Monsoon Travel : जुलै महिन्यात बहुतांश ठिकाणी तुफान पाऊस पडतो. अशातच पुर येणे, भूस्खलन होणे अशा काही घटना घडल्या जातात. पण तरीही काहीजण निसर्गाच्या सिन्निध्यात जाण्यासाठी अॅडवेंचर ट्रिपचा प्लॅन करतात. परंतु पावसाळ्यात अशा ठिकाणी टाळावे जेथे जाणे जीवघेणे ठरु शकते. अशातच जाणून घेऊया भारतातील अशी कोणती ठिकाणे आहेत जी जुलै महिन्यात जीवघेणी ठरू शकतात याबद्दल अधिक….
केदारनाथ
वर्ष 2013 मध्ये केदारनाथ येथे मोठी दुर्घटना घडली होती. यामुळेच केदारनाथला पावसाळ्याच्या काळात बहुतांजण जाणे टाळतात. भाविक थंडी अथवा उन्हाळ्याच्या काळात दर्शनासाठी येतात, कारण केदारनाथ 11,755 फूट उंचीवर असून पावसामुळे येथे जाणे धोकादायक ठरु शकते. केदारनाथला पोहोचण्यासाठी घनदाट जंगलातून वाट काढता जावे लागते.
हरिद्वार
पावसाळ्याच्या दिवसात उत्तराखंडला जाण्याचा अजिबात विचार करू नका. येथे अशी काही ठिकाणे आहेत जेथे पुर परिस्थिती निर्माण होते. पावसामुळे उत्तराखंडला जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये जुलै महिन्यात हरिद्वार येथे पूर आल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. यामुळेच हरिद्वार अथवा ऋषिकेषला पावसाळ्यात जाणे टाळावे. (Monsoon Travel)
शिमला, मनाली
शिमला आणि मनाली ठिकाणी अत्यंत सुंदर आहे. पण तेवढेच धोकादायकही आहे. दिल्लीजवळ असल्याने विकेंडला बहुतांशजण शिमला, मनालीला जाण्याचा विचार करतात. पण गेल्या वर्षात शिमला आणि मंडी येथे पावसाळ्यामुळे भूत्सखलन होण्यासह पुराची स्थिती निर्माण झाली होती.