इराणमध्ये आता मॉरिलिटी पोलीस व्यवस्था बंद करण्याची तयारी करण्यात आली होती. यामागील कारण असे की, काही महिन्यांपूर्वी हिजाब न घातल्याने महसा अमीनी नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दरम्यान, तिचा मृत्यू सुद्धा झाला होता. मृत्यूनंतर देशात मॉरेलिटी पोलीस व्यवस्थेविरोधात आंदोलन सुरु झाले होते. इराणच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे आंदोलन हिजाब संदर्भातील कठोर सक्ती आणि पोलिसांची जबरदस्ती यावरुन सुरु झाला होती. मात्र हळूहळू बेरोजगारी, गरिबी, अन्याय आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे सहभागी झाले. वाढत्या आंदोलनामुळे जगभरातील आलोचनेच्या कारणास्तव आता इराणचे अटॉर्नी जरनल मोहम्मद जफर मोंटाजेरी यांनी मॉरेलिटी पोलीस व्यवस्था संपवली आहे. (Morality Police)
काय आहे मॉरेलिटी पोलीस व्यवस्था?
मॉरेलिटी पोलीस इराणच्या पोलीस व्यवस्थेतील एक विशेष हिस्सा आहे. यांचे काम इस्लाम संदर्भातील कायदे आणि यासंबंधित ड्रेस कोड लागू करणे आहे. नुकत्याच झालेले हे प्रकरण या संबंधित होता. इस्लामिक कायदा आणि ड्रेस कोड लागू करण्याच्या सख्ती आता विरोधाचे मोठे कारण बनवले आहे. यामुळेच या व्यवस्थेच्या विरोधात लोक आवाज उठवत आहेत. हेच कारण आहे की, आता मॉरेलिटी पोलीसांची व्यवस्था भंग करण्यात आली.
कधी आणि कशी सुरु झाली ही व्यवस्था?
इस्लामिक क्रांतीनंतर १९७९ मध्ये इराणचे विविध प्रकारे मोरॅलिटी व्यवस्था लागू केले गेले. मात्र एक हिस्सा सर्वाधिक चर्चेचा विषय झाला, त्याला गश्त ए इरशाद नावाने ओळखले जाते. हे इराणी पोलीस व्यवस्थेचा मुख्य हिस्सा झाला. याचे काम महिलांना हिजाब घालण्यावर सक्ती करण्यासह इस्लामिक कायदे लागू करणे.
अधिकृत रुपात २००६ मध्ये याचे गठन झाले आणि सक्तीने काम करणे सुरु केले. फक्त हिजाबच नव्हे तर गश्त-ए-इरशाद हे सु्द्धा सुनिश्चित करतो की, महिलांना लहान कपडे किंवा फाटलेली जीन्स घालू नये आणि संपूर्ण शरिर झाकले जाईल असेच कपडे घालावेत. ही संघटना न्यायपालिका आणि इस्लामिक रिवॉल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स संबंधित पॅरामिलिट्री फोर्स बासिजसह ताळमेळ करत काम करतात. काही महिन्यांपूर्वी महसा अमीनीच्या मृत्यूनंतर ही व्यवस्था संपवण्याची मागणी जोर धरु लागली होती. (Morality Police)
हे देखील वाचा- नॉर्थ कोरियाच्या हुकूमशाहाचा नवा आदेश, मुलांची नावे बॉम्ब, पिस्तुल आणि सॅटेलाइट ठेवावीत
या पावलामुळे किती बदल येईल?
देशभराक मॉरेलिटी पोलीस व्यवस्थेचा विरोध वाढल्याने इराणच्या अटॉर्नी जनरल मोहम्मद जफर मोंटाजेरी यांनी असे म्हटले की, आता ही व्यवस्था भंग केली जाणार आहे. त्यांनी असे म्हटले की, मॉरेलिटी पोलीसांचे नियंत्रण देशातील गृहमंत्रालयाजवळ आहे. या व्यवस्थेचा न्यायपालिकेशी काहीही संबंध नाही. या घोषणेपूर्वी इराणच्या संसदेत मोंटाजेरी यांनी असे सुद्धा म्हटले की, महिलांना हिजाब घालणे किती महत्वाचे आहे. याच्या कायद्यासंदर्भात पुन्हा विचार केला जाईल.
या घोषणेनंतर सुद्धा इराणच्या लोकांचे असे मानणे आहे की, भले ही व्यवस्था भंग केली जाईल पण इस्लामिक कायद्यासंदर्भात जी सक्ती केली जात आहे त्यामध्ये बदल केला जाणार नाही. जर इराण मध्ये खरंच मॉरेलिटी पोलीस व्यवस्था भंग केल्यास तर आंदोलनकांचे यश म्हणावे लागेल. पण तरीही अद्याप इराण मध्ये मॉरेलिटी पोलीस व्यवस्था भंग जरी केली असली तरीही आंदोलन सुरुच आहे.