Home » पावसाळ्यात त्वचेसंबंधित या 3 आजारांचा धोका, असा करा बचाव

पावसाळ्यात त्वचेसंबंधित या 3 आजारांचा धोका, असा करा बचाव

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. यावेळी काही समस्या उद्भवू शकतात. यापैकीच एक प्रमुख समस्या म्हणजे स्किन इन्फेक्शन आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात.

by Team Gajawaja
0 comment
Monsoon Skin Problem
Share

Monsoon Skin Problems : पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्याने थंडावा आणि मन प्रसन्न होते. पण दुसऱ्या बाजूला आरोग्यासंबंधित काही समस्याही उद्भवल्या जातात. पावसाळ्यात त्वचेसंबंधित धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली जाते. पावसाळ्यात ओलावा वाढला जातो. यामुळे त्वचेवर बॅक्टेरिया आणि फंगस निर्माण होण्याची शक्यता अधिक वाढली जाते. यामुळे त्वचेसंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. ओलसर कपड्यांमध्ये ओलावा टिकून राहिल्यास स्किन इन्फेक्शन होऊ शकते. पावसाळ्यात त्वचेसंबंधित कोणत्या समस्या उद्भवू शकतात याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…

एथलीट फूट इन्फेक्शन
पावसाळ्याच्या दिवसात एथलीट फूट इन्फेक्शनची समस्या वाञली जाऊ शकते. ही समस्या खासकरुन पायांच्या बोटांमध्ये होते. हे संक्रमण अशावेळी होते जेव्हा पाय दीर्घकाळापासून ओलसर राहतात. पावसाळ्यात जेव्हा भिजता तेव्हा पाय दीर्घकाळ ओलसर राहिल्यास एथलीट फूट इन्फेक्शन फैलावण्याची शक्यता अधिक वाढली जाते. यामुळे पायांना खाज येणे अथवा जळजळ निर्माण होते.

फंगल इन्फेक्शन
फंगल इन्फेक्शनमध्ये त्वचा लाल होण्यासह डाग येतात. हे संक्रमण शरिरातील कोणत्याही ठिकाणी होते. याला रिंग वर्म असेही म्हटले जाते. यामुळे त्वचेवर गोलाकार डाग येतात आणि ते हळूहळू वाढले जातात. हे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकते. पावसाळ्यात ओलसर आणि अस्वच्छ कपड्यांमुळेही फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते.

यीस्ट संक्रमण
यीस्ट संक्रमण एक फंगल संक्रमण आहे. जे सर्वसामान्यपणे ओलसर ठिकाणी होते. जसे की, काख, महिलांच्या प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणी होऊ शकते. पावसाळ्यात ओलसरपणा वाढल्याने यीस्ट संक्रमण अधिक फैलावले जाते. यीस्ट संक्रमण झालेल्या ठिकाणी खाज आणि जळजळ होते. (Monsoon Skin Problems)

असे दूर रहा
-ओलसर शूज घालणे टाळा
-हेअरब्रश, मोजे आणि टॉवेल शेअर करु नका
-दररोज स्वच्छ मोजे घाला
-केसांना उत्तम शॅम्पू लावा आणि सुकवा
-सुती कपडे घाला


आणखी वाचा :
शरिरात Vitamin D ची कमतरता निर्माण झाल्यास दिसतात ही लक्षणे
अमृत वाटणारा चहा रिकाम्या पोटी घेतला तर होतील ‘हे’ गंभीर दुष्परिणाम

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.