Home » पावसाळ्यात घाला ‘या’ प्रकारचे कपडे जेणेकरुन मनमोकळेपणाने कराल एन्जॉय

पावसाळ्यात घाला ‘या’ प्रकारचे कपडे जेणेकरुन मनमोकळेपणाने कराल एन्जॉय

by Team Gajawaja
0 comment
Monsoon Fashion
Share

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. या पावसाळादरम्यान अनेक अशा गोष्टी आहेत त्या आपण करण्याचा प्रयत्न करतो. जसे की, पावसाळ्यात मनमोकळेपणाने भिजणे, एखाद्या ट्रेकला जाणे किंवा मित्रमैत्रीणींसोबत पावसाळ्यात विकेंड्चा प्लॅन करणे. परंतु पावसाळ्यात खासकरुन मुली ट्रेंन्डी दिसण्याचा प्रयत्न करतात. पावसाळ्यात आपण नेमक्या कोणत्या प्रकारचे कपडे घातले पाहिजेत हे आपल्याला कळले पाहिजे. कारण जर पावसात भिजायचे असेल तर, तुम्ही घातलेल्या कपड्यांमध्ये तुम्हाला कंम्फर्टेबल वाटले पाहिजे. त्यामुळेच पावसाळ्यात आरामदायी आणि फॅशन सुद्धा जपता येईल असे कोणते कपडे घालावेत याबद्दलच तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.(Monsoon Fashion)

आपण बदलत्या ऋतूनुसार कपडे कसे घालायचे याबद्दल ठरवतो. परंतु पावसाळ्यात कपडे घालण्यासंदर्भात आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते. खासकरुन मुलींना. कारण पावसाळ्यात जर तुम्ही ट्रांन्सपरंट कपडे घालण्यापूर्वी आपले शरिर पूर्णपणे झाकले जाईल अशा पद्धतीचे इनरवेअर घाला. या व्यतिरिक्त तुम्ही सुती कपड्यांचा ऑप्शन निवडू शकता. त्याचसोबत पावसाळ्यात फ्लोअर प्रिंट अलेले कपड्यांचा ही पर्याय तुमच्याकडे आहे. कारण पावसाळ्यात ते अतिशय सुंदर दिसतात.

हे देखील वाचा- पावसाळ्यात ट्रेकिंगासाठी ‘हे’ आहेत बेस्ट पर्याय

Monsoon Fashion
Monsoon Fashion

पावसाळ्यात बहुतांश तरुण-तरुणी स्किन फिटिंग कपडे घालतात. मात्र असे कपडे घालण्यापासून दूर रहा. घट्ट कपडे भिजल्यानंतर ते काढताना खुप त्रास होतो. ऐवढेच नव्हे तर ते अंगाला पूर्णपणे चिकटले जाऊन आपल्या शरिराचा काही भाग विचित्र पद्धतीने दिसतो. अशा कपड्यांमध्ये तुम्ही कधीच स्वत: कंन्फर्टेबल राहू शकत नाहीत.(Monsoon Fashion)

सध्या वेलवेटचे कपडे घालण्याचा ट्रेंन्ड आहेच. मात्र पावसाळ्यात तुम्ही वेलवेटची पॅंन्ट, जॅकेट किंवा ड्रेस घालण्याचा विचार करत असाल तर तो बदला. कारण वेलवेटचे कपडे घालून पावसात जर तुम्ही भिजलात तर ते अंगाला अधिक चिकटले जातील. पण तुमच्या कपड्यात अधिक पाणी सुद्धा शोशले जाईल.

हे देखील वाचा- पावसाळ्याची मजा लुटण्यासाठी ‘या’ ठिकाणांना नक्कीच भेट द्या

मान्सूनमध्ये हटके दिसायचे असेल तर इंद्रधनुष्याच्या रंगांप्रमाणे तुमच्या कपड्यांची निवड करा. कलरफुल आणि आरामदायी असे कपडे घाला. परंतु पावसाळ्यात सफेद रंगाचे कपडे घालणे टाळा. भिजल्यावर त्यावर डाग लागण्याची शक्यता असते आणि डाग जर गेला नाही तर पूर्ण कपडे घराब होतात. आणखी महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात जीन्स घालणे टाळा. यामध्ये जरी तुम्हाला कंम्फर्टेबल वाटत असले तरीही तुम्ही भिजल्यानंतर जीन्स जड होते. त्यामुळे तुम्हाला स्वत:लाच अनकंम्फर्टेबल वाटू शकते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.