Monsoon Skin Care : पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे त्वचेवर अनेक समस्या उद्भवू शकतात. चेहऱ्यावर तेलकटपणा, मुरूम किंवा थकलेली त्वचा दिसू लागते. बाजारातील केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधने यावेळी त्वचेसाठी अधिक हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे घरच्या घरी तयार करता येणारे नैसर्गिक उपाय हे पावसाळ्यातील त्वचा समस्यांवर अधिक प्रभावी आणि सुरक्षित ठरतात.
१. बेसन व हळदीचा उटणे
बेसन, हळद आणि दुध यांचे मिश्रण करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा स्वच्छ होते आणि नैसर्गिक ग्लो येतो. हळदीतील अँटीसेप्टिक गुणधर्मामुळे मुरूम कमी होतात आणि बेसन त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेतो. हे उटणे आठवड्यातून २ वेळा लावल्यास चेहऱ्यावर एक निखळ चमक येते.
२. टॉमेटोचा रस आणि मध
टॉमेटो हा नैसर्गिक टोनर मानला जातो. त्यामध्ये असलेले लाइकोपीन त्वचेच्या रंध्रांमध्ये जाऊन टॉक्सिन्स काढून टाकते आणि त्वचेचा रंग उजळतो. टॉमेटोचा रस थोडासा मधात मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मॉइश्चराइज होते आणि ग्लो टिकून राहतो. हा उपाय पावसाळ्यातील मळभ आणि निस्तेजपणावर प्रभावी ठरतो.
३. गुलाबपाणी व सेंद्रीय लिंबू
गुलाबपाण्याचा वापर हा नैसर्गिक टोनर म्हणून केला जातो. यात थंडावा देणारे गुणधर्म असतात. लिंबाचा रस यात मिसळून चेहऱ्यावर हलक्याने मसाज केल्यास त्वचेत जमा झालेले मृत पेशी निघून जातात आणि नवीन पेशींना वाव मिळतो. यामुळे त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळतो. मात्र, लिंबाचा रस थेट वापरताना जास्त प्रमाण टाळावे, कारण ते अॅसिडिक असते. (Monsoon Skin Care)
४. फळांचे फेस मास्क
केळी, पपई, संत्री यासारखी फळं त्वचेसाठी अतिशय लाभदायक असतात. पावसाळ्यात थोडी केळी वाटून त्यात मध आणि थोडं दूध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला आर्द्रता मिळते आणि ग्लो कायम राहतो. पपईत असलेले एन्झाइम्स त्वचेला सौम्यपणे एक्सफोलिएट करतात. या फळांचे मास्क घरच्या घरी सहज तयार होतात व रासायनिक पदार्थांपासून मुक्त असतात.
=========
हे देखील वाचा :
Beauty Tips : पावसाळ्यात मेकअप टिकवण्यासाठी सोप्या टिप्स
Night Dreams : रात्री वाईट स्वप्न का पडतात? जाणून घ्या यामागची कारणे
Friendship Day : जाणून घ्या ‘फ्रेंडशिप डे’चा इतिहास
===========
५. भरपूर पाणी आणि संतुलित आहार
त्वचेला बाहेरून निगा राखण्याइतकीच आतूनही पोषण देणे गरजेचे असते. पावसाळ्यात पाणी कमी प्यायले जाते, पण त्वचेचा ग्लो टिकवण्यासाठी दिवसातून किमान ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. यासोबतच हिरव्या भाज्या, फळे आणि अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा समावेश असलेला आहार त्वचेला निरोगी ठेवतो.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics