Home » चंद्राच्या बदलत्या आकाराचा महिलांच्या मासिक पाळीशी संबंध असतो का?

चंद्राच्या बदलत्या आकाराचा महिलांच्या मासिक पाळीशी संबंध असतो का?

by Team Gajawaja
0 comment
Moon and Menstrual Cycle Relationship
Share

पौर्णिमा किंवा अमावस्येच्या रात्री वाईट आत्मा जाग्या होतात असे म्हटले जाते. लोकांचे वागणे बदलले जाते. काही लोक उत्तम तर काहीजण वाईट वागतात. सतत चिडचिड ही काही लोकांची होते. असे केवळ सिनेमांमध्ये आणि काल्पनिक कथांमध्ये पहायला मिळते की, पौर्णिमा अथवा अमावस्येच्या रात्री व्यक्ती कोल्हा किंवा वॅम्पायर होते. जेव्हा पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवसाबद्दल बोलले जाते तेव्हा चंद्राच्या आकाराकडे ही लक्ष दिले जाते. जो प्रत्येक १५ दिवसात बदलत राहतो. (Moon and Menstrual Cycle Relationship)

अशी एक कथा अशी सुद्धा आहे की, पौर्णिमेच्या रात्री अधिक मुलं जन्माला येतात. मात्र नंतर ही गोष्ट फेटाळून लावली गेली. कारण याचा काही पुरावा नाही. वैज्ञानिक रुपात हे सुद्धा चुकीचे ठरवले गेले आङे. २९ दिवसाचे चंद्राचे वेळापत्रक असते. नव्या चंद्र ते पूर्ण चंद्रापर्यंत, जे २८ दिवसांच्या पीरियड्सच्या वेळीशी मिळताजुळते असते. लोक चंद्राचे गुरुत्वाकर्षण आणि प्रकाशाच्या फर्टिलिटी साइयकला जोडतात. मात्र याच दरम्यान काय पुरावा आहे की, चंद्राचा बदलता आकार आणि पीरियड्सचा नक्की काय संबंध आहे?

जर चंद्राच्या २९ व्या दिवसाच्या वेळापत्रकाच्या दिवशी एखाद्या महिलेच्या पीरियड्सच्या २८ दिवसाचे वेळापत्रक मिळतेजुळते असेल तर हा एकमेव संयोग असेल. १९८६ मध्ये एक अभ्यास करण्यात आला होता, त्यामध्ये वैज्ञानिकांनी या दोन्ही घटनांमध्ये एक अत्यंत नाजूक संबंध अथवा संयोग असण्याची उमेद होती. अभ्यास Acts Obstetricica et Gynecologica Scandinavica मध्ये प्रकाशित करण्यात आला होता.

यामध्ये असे सांगितले गेले होते की, अभ्यासात सहभागी २८.३ टक्के महिलांना पीरियड्स नवा चंद्र आल्यानंतर सुरु झाला होता. चंद्राच्या कोणत्याही आकाराच्या तुलनेत हे सर्वाधिक मोठा संयोग होता. मात्र २०१३ मध्ये एक अभ्यास झाला. जो Endocrine Regulations मध्ये प्रकाशित झाला होता. यामध्ये एका ७४ वर्षाच्या महिलेला वर्षानुवर्षे फॉलो केले जात होते. मात्र तिच्या संपूर्ण वयादरम्यान काही पुरावे मिळाले नाहीत की, चंद्राच्या बदलावाचा महिलांच्या पीरियड्सशी काही संबंध आहे.(Moon and Menstrual Cycle Relationship)

आता गोष्ट अशी झाली आहे की, पीरियड्स कधी सुरु झाले. खरंतर आता महिलांचे पीरियड्स ट्रॅक करणारे काही अॅप्स तयार करण्यात आलेले आहेत. महिला अगदी सहज त्यांच्या पीरियड्सच्या तारखा तेथे देऊ शकतात. मात्र एका मोठ्या स्तरावर अभ्यास हा २०१९ मध्ये झाला. यामुळे पीरिड्स ट्रॅक करणारे अॅफ Clue ने १५ लाख महिलांच्या पीरिड्सचा तपास केला. त्या लोकांमध्ये काही पुरावे मिळाले नाहीत की, चंद्राच्या बदलत्या आकारामुळे महिलांच्या पीरियड्सचा काही संबंध आहे.

जर्मनीतील वर्जबर्ग युनिव्हर्सिटी मध्ये न्युरोबायोलॉजी आणि जेनेटिक्सचे प्रमुख शार्लोट फोरस्टार यांनी असे म्हटले की, जर तुम्ही १ हजार महिलांच्या डेटा एकत्रित केलात तर तुम्हाला दिसेल की, पौर्णिमा अथवा नव्या चंद्राच्या वेळी पीरियड्स सुरु झाले आहेत. असे होत नाही. दीर्घकाळापर्यंतचा डेटा काढल्यास केवळ एकदाच होऊ शकते. मात्र पीरियड्सचा चंद्राशी काहीही संबंध नाही. हे वैज्ञानिक ही नाही. (Moon and Menstrual Cycle Relationship)

परंतु एक समस्या अशावेळी आली जेव्हा शार्लोट आणि त्यांच्या साथीदारांनी २०२१ मध्ये एक अभ्यास जाहीर केला. स्टडी सायन्स अॅडवान्सेस मध्ये प्रकाशित झाला होता. शार्लोटची टीप पाच वर्षांपासून २२ महिलांच्या पीरिड्सवर नजर ठेवून आहेत. हैराण करणारी गोष्ट अशी की, या महिलांना जेवढे ही पीरियड्स आले त्यापैकी एक चतुर्थांश अथवा पौर्णिमा किंवा नव्या चंद्राशी सिंक्रोनाइज होत होते. मात्र केवळ थंडी आणि शरद ऋतूतवेळीच होते. जेव्हा रात्र मोठी असते.

हे देखील वाचा- वजन कमी करण्यापासून ते तणाव कमी करण्यापर्यंत सूर्यनमस्कार करण्याचे आहेत अनेक आश्चर्यचकित करणारे फायदे

खरंतर याचे कारण असे की, जेव्हा प्रकाश अधिक असतो. तेव्हा लोक आपल्या काम करण्याचा कालावधी वाढवतात. कारण प्रकाशात काम करणे सुरक्षित असते. नव्या चंद्रावेळी काळोख लवकर होतो. लोक लवकर घरी जातात. प्रजननात लागतात. हा काळ दांम्पत्यांसाठी सर्वाइवल आणि प्रजननसंबंधित लाभ घेण्याचा असतो. मात्र ही एक थ्योरी आहे. याचा सुद्धा काही पुरावा नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.