Home » मस्जिदीत मुस्लिम नव्हे हिंदू अदा करतात ५ वेळा नमाज

मस्जिदीत मुस्लिम नव्हे हिंदू अदा करतात ५ वेळा नमाज

by Team Gajawaja
0 comment
Mosque
Share

मस्जिद हे मुस्लिम बांधवांचे प्रमुख धार्मिक स्थळ असल्याचे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. येथे अल्लाहच्या दरबारात आपल्या मनातील भावना प्रत्येक मुस्लिम बांधव व्यक्त करताना दिसतो. तसेच त्याचे आशीर्वाद आपल्यासोबत कायम रहावेत यासाठी नमाज अदा केली जाते. मुस्लिम बांधव हे दिवसातून ५ वेळा तरी नमाज अदा करतात. मात्र तुम्हाला माहितेय का आपल्या देशात अशी एक मस्जिद आहे तेथे मुस्लिम (Mosque) बांधव नव्हे तर चक्क हिंदूकडून पाच वेळची नमाज अदा केली जाते.

बिहार मधील नालंदा जिल्ह्यातील एका गावात हिंदू-मुस्लिम समाजातील ऐकतेचे धडधडीत उदाहरण आपल्याला दिसून येते. या गावात मस्जिद जरी असले तरीही येथे एकही मुस्लिम बांधव राहत नाही हे ऐकून तुम्हाला थोड विचित्र वाटेल पण हे खरंय. गावात असलेल्या या मस्जिदीत नियमानुसार पाच वेळची नमाज अदा करण्यासह अजान ही होते. या सर्व गोष्टी हिंदू समुदायातील लोकांकडून केल्या जातात.

mosque
Mosque where hindus perform 5 time prayers

नालंदा जिल्ह्यातील बेन प्रखंडच्या माडी गावात फक्त हिंदू धर्माचे लोक राहतात. पण येथे असलेल्या मस्जिदीची (Mosque) देखरेख ही येथील लोकच करतात. मस्जिदीची साफ-सफाई किंवा डागडुजीचे काम ही हिंदूंकडून केले जाते. हिंदु-मुस्लिम बांधवांमधील समानतेचे आणि आदराचे नाते येथे स्पष्टपणे दिसून येते. गावातील स्थानिक लोक असे सांगतात की, येथे काही वर्षांपूर्वी मुस्लिम परिवार राहत होते. परंतु हळूहळू त्यांचे पलायन झाले आणि मस्जिद त्याच ठिकाणी राहिले. आम्ही हिंदू असल्या कारणास्तव आम्हाला अजान येत नाही. मात्र ऑनलाईन पद्धतीने आम्ही अजान अदा करतो. गावकऱ्यांचे असे ही म्हणणे आहे की, हे मस्जिद आमच्यासाठी धार्मिक दृष्टीने फार महत्वाचे आहे. कोणतेही शुभ काम असो, हिंदू धर्मातील लोक या मस्जिदीत येऊन दर्शन घेतात.

====

हे देखील वाचा- केदारनाथ: बारा ज्योतिर्लिंग 

====

या मस्जिदीची निर्मिती कधी आणि कोणी केली याबद्दल काहीच माहिती नाही. मात्र स्थानिकांकडून असे सांगितले जाते की, त्यांच्या पूर्वजांनी असे म्हटले हे मस्जिद जवळजवळ २००-२५० वर्षांपूर्वीचे आहे. मस्जिदीच्या समोर एक समाधी सुद्धा आहे. तेथे लोक येऊन चादर अर्पण करतात. गावातील एका पंडितांनी असे सांगितले, मस्जिदीच्या नियमानुसार येथे सकाळ-संध्याकाळी साफसफाई केली जाते. हे सर्व येथील हिंदू धर्मियांकडूनच केले जाते. गावातील कोणत्याही परिवारात काही अशुभ घटना घडल्या तरीही लोक मस्जिदीत येऊन दुआ मागतात. माडी गावातील या मस्जिदीचे भले मुस्लिम समुदायाची नाते तुटले असले तरीही हिंदूंकडून त्याचा सन्मान आणि त्याची देखभाल उत्तम पद्धतीने केली जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.