वैवाहिक आयुष्यात ज्या प्रमाणे प्रेम, काळजी आणि एकमेकांना समजून घेणे गरजचे असते त्याचसोबत मनी मॅनेजमेंट ही तितकेच महत्त्वाचे असते. पैशांशिवाय उत्तम आयुष्य जगण्याची कल्पना सुद्धा करणे फार मुश्किल आहे. एका वैवाहिक आयुष्यात पैशांसंदर्भात घेण्यात आलेले निर्णय सुद्धा नात्यावर परिणाम करतात. यामुळे पैशांबद्दल योग्य प्लॅनिंग आणि ते व्यवस्थितीत वापरणे हे फार महत्त्वाचे असते. यामुळे वैवाहिक आयुष्य आनंदी राहते. जर तुम्ही योग्य मनी मॅनेजमेंट केले तर भविष्यात याचा फार मोठा फायदा तुम्हाला आणि तुमच्या पुढील पिढीला सुद्धा होऊ शकतो. अशातच वैवाहिक आयुष्यात मनी मॅनेजमेंट कसे करायचे याच बद्दलच्या काही टीप्स आपण पाहणार आहोत. (Money management tips)
खर्चांवर एकत्रित बसून बोलणे
बहुतांश कपल्स मध्ये एकच व्यक्ती कमावणारा असते. त्यामुळे खर्चासाठी एकाच व्यक्तीवर निर्भर रहावे लागते. अशातच जेव्हा खर्चाची गोष्ट येते तेव्हा त्यावर न बोलल्यास घराचा बॅलेन्स बिघडला जातोच. पण त्याचसोबत नात्यात तणाव ही येऊ लागतो. अशातच नेहमी कपल्सने आपल्या खर्चाबद्दल एकत्रित बसून बोलले पाहिजे. जर दोघेही कमावत असतील तर भविष्यासाठी बचतीचे ऑप्शन पहावेत.
फालतू खर्च टाळावेत
कपल्सने फालतू खर्चापासून दूर रहावे. जर एकाकडून खर्च कंट्रोल करण्याचा विचार केला जातोय तर दुसऱ्या पार्टनरने याचा विचार केला पहिजे. सेविंग बद्दल विचार करावा.
बजेट प्लॅनिंग फॉलो करा
कपल्सने मिळून एक बजेट प्लॅनिंग केले पाहिजे. त्यानुसार प्रत्येक स्थितीत पैशांची काटकसर कशी करावी आणि बजेट फॉलो कसे करावे याबद्दल बोलले पाहिजे.
बचतीकडे लक्ष द्या
कपल्सने मिळून जे प्लॅनिंग केले आहे आणि आपले बजेट तयार केले आहे त्यानुसार फॉलो करण्याचा प्रयत्न करावे. आपल्या कमाईतील काही अंशी भाग हा बचत केलाच पाहिजे. (Money management tips)
पार्टनरला स्पेस द्या
ज्या प्रकारे नात्यात स्पेस देणे गरजेचे असतात त्याच प्रमाणे मनी मॅनेजमेंटमध्ये ही पार्टनरला स्पेस देणे गरजेचे असते. कधीच आर्थिक गोष्टींसाठी एकमेकांवर दबाव टाकू नये.
हेही वाचा- पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घेतलयं तर ‘या’ चुका टाळा
कोणतेही सीक्रेट ठेवू नका
एक उत्तम वैवाहिक आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर पार्टनरपासून कोणतीही गोष्ट लपवू नये. गरज भासल्यास एकमेकांना खर्चांबद्दल ही कळू द्यावे. कपल्समधअये पैशांवरुन कधीच भांडणे होऊ नयेत म्हणून खर्चाचे आधीच मॅनेजमेंट करावे.