साधुंच्या आयुष्यात फार चढउतार आणि कठीण परिस्थितींचा सामना करणे हे लिहिलेलेच असते. त्यामुळे कोणालाही साधु बनवणे हे शक्य नसते. मात्र एखाद्याने जर साधु बनवण्याचा निर्णय घेतला तर त्याला काही कायदे-नियमांचे पालन करावे लागते. ऐवढेच नव्हे तर साधुंच्या आयुष्यात काही नियम असतात आणि काही गोष्टींसाठी बंदी सुद्धा घातली गेलेली असते. तुम्ही बोलू सुद्धा शकत नाही जोपर्यंत तुम्हाला वास्तवात गरज असते. देशाशी-जगाशी काही संपर्क-देणेघेणं नसते. दिवसभरात सात वेळा प्रार्थना, अभ्यास किंवा प्रार्थना करणे अशी काही कामे असतात जी सामान्य आयुष्यापेक्षा फार वेगळी असतात. साधुंना आयुष्य हे एका चौकटीत जगावे लागते. असे सांगितले जाते की, एखादा साधु झाल्यास आणि त्याने एकदा मठात प्रवेश केल्यानंतर त्याला मृत्यूनंतरच सोडून दिले जाते. (Monk Drugs Test)
ड्रग्जच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळले भिक्षु
साधुंच्या आयुष्यात मनोरंजन सारख्या काही गोष्टी नसतात. ते आपल्या संपूर्ण दिवसभरात खुप व्यस्त असतात. ऐवढेच नव्हे तर मठात बुद्ध भिक्षु बनल्यानंतर मनोरंजन आण ड्रग्ज घेण्यावर सुद्धा बंदी असते. दरम्यान, थायलंड मध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथील सर्व भिक्षुकांची ड्रग्ज चाचणी करण्यात आली. त्यामध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. आता सर्वांना रिहॅबिलेशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. लोकल अथॉरिटीनुसार, थायलंड मधील एका बौद्ध मठातील सर्व भिक्षुकांना हे ड्रग्ज चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर हटवले आहे.
हे देखील वाचा- हिमाचल मधील ४ वर्षाचा ‘हा’ मुलगा होणार बुद्ध धर्मातील सर्वाधिक मोठा गुरु
रिहॅबमध्ये पाठवण्यात आले
मीडियात आलेल्या बातमीनुसार, जिल्हा अधिकारी बूनलर्ट थिंटापथाई यांनी असे म्हटले की, फेटचबुन प्रांतातील बंग सॅम फान जिल्ह्यातील एका मठात एक मठाधीश आणि चार भिक्षुकांची ड्रग्जची चाचणी पॉझिटिव्ह आली. मठाधीश मठात प्रशासकाचे पद सांभाळतात. अधिकाऱ्यांनुसार, सर्व भिक्षुकांना नशामुक्तीसाठी वैद्यकिय सुविधेसाठी नेण्यात आले आहे. सर्व भिक्षुकांना नशा मुक्ती केंद्रात पाठवले गेले आहे. कथित रुपात, भिक्षुकांनी केवळ ड्रग्ज घेतल्याचेच नव्हे तर डीलिंग सुद्धा केल्याचे कबुल केले आहे, भिक्षुकांनी डिटेक्टिव्ह यांनी असे म्हटले की, ते डीलिंग आणि सेवन ही करत आले आहेत.(Monk Drugs Test)
आतापर्यंत कोणत्याही भिक्षुकाची नेमणूक नाही
जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, मंदिरात आता कोणीही भिक्षुक नाहीत. त्यामुळे आसपासच्या ग्रामीण लोकांना चिंता आहे की, पुण्य आता मिळवता येणार नाही. खरंतर ग्रामीण लोकांची अशी मान्यता आहे की, पुण्य कमवण्यासाठी किंवा उत्तम कर्मांसाठी भिक्षुकांना भोज देणे आवश्यक आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, ग्रामीण लोकांना आपल्या धार्मिक नियमांचे पालन करण्यासाठी अन्य भिक्षुकांना मंदिरात पाठवतील. पण अद्याप एक ही भिक्षु मंदिरात नियुक्त करण्यात आलेला नाही.