधी त्याच्या बद्दल कोणालाच काही अधिक माहित नव्हते.
दुर्मिळ साप
ऑस्ट्रेलियाबाहेरील लोकांना या सापाबद्दल फार कमी माहिती आहे. तसेच तो अत्यंत दुर्मिळ साप ही आहे. कारण सकाळच्या दरम्यान त्याची दूरदृष्टी आणि जमीनीवर फक्त संक्षिप्त रुपात तो असतो. त्यामुळे पटकन तो दिसून येत नाही.
किती धोकादायक आहे त्याचे विष?
सापाचे विष हे LD50 च्या प्रमाणात मोजले जाते. हा साप अत्यंत विषारी आहे. स्कूल ऑफ केमिस्ट्री, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलच्या वेबसाइटनुसार, इनलँन्ड ताइपन हा सर्वाधिक घातक सापांच्या सुचीत सर्वात वरील स्तरावर आहे. स्कूल ऑफ केमिस्ट्रीच्या मते, एका बाइटसाठी ११०mg विष निघते. म्हणजेच त्याचा एक डंख सुद्धा जवळ १०० हून अधिक लोक किंवा २५०,००० उंदीर मारण्यासाठी पुरेसे आहे.(Most Poisonous Snake)
हे देखील वाचा- मध तयार करणारी मुंगी, अशा पद्धतीने करते काम
शांत स्वभावाचा असतो इनलँन्ड ताइपन
हा सर्वाधिक विषारी साप आणि एक सक्षम स्ट्राइक असणारा जरी असला तरीही तो शांत स्वभावाचा आहे. ज्याला त्रास होईल त्यापासून तो दूर राहतो. मात्र जर त्याला मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास किंवा त्याची जाण्यापासून वाट अडवली तर तो आपल्या संरक्षणासाठी समोरच्या व्यक्तीवर हल्ला करु शकतो.