जी लोक रात्रीच्या वेळी आकाशात पाहत नाहीत ती लोक आता ७ डिसेंबरला जरुर पाहतील. कारण त्यावेळी चंद्राचा लख्ख प्रकाश आणि त्यामागे असणार मंगळ ग्रह. असे दृश्य फार दुर्मिळ आहे. मात्र यंदा हे संभव होणार आहे कारण सूर्य, पृथ्वी, चंद्र आणि मंगळ ग्रह एका रेषेत येणार आहेत. ७ डिसेंबर २०२२ ला पौर्णिमा आहे. या दिवशी तुम्ही जर चंद्राच्या डाव्या बाजूला पाहिल्यास तर तुम्हाला मंगळ ग्रह चमकताना दिसून येणार आहे.(Moon Photobombing Mars)
अमेरिकेतील वेळेनुसार रात्री ११.०८ वाजता. त्यावेळी भारतात ८ तारीख असणार आहे. येथे मंगळ दिसण्याची शक्यता ८ डिसेंबरच्या रात्री असणार आहे. आता जेव्हा चंद्रामागे नारिंगी-पिवळ्या रंगाचा तारा दिसल्यास तर ते एखादे यान नसणार असून तो खरंतर मंगळ ग्रह आहे. जो सुर्याच्या प्रकाशात चमकताना दिसणार आहे.

या व्यतिरिक्त तुम्ही वर्च्युअल टेलिस्कोप प्रोजेक्टच्या माध्यमातून हा नजारा लाइव्ह स्ट्रिमच्या माध्यमातून ही पाहू शकता. तुम्ही सामान्य दुर्बिण किंवा टेलिस्कोपच्या माध्यमातून ही पाहू शकता. खासकरुन मंगळ ग्रह अशा प्रकारे दिसणे हे १४ वर्षांतून एकदा होते. हे तुमच्या देशासह ठिकाणावर ही निर्भर करते की, तुम्हाला मंगळ ग्रह हा चंद्राच्या कोणत्या दिशेला दिसेल. मात्र दिसणार जरुर.
मात्र लक्षात असू द्या की, ते फार कमी वेळ दृश्य असणार आहे. अमेरिकेतील लोकांना हे फक्त४० सेकंद ते २ मिनिटांपर्यंतच दिसू शकते. कारण त्यानंगर मंगळ ग्रह हा चंद्राच्या मागे लपला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला असे वाटेल की, मंगळ ग्रहावर ग्रहण लागले आहे. कारण तो चंद्रामागून निघून तो थोडावेळ दिसणार आहे. त्यानंतर पुन्हा चंद्रामागे जाणार आहे. परंतु ही घटना दिसण्यासाठी आकाश हे निरभ्र असले पाहिजे.(Moon Photobombing Mars)
हे देखील वाचा- २०५० पर्यंत बुडणार अमेरिकेतील ‘ही’ मोठी शहरं, NASA चा रिपोर्ट
का ऐवढे खास आहे?
आपल्याला माहिती आहे की, आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती सूर्यमंडळाचा हिस्सा आहे. बहुतांश वेळा आपण पृथ्वीवरुन आपला उपग्रह चंद्र पाहू शकतो. पण दुसऱ्या ग्रहांना पाहणे सोप्पे नसते. मात्र ७ डिसेंबरला हे संभव होऊ शकते. कारण त्यावेळी आपल्याला पृथ्वीवरुन एखादा दुसरा ग्रह पाहता येणार आहे.आता सर्वजण ही घटना पाहण्यासाठी फार उत्सुक आहेतच. त्याचसोबत वैज्ञानिकांचे ही लक्ष या घटनेकडे लागून राहिले आहे.