Monsoon Diet and Lifestyle : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच काही आजार मागे लागण्याची शक्यता असते. यामुळे आरोग्याची खास काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अशातच पावसाळ्यात हेल्दी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी डाएट आणि लाइफस्टाइमध्ये वेगवेगळे बदल करणे अत्यावश्यक आहे. याबद्दलच अधिक जाणून घेऊया…
पावसाळ्यात डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये करा बदल
-पावसाळ्यात आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. यामुळे कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करावी.
-कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे त्वचेसंबंधित समस्या दूर राहतात.
-मान्सूनमध्ये मच्छरही वाढतात. यामुळे होणारे आजार वाढले जातात. याच्यापासून दूर राहण्यासाठीही कडुलिंबाचा वापर करू शकता.
-कडुलिंबाची पाने सुकवून आणि ती जाळल्यानंतर त्याच्या धुरामुळे मच्छर कमी होतात.
-पावसाळ्यात ओलसर कपडे घालण्यापासून दूर रहावे. खासकरुन अंडरगार्मेंट्स पूर्णपणे सुकल्यानंतर घाला. यामुळे व्हजाइनल इन्फेक्शनपासून दूर राहू शकता.
-पावसाळ्यात कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
-डाएटमध्ये आले आणि तुळशीचा काढा प्या. यामुळे काही आजारांपासून दूर राहू शकता. (Monsoon Diet and Lifestyle)
-पावसाळ्यात शिळे अन्नपदार्थ आणि बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.