Home » ‘या’ देशात लावलं गेलंय पैशांचं झाड, पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

‘या’ देशात लावलं गेलंय पैशांचं झाड, पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

0 comment
Share

‘पैसे झाडाला लागत नाहीत, की जावा आणि तोडा…’, असे लोकांच्या तोंडून तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल. विशेषत: या महागाईच्या जमान्यात तुमचीही इच्छा असेल की, पैशाचे झाड लावावे आणि हवे तेव्हा तिथे जाऊन पैसे तोडून आणावे. पण तुम्हाला माहित आहे का, की ही केवळ एक म्हण नाहीये, तर जगात एक अशी जागा देखील आहे जिथे प्रत्यक्षात पैशाचे झाड आहे. विशेष म्हणजे, हे खास झाड पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. अशा परिस्थितीत आता जर कोणी तुमच्यासमोर पैशाच्या झाडाबद्दल बोलले, तर तुम्ही त्यांना सांगा की हे झाड कुठं आहे! (Money Tree)

‘या’ देशात आहे पैशाचे झाड

ज्या झाडाबद्दल आपण बोलत आहोत, ते युनायटेड किंगडमच्या स्कॉटिश हाईलँड शिखरावर आहे. हे पैशाचे झाड स्कॉटलंडमध्ये लावले गेले आहे, ज्याबद्दल आपण सहसा ऐकलेच असेल. हे झाड पूर्णपणे पैशाने भरगच्च आहे.

वाढत चाललीय पैशांची संख्या

या झाडावर पैशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, या झाडावरचा पैसा नैसर्गिकरित्या वाढत नाही, तर गुंतवला जातो. (Money Tree)

काय आहे या पैशाच्या झाडाचा इतिहास?

खरं तर, पैशांनी भरलेल्या या झाडाच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले, तर हे झाड १७०० वर्षे जुने आहे. हे असे झाड आहे, ज्याची प्रत्येक फांदी आणि प्रत्येक देठ नाण्यांनी झाकलेले आहे. 

झाडावर लोकांची श्रद्धा

लोकांची या झाडावर खूप श्रद्धा आहे. त्यामुळेच या झाडावर नाणी चिकटवण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. हे पैशांचे झाड पाहण्यासाठीही लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते आणि लोक मोठ्याप्रमाणात इथे येण्याचे हे देखील एक मोठे कारण आहे. (Money Tree)

‘यामुळे’ चिकटवली जातात नाणी

या झाडावर नाणी चिकटवण्यामागे एक मोठे कारण आहे. यावर नाणी चिकटवल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते, असे म्हणतात. त्याचबरोबर या झाडावर भुते राहतात असा काहींचा समज आहे. तर काहीजण याला धार्मिक वृक्ष मानून त्याची पूजाही करतात. (Money Tree)

तथापि, सत्य काय आहे याबद्दल स्पष्ट सांगता येणार नाही. लोक येतात आणि या झाडावर नाणी चिकटवतात, त्यामुळे हे झाड खूप प्रसिद्ध झाले आहे.

हे देखील वाचा: नदीतून बाहेर आलं हजारो वर्ष जुनं एक गूढ शहर, तेव्हाही होत्या उंच इमारती अन् टॉवर

झाडावर आहेत अनेक देशांची नाणी 

जंगलात असलेल्या या झाडाच्या प्रत्येक फांदीवर नाणी चिकटवली गेली आहेत. या झाडावर तुम्हाला प्रत्येक देशाचे चलन पाहायला मिळेल. यावरून हे स्पष्ट होते की, या झाडाची कीर्ती केवळ यूकेपुरती मर्यादित नाही. उलट अनेक देशांतील लोक या झाडाला भेट देण्यासाठी पोहोचतात. (Money Tree)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.