Home » नकली कोर्ट चालवणारा नकली न्यायाधीश !

नकली कोर्ट चालवणारा नकली न्यायाधीश !

by Team Gajawaja
0 comment
Morris Samuel
Share

मिथिलेश कुमार नावाचा एक ठग भारतात होऊन गेला ज्याला लोकं नटवरलाल ज्यांने लोकांना नकली सरकारी अधिकारी बनून ताजमहाल, लाल किल्ला, राष्ट्रपति भवन आणि संसद भवन विकलं होतं. त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत सुपर नटवरलाल म्हणजेच धनीराम मित्तल नावाचा आणखी एक ठग होऊन गेला. या पठ्ठ्याने तर एका न्यायाधीशाला सुट्टी वर पाठवून स्वत: नकली न्यायाधीश बनून अनेक चोरांना जेल मधून मुक्त केलं होतं. आता या ठगांचा जमाना गेला आता मार्केटमध्ये नवीन नटवरलाल प्रो मॅक्स आला आहे. ज्याने गुजरात मध्ये स्वत:च्या कार्यालयात नकली कोर्ट चालवत होता. तुम्ही म्हणाल तो लाख नकली कोर्ट चालवेल पण त्याच्याकडे जात कोण असेल. तर त्यांने हे नकली कोर्ट चालवून आणि या कोर्टातून आदेश देऊन १०० एकर जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली. काय आहे हे नकली कोर्टाची केस? आणि हा नटवरलाल अल्ट्रा प्रो मॅक्स कोण आहे? जाणून घेऊया. (Morris Samuel)

गुजरातच्या गांधीनगरमध्ये नकली कोर्ट म्हणजेच Tribunal चालवण्याऱ्या या माणसाचं नाव आहे मॉरिस सॅम्युल. त्याने स्वत:च्या कार्यालयात Same कोर्टासारखं दिसेल असं नकली कोर्ट बनवून घेतलं होतं. ज्याला त्याने एक Tribunal घोषित केलं होतं. या नकली कोर्टाचा त्याने स्वत:ला खरा न्यायाधीश घोषित केलं होतं. आता Tribunal म्हणजे एक असं कोर्ट, जिथे विशिष्ट प्रकरणांवर निर्णय घेतले जातात. Tribunal हे सामान्य न्यायालयांपेक्षा वेगळे असतं. जिथे विशेषत: प्रशासनिक, कामगार किंवा आर्थिक वाद सोडवण्यासाठी काम करतं. त्याशिवाय Tribunal हे लवकर निर्णय देण्यासाठी मदत करतं. (Social News)

याचाच फायदा मॉरिस सॅम्युल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी घेतला. त्यांनी लोकांना हे पटवून दिलं की, ठप्प पडलेल्या कायदेशीर केसेस लवकर सोडवण्यासाठी मध्यस्त म्हणून सरकारने मला नेमलं आहे. लोकही त्याच्यावर विश्वास ठेऊ लागली. ज्यांच्या जमिनीच्या वादाची प्रकरणं शहराच्या सिविल कोर्टात Pending होती, त्यांना फसवूण लवकर निर्णय मिळण्याचा आमिष दाखवून केस त्याच्या स्वत:च्या कोर्टात लढवायचा. केस लढवणारे वकील सुद्धा त्याचेच साथीदार असायचे. त्या शिवाय त्याच कार्यायल खरं खूरं कोर्ट वाटण्यासाठी तिथे त्याचे काही साथीदार वकील आणि न्यायालय कर्मचारी म्हणून काम करायचे. (Morris Samuel)

======

हे देखील वाचा :  त्याने काल्पनिक देश कसा विकला?

======

नकली न्यायाधीश बनून त्याने अनेक खऱ्या निलंबित प्रकरणांवर स्वत:च्या वकिलांच्या बाजूने निर्णय दिले. हा सगळा नकली कारभार सलग पाच वर्ष सुरळीत सुरु होता. २०१९ मध्ये, मॉरिस सॅम्युलने एका प्रकरणात त्याच्या सहकाऱ्याच्या बाजूने निर्णय दिला होता. हा खटला एका सरकारी जमिनीशी संबंधित होता, ज्यावर त्याच्या सहकार्याने हक्क सांगितला, मॉरिस सॅम्युलने आपल्या नकली कोर्टातून खोट्या आदेशाद्वारे कलेक्टरला त्या जमिनीचा मालकी हक्काच्या नोंदीत त्याच्या सहकाऱ्याचं नाव टाकण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या आधारावर जेव्हा हा घटला सिव्हिल कोर्टात पोहचला. तेव्हा मॉरिस सॅम्युल याचा भांडाफोड झाला. कोर्टाच्या रजिस्टारने संशय व्यक्त केला आणि त्यानंतर तपास सुरू झाला. या तपासात पोलिसांनी आरोपी मॉरिस सॅम्युलला अटक केली आहे. त्याच्या विरोधात आधीपासूनच २०१५ मध्ये अहमदाबाद शहरात मणिनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल आहे. अशा या नकली कोर्टाच्या नकली न्यायाधीशावर कडक कारवाई केली जाईल असं पोलिसांच म्हणणं आहे. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.