भारतीयांच्या घरात डाळी शिवाय जेवण हे अपूर्ण राहिल्यासारखे वाटते. खासकरुन जेव्हा डाळींबद्दल बोलले जाते तेव्हा विविध डाळी या आरोग्यासाठी किती फायदेशीर आणि पोषक तत्वे देतात याचा ही उल्लेख हमखास केला जाते. डाळी या आरोग्याच्या एकूण विकासासाठी फार मोठा हातभार लावतात. परंतु जर तुम्हाला मुग डाळ (Moong Dal) घ्यायची असेल तर ती नक्की कशा प्रकारची असावी किंवा ती घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरुन शरिराला त्यातील पोषक तत्वे मिळतील याचा विचार करावा लागतो. अशातच आपण पाहूयात मुग डाळ खरेदी करताना नक्की कोणती काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल अधिक.
डाळीचा रंग
मुग डाळ ही हलक्या पिवळसर रंगाची असते. काही लोकांचा असा भ्रम असतो की, मुग डाळ ही गडद पिवळ्या रंगाची असते. परंतु जेव्हा तुम्ही बाजारातून गडद पिवळ्या रंगाची मुग डाळ घेऊन येता तेव्हा त्यामध्ये काही वेळेस आर्टिफिशियल रंगांचा सुद्धा वापर केलेला असू शकतो. अशी डाळं खाणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
हे देखील वाचा- प्रेग्नेंसीमध्ये वांग खाणं सुरक्षित आहे का?

डाळीचा आकार
मुगाची डाळ ही दोन प्रकारची येते. जेथे तुम्हाला डाळीची साल येते तर दुसरी साली शिवाय येते. ऐवढेच नव्हे तर तुम्हाला संपूर्ण मुग डाळ ही मिळते. जर तुम्ही बाजारात मुग डाळ खरेदी करण्यास गेला असाल तर साल असलेली किंवा नसलेली मुगाची डाळ खरेदी करु शकता. परंतु त्याचे दाणे मधूनच तुटलेले तर नाहीत ना याकडे सुद्धा लक्ष द्या. त्याचसोबत डाळीचा आकार सुद्धा नीट पहा.
मुग डाळ आणि उडदाची डाळ यामधील फरक
डाळींमध्ये काही वेळेस दुकानदार हे लहान लहान दगडं मिसळतात. ते सुद्दा पिवळ्या रंगांचे. काही वेळेस प्लास्टिकचे तुटके सुद्धा डाळींमध्ये टाकले जातात. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही मुगाची डाळ (Moong dal) खरेदी कराल तेव्हा त्यामध्ये या गोष्टी तर टाकलेल्या नाहीत ना याकडे लक्ष द्या. त्यापेक्षा बंद पिशवीतील डाळ खरेदी करा.
पाकिटबंद मुगडाळ खरेदी करताना त्यावर असलेली माहिती
सध्या मॉल्समध्ये विविध ब्रँन्डची पाकिटबंद असलेली मुगडाळ मिळते. त्यामुळे पाकिटावर नक्की त्या प्रोडक्टबद्दल काय लिहिले आहे ते व्यवस्थितीत वाचून घ्या. जसे की, मुगाची डाळ ही किती तारखेपर्यंत वापरण्यायोग्य आहे किंवा मुगाची डाळ वापरताना तुम्ही काय केले पाहिजे असे.