मच्छरांमुळे प्रत्येक वर्षाला बहुतांश आजार निर्माण होतात. यामुळे लोकांना जीव सुद्धा गमवावा लागतो. पावसाळ्यात आपण पाहतो की, डेंग्यूमुळे सुद्धा काही जणांचा मृत्यू होतो. पण गेल्या काही काळापासून मच्छरांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच त्यांना आपल्याला चावण्यापासून दूर ठेवणे सुद्धा मुश्किल असते. परंतु चीनने मच्छरांची संख्या कमी करण्यासाठी एक ठोस उपाय काढला आहे. त्यांनी अशातच चांगल्या मच्छरांच्या निर्मितीसाठी चक्क फॅक्ट्री सुरु केली आहे. जेणेकरुन आजार निर्माण करणाऱ्या मच्छरांची संख्या कमी करण्यास मदत करते. (Mosquitos Factory in China)
तुम्हाला ऐकून वाटेल चांगले मच्छर म्हणजे नक्की काय? खरंतर त्यांना चांगले मच्छर अशासाठी म्हटले जाते की, कारण ते आजार पसरवणाऱ्या मच्छरांची संख्या आपल्या पद्धतीने कमी करतात. हे काम चीनच्या एका रिसर्चनंतर सुरु करण्यात आले आहे. चीन मधील दक्षिण परिसरातील गुआंगझोऊ मध्ये फॅक्ट्री आहे जी या चांगल्या मच्छरांची निर्मिती करते. प्रत्येक आठवड्याला २ कोटी मच्छरांचे उत्पादन होते. हे मच्छर खरंतर बोलबेचिया बॅक्टेरियापासून संक्रमित असतात. याचा सुद्धा एक फायदा आहे.
चीन मध्ये आधी सुन येत सेत युनिव्हर्सिटी आणि मिशिगन युनिव्हर्सिटी मध्ये एका रिसर्ज मध्ये असे समोर आले की, जर बोलबेचिया बॅक्टेरिया संक्रमित मच्छर तयार केल्यास तर ते आजार पसरवणाऱ्या मच्छरांचा खात्मा करु शकतात. त्यांना बोलबेचिया मास्किटो असे सुद्धा म्हटले जाते. त्यांना आधी गुआंगझोऊ फॅक्ट्रीत ब्रीड केले जाते. नंतर जंगलात आणि खुप मच्छर असतील अशा ठिकाणी सोडले जाते. फॅक्ट्रीत तयार करण्यात आलेले मच्छर हे मादा मच्छरांच्या संपर्कात येऊन त्यांची प्रजनन क्षमता कमी करतात. नंतर त्या परिसरातील मच्छर कमी होऊ लागतात. यामुळेच आजार पसरण्यावर ही आळा बसतो.
मच्छर तयार करणारी चीन मधील ही फॅक्ट्री जगातील सर्वाधिक मोठी अशा प्रकारची फॅक्ट्री आहे. ती ३५०० वर्ग मीटरवर उभारण्यात आलेली आहे. यामध्ये ४ मोठे वर्कशॉप आहेत. प्रत्येक वर्कशॉपमध्ये प्रत्येक आठवड्याला ५० लाख मच्छरांची निर्मिती केली जाते. चीनमध्ये आजच नव्हे तर २०१५ पासून असे केले जात आहे.(Mosquitos Factory in China)
सर्वात प्रथम तर हे मच्छर केवळ गुआंगझोऊसाठी तयार केले जात होते. कारण येथे प्रत्येक वर्षी डेंग्यूचा पसार होतो. आता येथे मच्छरांवर खुप नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आता या फॅक्ट्रीतून मच्छरांची निर्मिती करुन चीनच्या दुसऱ्या ठिकाणी सुद्धा पाठवले जात आहेत. फॅक्ट्रीत निर्माण करण्यात आलेले मच्छर खुप आवाज करतात पण एका खास वेळेनंतर त्यांचा खात्मा होतो. यांच्यामुळे कोणत्याही प्रकारचा आजार पसरत नाही.
हे देखील वाचा- दोन देशांमध्ये कुत्रे ठरले वादाचे कारण….
फॅक्ट्रीत तयार करण्यात आलेले सर्व मच्छर नर असतात. लॅबमध्ये या मच्छरांच्या जीनमध्ये बदल केला जातो आणि चीनचा हा प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. अशातच ब्राझील मध्ये सुद्धा अशा प्रकारची फॅक्ट्री सुरु केली जाणार आहे. चीनच्या या फॅक्ट्रीत तयार करण्यात आलेल्या मच्छरांमुळे त्यांची संख्या ९६ टक्क्यांनी कमी झाली आहे.