Beauty Tips- पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्याने उन्हाच्या झळांपासून आपल्याला थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र पावसाळा सुरु झाल्याने मुलींनो तुम्ही तुमच्या बॅगेत किंवा पर्समध्ये ज्या काही गोष्टी ठेवता त्यामध्ये बदल करु शकता. जसे की, थंडीच्या वेळी आपण उबदार शॉल किंवा स्टोल ठेवतो. त्याचप्रमाणे पावसाळ्यात तुम्ही घराबाहेर पडत असातर काही गोष्टी मुलींनी तरीही आपल्या बॅगेत जरुर ठेवल्याच पाहिजेत. तर पाहूयात अशा कोणत्या गोष्टी आहेत.
-बीबी पावडर
पावसाळ्यात वातावरणामुळे थंडावा येतो तरीही काही वेळेस आपला चेहरा चिकट होतो. तसेच काहींची त्वचा ही तेलकट होण्यासह त्यांना वातावरणाच्या बदलामुळे घाम ही येतो. त्यामुळे तुमच्या बॅगेत तुम्ही बीबी पावडर ठेऊ शकता. याला सुंगधी वास असण्यासह तुम्हाला फ्रेश लूक ही देते.
-फेस मिस्ट
तुमच्या चेहऱ्यावर थकवा, धूळ आणि तेलकटपणा येतो? त्यासाठी तुम्ही फेस मिस्टचा वापर करु शकता. मानेला, हातांवर ते स्प्रे करा. यामुळे तुमची त्वचा अगदी फ्रेश दिसेल.
–सनस्क्रिन
कोणताही ऋतू असो, तुम्ही सनस्क्रिन जरुर लावले पाहिजे. युवी किरणे ही तुमच्या चेहऱ्याच्या त्वलेचा घातक ठरतात. टॅनिग ते वेळे आधीच सुरकुत्या या सुद्धा सूर्य किरणांमुळे येतात. त्यामुळे सनस्क्रिन हे नेहमीच तुमच्या बॅगेत असू द्या.
हे देखील वाचा- फक्त चवच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे ‘असा’ चहा, तुम्हाला त्याबद्दल माहितीये का?
-परफ्यूम
मुलींच्या बॅगेत नेहमीच एक परफ्यूम असावा. जास्त मोठ्या आकाराचा नको पण मिनी परफ्यूम तरी बॅगेत ठेवा. अगदी सौम्य सुगंध असलेला परफ्युम कधीही उत्तम. कारण जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता आणि जरी भिजलात तरीही तुम्ही लावलेल्या परफ्यूममुळे तुमच्या कपड्यांना कुबट वास येणार नाही.(Beauty Tips)
-वॉटरप्रुफ क्रिम लिपस्टिक
पावसाळ्यात वॉटरप्रुफ लिपस्टिक जरुर ठेवा. खासकरुन अशा मुलींना ज्यांना मेकअप करायला खुप आवडते. काही लिपिस्ट अशा असतात ज्या लावल्यानंतर दीर्घकाळ टिकत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही जरी भिजलात आणि वॉटरप्रुफ क्रिम लिपस्टिक लावली असेल तरीही ती लगेच जाणार नाही.
-लहान रिकामा डबा
बॅगमध्ये नेहमीच एक लहान रिकामा डबा ठेवा. ज्यामध्ये तुम्ही तुमची ज्वेलरी किंवा एखादी लहान वस्तू सहज ठेवू शकता. खासकरुन जेव्हा तुम्ही पावसात भिजल्यास तुम्ही त्यात तुम्ही महागडी ज्वेलरी काढून ठेवू शकता.
-छत्री
पावसात प्रत्येकानेच छत्री आपल्यासोबत ठेवावी. नाहीतर भिजावे लागेल. छत्रीशिवाय तुम्ही घरातून निघालात आणि रस्त्यात अचानक पाऊस सुरु झाल्यास तुमच्या बॅगेतील महत्वाची कागदपत्र किंवा मोबाईल अशा गोष्टी भिजण्याची शक्यता असते.