Monsoon Travel Tips : मान्सूनमध्ये ट्रॅव्हल करण्याची एक वेगळीच मजा असते. भारतातील बहुतांश ठिकाणी सध्या मान्सूनला सुरुवात झाल्याने सर्वत्र हिरवळ दिसून येईल. या दरम्यान, ट्रॅव्हल करण्याची मजा वेगळीच असते. पण काही ठिकाणी पावसाळ्यात जाणे टाळले पाहिजे. अशातच ट्रॅव्हलची बॅग पॅक करताना कोणत्या गोष्टी त्यामध्ये असाव्यात याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….
पावसाळ्यातील ट्रिप
काहीजणांना पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला फार आवडते. भारतातील अनेक अशी ठिकाणे आहेत जेथे पावसाळ्यात गेल्यानंतर मन रिलॅक्स होते. कर्नाटकातील कुर्ग आणि महाराष्ट्रातील लोणावळ्यासारखी ठिकाणे पर्यटकांना पावसाळ्यात आपल्याकडे आकर्षित करतात. पावसाळ्यात या ठिकाणांचे सौंदर्य अधिक वाढले जाते. यामुळे पावसाळ्याची ट्रिप बेस्ट होण्यासाठी पॅकिंगवेळी कोणत्या गोष्टी त्यामध्ये असाव्यात याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….
मान्सून ट्रॅव्हलिंग पॅकिंग टिप्स
छत्री आणि रेनकोट महत्त्वाचा
मान्सूनमध्ये प्रवास करताना सर्वाधिक महत्वाची गोष्ट अशी की, छत्री आणि रेनकोट बॅगमध्ये ठेवण्यास विसरु नका. मुसळधार पावसात भिजल्याने प्रकृती बिघडली जाऊ शकते. अशातच रेनकोट अथवा छत्री ट्रॅव्हलवेळी सोबत असावी.
वॉटरप्रुफ बॅग
बॅगेतील सामान भिजण्यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही वॉटरप्रुफ बॅगचा वापर करू शकता. या सर्व गोष्टी सुरक्षित असतात. याशिवायय वॉटरप्रुफ बॅगमुळे तुम्ही टेन्शन फ्री प्रवास करू शकता.
असे शूज ठेवा
असे म्हटले जाते की, मान्सूनमध्ये प्रवास करताना योग्य ठिकाणी चप्पल अथवा स्लिपर सोबत ठेवावी. पावसाच्या पाण्यामुळे पायाच्या त्वचेला नुकसान पोहोचले जाऊ शकते. अशातच तुम्ही शूजची ग्रीप उत्तम असावी याकडे लक्ष दिले पाहिजे. यामुळे घरसण्याची शक्यता कमी होऊ शकते. (Monsoon Travel Tips)
हेअर ड्रायर
बॅगमध्ये हेअर ड्रायर ठेवणे विसरु नका. यामुळे केस सुकण्यासह कपड्यांमधील दमटणा दूर करण्यासही मदत करेल. हेअर ड्रायरचे अधिक वजन कधीच असू नये. ट्रॅव्हलवेळी लाइटवेट हेअर ड्रायरसोबत ठेवा.