Home » नासा जपान मधील कंपनीकडून खरेदी करणार चंद्रावरील माती

नासा जपान मधील कंपनीकडून खरेदी करणार चंद्रावरील माती

by Team Gajawaja
0 comment
Moon Dirt
Share

जेव्हा नासाने चंद्रासाठी आपला आर्टिमस अभियानाची घोषणा केली तेव्हा पासून आंतराळात उत्खननच्या संभावनांबद्दल चर्चा सुरु झाली आहे. त्याचसोबत चंद्रावर मोठ्या प्रमाणात लीथियम असल्याने चंद्रावर उत्खननासाठी काही देशांना तेथे जाण्यासाठी प्रेरित केले आहे. नासाने तर उत्खननासंबंदित आंतरराष्ट्रीय कायदा बनवण्याच्या दिशेने आर्टिमिस अकॉर्डचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये नासा आणि त्यांच्या मित्र देशांच्या मतदीने आणि उत्खनन व्यापाराच्या करारासंबंधित नियमांचा उल्लेख केला आहे. आता चंद्रावर उत्खनन आणि त्याच्या व्यावसायिक हालचाली खरच सत्यात उतरणार आहेत. कारण जापान मधील एक खासगी कंपनी नासाला चंद्रावरील मातीची विक्री करणार आहे. (Moon Dirt)

अत्यंत मौल्यवान आहे चंद्रावरील माती
चंद्रावरील माती अत्यंत मौल्यवान असते. एक पाकिट असलेल्या या मातीची किंमत ५ हजार डॉलर असते. तर आता पर्यंत फक्त शासकीय संस्थांकडुन आंतराळातून आणण्यात आलेल्या नमून्यांची देवाणघेवाण केली जात होती. मात्र आता खासगी क्षेत्राने सुद्धा यामध्ये प्रवेश केला आहे.

Moon Dirt
Moon Dirt

जापानने सुद्धा बनवले असे कायदे
बहुतांश देशांनी असे कायदे बनवले आहेत. ज्यानुसार आंतराळासाठी कंपन्या आंतराळावरील संसाधनांचे उत्खनन करुन त्याचा उपयोग करत त्यामधून पैसे कमावू शकतात. यामुळे आता येणाऱ्या काळात आपल्याला आणखी अधिक खासगी आंतराळ अभियाने पहायला मिळणार आहेत. नुकत्याच जापानन आयस्पेस नावाच्या एका खासगी कंपनीला असे अधिकार दिले आहेत.

तर आयस्पेस टोक्योची एक जागतिक चंद्र अन्वेषण कंपनी आहे ज्याला चंद्रावर व्यावसायिक हालचाली करण्यासाठी परवाना दिला गेला आहे. हेच अशा प्रकारचे पहिलाच चंद्रावरील अभियान असणार आहे. यामुळे नासाला आयस्पेस मध्ये जमा करण्यात आलेली चंद्रावरील माती खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जापान मधील राज्यमंत्री सानाएक तकाइची यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.(Moon Dirt)

हे देखील वाचा- नासाने आपल्या मिशनचे नाव आर्टेमिस का ठेवले?

स्पेस रॉकेटच्या माध्यमातून
तकाइची यांनी असे सांगितले की, आयस्पेस चंद्रावरील संसाधने ही नासाच्या योजनेनुसार विक्री केल्यास तर हा एखाद्या खासगी ऑपरेटरद्वारे चंद्रावर आंतराळावरील संसाधांनांची व्यावसायिक देवाणघेवाण केल्याचे हे पहिलेच प्रकरण असेल. स्पेसएक्सने फॉल्कन ९ रॉकेटद्वारे २२ नोव्हेंबरच्या आसपास हाकुतो आर कार्यक्रमापूर्वी अभियानाच्या रुपात याचे प्रक्षेपण करेल.

हे पहिलेच असे अभियान असणार आहे जेे काही ग्राहकांसाठी कार्गो घेऊन जाणार आहे, ज्यामध्ये अमिराती आणि जापानी स्पेस कार्यक्रमांसाठी चंद्रावर दोन रोवरचा समावेश असणार आहे. असे वाटू शकते की, हे एक लहान काम नाहीच. पण आयस्पेस केवळ काही नमूने जमा करत नाही आहेत ना त्यावर नमून पोहचवण्याची जबाबदारी आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.