सौदी अरेबियातील रियाध येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय सौदी फाल्कन आणि शिकार प्रदर्शन २०२५ मधील एका महागड्या विक्रीची चर्चा सुरु आहे. या प्रदर्शनात एक दुर्मिळ मंगोलियन गरुड चक्क १.५३ कोटी रुपयांला विकला गेला. हा गरुड एवढा लोकप्रिय होता की, त्याला घेण्यासाठी सौदीच्या सर्व भागातून मान्यवर उपस्थित होते. आतापर्यंत विकल्या गेलेल्या सर्वात महागड्या गरुडापैकी हा एक गरुड ठरला. अर्थात या पैशात एखादी मर्सिडीज गाडीही आली असती. (Mongolian eagle)

मात्र सौदीमध्ये शिकारी जातीच्या गरुडांना जबर किंमत मिळते. सौदी अरेबिया आणि अन्य आखाती देशांमध्ये, गरुड पक्षी ही श्रीमंतीची निशाणी मानली जाते. येथे गरुड असणे हा एक छंद नाही तर एक सांस्कृतिक आणि पारंपारिक व्यवसायही आहे. येथे गरुड पक्षी पाळण्यात येतात, आणि त्यांना ससा, तीतर, अन्य पक्षी आणि लहान वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. अरब देशांमध्ये गरुड पक्ष्यांसह शिकार करणे हे सन्मान आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच ‘आंतरराष्ट्रीय सौदी फाल्कन आणि शिकार प्रदर्शन २०२५’ मध्ये आलेला मंगोलियन गरुड विशेष ठरला. सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे आयोजित या प्रदर्शनात सर्वाधिक गर्दी या गरुडाला बघण्यासाठी झाली होती. त्यानंतर त्याचा लिलाव झाल्यावर त्यासाठी सौदीमधील अनेक प्रतिष्ठीतांनी हजेरी लावली. (International News)
या लिलावात हा गरुड १.५३ कोटीला विकला गेला. या मंगोलियन गरुडाची बोली १००,००० रियालपासून सुरू झाली आणि ६५०,००० रियालपर्यंत पोहोचली. आतापर्यंत विकल्या गेलेल्या सर्वात महागड्या गरुडापैकी हा गरुड ठरला. अरबी भाषेत, त्याला हुर कुरनुस म्हटले जाते. यातही मंगोलियन गरुडाला विशेष मागणी असते. कारण ते आकाराने मोठे असतात आणि अन्य गरुडांपेक्षा त्यांचे पंख लांब असतात. शिवाय मंगोलियन गरुडांची उडण्याची क्षमता आणि सहनशक्ती अधिक असते. हे गरुड दिसायलाही अधिक आकर्षक असतात. पांढऱ्या आणि गडद तपकिरी रंगाची त्यांची पिसे मोठी असतात. त्यामुळे हवेबरोबर उडणारे हे गरुड अधिक सुंदर दिसतात. शिवाय मंगोलियन गरुड हे विशम हवामानातही सहजपणे राहू शकतात. शिवाय खडबडीत भूभागातही उंच उडू शकतात आणि शिकार करु शकतात. या गरुडांमधील आणखी एक उत्तम गुण म्हणजे, हे गरुड लवकर शिकतात. त्यांना शिकारीचे प्रशिक्षण देणे फारसे अवघड नसते. (Mongolian eagle)

त्यामुळे व्यावसायिक आणि हौशी शिकारी मोठ्याप्रमाणात मंगोलियन गरुडांची खरेदी करतात. सौदी मध्ये जो मंगोलियन गरुड विक्रीसाठी आला होता. त्यासाठी एक विशिष्ट भाग सजवण्यात आला होता. त्याच्याबरोबर अन्य एक गरुड विक्रीसाठी आणण्यात आला होता. त्याचीही विक्री चढ्या किंमतीमध्ये झाली. हा गरुड त्यामानानं लहान होता. त्याची बोली ७०,००० रियाल पासून सुरु झाली. नंतर तो १२८,००० रियालला विकला गेला. या गरुडाचे अरबी नाव हूर फरख आहे. सौदी अरेबियामध्ये शिकारी गरुडांना प्रशिक्षित करण्यासाठी विशेष वर्ग आहेत. येथे अनेक वर्षांपासून गरुडांची स्पर्धा घेतली जाते. यात गरुड किती क्षमतेनं उडू शकतो. किती उंच उडू शकतो. किती लांबून हा गरुड आपली शिकार शोधतो, आणि गरुड आपल्या मालकाला कशापद्धातीनं ओळखतो, यावर स्पर्धेचा निकाल अवलंबून असतो. अरब देशांमध्ये अशी गरुडांची शिकार हा सामाजिक प्रतिष्ठा आणि जीवनशैलीचे प्रतीक मानले जाते. (International News)
=======
Donald Trump : ट्रम्पची दुधाची तहान ताकावर !
======
यात मंगोलियन गरुडाला कायम मोठी मागणी असते. पश्चिम मंगोलियाच्या बायान उल्गी प्रांतात रहाणा-या कझाक वांशिक गटात फाल्कनरी नावाची एका प्राचीन स्पर्धा घेतली जाते. यात १३ वर्षापासूनच्या वयोगटातील मुले सहभागी होतात. ही मुले या भागातील डोंगर कपा-यात असलेल्या अवघड जागी जाऊन गरुड पकडतात. एकदा गरुड पकडला की त्याला प्रशिक्षित केले जाते. यासाठी जेवढा लहान वयाचा गरुड तेवढा चांगला मानला जातो. गरुडाला पकडणारे त्याला घोड्यावरुन रपेट लावतात. नंतर घोड्यावरच बसून त्याला शिकार कशी करायची याचे प्रशिक्षण दिले जाते. काही वर्षानी पूर्णपणे वाढलेला गरुड हा शिकारीमध्ये स्वयंपूर्ण होतो. अगदी ससे आणि कोल्हेही तो मारु शकतो. काही गरुडाचे शिकारी हे त्याची विक्री करतात, तर काही त्याला दहा वर्ष ठेवल्यावर पुन्हा जंगलात सोडून देतात. (Mongolian eagle)
सई बने
