भारत संपूर्ण जगात आपल्या अनोख्या कलाकृती, भव्य आणि सुंदर इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. येथील प्राचीन इमारती आणि त्यांची प्राचीन वास्तुशिल्प पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येत राहतात. भारताचा इतिहास आणि तेथील शिल्पकला सुद्धा परदेशी पर्यटकांना खुप भावतात. देशभरातील सर्व शहर आणि लहान-लहान जिल्ह्यांमध्ये मस्जिद असण्यासह काही अशी मस्जिद आहेत जी अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेत.अशातच भारतातील अशी काही मस्जिद आहेत जी सर्वाधिक सुंदर मानली जातात. याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात.(Most beautiful mosques in India)
भोपाळ मधील ताज-उल-मस्जिद
भोपाळ मधील ताज-उल-मस्जिदीला गुलाबी मस्जिद नावाने ओखळले जाते. याचे किंमती खडक हे सीरियातील मस्जिदीतून आणले गेले होते. या मस्जिदीला फार वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आले आहे. याची अनोखी बनावट पाहण्यासाठीच लोक दूरदूरवरुन येतात. ती अत्यंत सुंदर आणि आकर्षक असल्याचे सांगितले जाते. येथे इस्लामिक शिलाएं आणि विशाल मीनारे सुद्धा पहायला मिळतात.
अहमदाबाद मधील जामा मस्जिद
जामा मस्जिद भारतातील सर्वाधिक मोठी आणि प्रसिद्ध मशींदींपैकी एक आहे. ती बादशाह सुल्तान अहमद याने बनवली होती. जामा मस्जिदीचे सौंदर्य पाहण्यासाठी सुद्धा पर्यटकांची फार मोठी गर्दी होते. या मस्जिदीची खास गोष्ट अशी की, यामध्ये बादशाह सुल्तानाची राणी आणि मुलगी यांची कब्र आहे. याव्यतिरिक्त येथे इंडो-इस्लामिक वास्तुकला ही पाहण्यासारखी आहे.
बँगलोर मधील जुम्मा मस्जिद
जुम्मा मस्जिद सफेद रंगाच्या सुंदर खडकांपासून बनवण्यात आली आहे. जी १७९० मध्ये टीपू सुल्तानाला समर्पित करण्यात आली होती. येथे रमजानच्या महिन्यात लाखो लोक मन्नत मागतात ज्याची अधिक मान्यता आहे. तु्म्ही रमजानच्या महिन्यात येथे नक्की भेट देऊ शकता.
लखनौ मधील बडा इमामबाडा
लखनौ मधील मोठा इमामबाडा पाहण्यासह खुप मोठा सुद्धा आहे. ज्याला देशातील सर्वाधिक मोठ्या इमारतींमध्ये गणले जाते. या सुंदर आणि आकर्षक इमारतीला लखनवी वीटांपासून तयार करण्यात आले आहे.(Most beautiful mosques in India)
हे देखील वाचा- येथे वर्षात दोनदा बदलली जाते घडाळ्याची वेळ… पण का?
अजमेर स्थित अढाई दिन का झोपडा
अजमेर शरीफ दरगाह बद्दल आपण खुप जणांनी ऐकले असेल. येथे देशभरातील लाखो लोक मन्नत मागण्यासाठी आणि फिरण्यासाठी येतात. अढाई दिन का झोपडा खुप जुना आहे. त्याचे काही हिस्से खडकांसारखे दिसून येतात.