Home » आर्थिक चणचणीपासून दूर राहण्यासाठी असे करा प्लॅनिंग

आर्थिक चणचणीपासून दूर राहण्यासाठी असे करा प्लॅनिंग

by Team Gajawaja
0 comment
Monthly budget planning
Share

सध्याच्या काळात महागाई वेगाने वाढत चालली आहे. अशातच सेविंग करणे सुद्धा फार गरजेचे आहे. जेणेकरुन आर्थिक चणचणीचा सामना करावा लागणार नाही. काही लोकांना वायफळ खर्च करण्याची फार सवय असते. असे केल्याने ते महिन्याअखेरीस कंगाल होतात. सेविंग करणे सर्वाधिक महत्वाचे असून त्यावेळी तुम्ही किती कमावता हे पाहिले जात नाही. तर तुमच्या हातात येणाऱ्या पैशांतून तुम्ही किती पैसे बाजूला काढून ते बचत करता हे फार महत्वाचे असते. सुरुवातीलाच खुप पैसे बाजूला काढून ठेवून बचत करणे मुश्किल होईल. त्यामुळे हळूहळू पैशांची बचत करुन कालांतराने तुमची एक मोठी रक्कम बचत होऊ शकते हे लक्षात ठेवा. यासाठीच नक्की काय करावे यासंदर्भातील खास टीप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Monthly budget planning)

मासिक खर्चाचे बजेट बनवा
प्रत्येक महिन्याच्या खर्चानुसार तुम्ही तुमचे एक बजेट तयार करा. यामध्ये असे खर्च लिहा जे तुम्हाला तुमच्या खिशातून द्यायचे आहेत. जसे की, पाण्याचे बिल, वीजेचे बिल,राशन, दूध, किराणा सामान इत्यादी. तर या लिस्टमध्ये तुम्ही घरातील प्रत्येक लहान-मोठा खर्च लिहा. त्यानुसार तु्म्ही महिन्याभराचे बजेट प्लॅन करा.

आपल्या लिस्टला दोन भागात विभाजित करा. पहिले म्हणजे असा खर्च जो फार महत्वपूर्ण आहे. जसे की, मुलांची फी, वीज बिल असे. दुसरा तो खर्च जसे की, शॉपिंगचा खर्च, बाहेर डिनरसाठी जात असाल तर तो खर्च असे. यामध्ये सुद्धा सर्वात प्रथम तुमचा पगार त्या खर्चात खर्च करा जो फार महत्वपूर्ण आहे. यामुळे तुमची बचत सुद्धा होईल आणि महिन्याभराचा खर्च ही निघेल.

Monthly budget planning
Monthly budget planning

रिकाम्या वेळी किंवा तणावाखील असाल तर शॉपिंग करु नका
बहुतांश लोक घाईघाईत खरेदी करण्यासाठी जातात. यामुळे त्यांना नक्की काय घ्यायचे आहे आणि काय नाही हे कळत नाही. गोंधळच उडतो. त्यावेळी नजरेला पहिले जे सामान दिसेल ते घेतले जाते. त्यामुळे नेहमीच तुमच्याकडे जेव्हा रिकामा वेळ असेल किंवा तुम्ही तणावाखाली असाल तर शॉपिंग करण्यापासून दूर रहा. कारण यावेळी वायफळ खर्च अधिक केला जाऊ शकतो आणि तुम्ही बनवलेले बजेट हलले जाऊ शकते.

मुलांसोबत शॉपिंगला फार कमी जा
प्रत्येक कंपनीला माहिती असते की, प्रत्येक आई-वडिल आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करतात. सध्या अशा ही काही जाहिराती दाखवल्या जातात ज्या मुलांना फार आवडतात. त्यामुळे मुलं सुद्धा त्यांना जाहिरातीत जे दाखवले गेलेयं तेच हवयं असा हट्ट पालकांकडे करतात. त्यांना नाही म्हटले तर ते रडतात. अशातच प्रयत्न करा की, मुलांना शॉपिंगला तेव्हाच घेऊन जा जेव्हा त्यांना खरंच गरज आहे. काही वेळा मुलांकडे खुप खेळणी असतात, तरीही त्यांना काहीतरी दुसरे हवे असते. मुलांच्या हट्टपाई काही पालकांना ते त्याला घेऊनच द्यावे लागते. त्यामुळे पालकांनी सुद्धा मुलाला पैशांचे महत्व समजावले पाहिजे. त्याचसोबत वायफळ खर्च का करु नये या बद्दल ही सांगितले पाहिजे. (Monthly budget planning)

हेही वाचा- Charity च्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकीपासून असे व्हा सावध

डिस्काउंटच्या नादात ऑनलाईन शॉपिंग
काही वेळेस आपल्याला खरेदी करायचे नसते. पण जेव्हा ऑनलाईन शॉपिंग अॅपवर डिस्काउंट सुरु असतो तेव्हा आपल्याला खुप शॉपिंग करावीशी वाटते. येथेच आपण चुकतो आणि शॉपिंग करतो. अशाने ठरवलेले बजेट कोलमडते. आपल्याला नको असलेल्या वस्तू सुद्धा या सेलमध्ये घेतो. अशाने वायफळ खर्च अधिक वाढला जातो हे तुम्ही नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे.

आजकालच्या कंपन्या डिस्काउंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरुन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करतात. यामुळे कंपनीचे नव्हे तर आपलेच नुकसान होते आणि कंपनीला अधिक फायदा होतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.