पैसे सांभाळणे जेवढे कठीण नव्हे तेवढे ते कमावणे कठीण असते असे नेहमीच म्हटले जाते. पैशांची गुंतवणूक करणे, कुठे करावी हे जर तुम्हाला अचूक माहिती असेल तर तुम्ही नेहमीच आर्थिक मजबूत होता. मात्र जर असे कौशल्य तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कधीच आर्थिक मजबूत होऊ शकत नाहीत. तुम्हाला श्रीमंत होण्याचे पर्याय सुद्धा कळणार नाहीत. मात्र तु्म्ही बहुतांश लोकांबद्दल ऐकले असेल की, जी लोक करोडपती, अरबपती झाली होती त्यांना आपल्या एका चुकीमुळे सर्वकाही गमवावे लागले होते. सध्या अशाच एका व्यक्तीची जोरदार चर्चा सुरु आहे. ज्याने लॉटरी तर जिंकली, करोडपती ही झाला. पण नंतर असे काही झाले त्यामुळे त्याला आपली सर्व संपत्ती गमवावी लागली. (Money Lottery)
या व्यक्तीचे नाव आहे ली रयान. तो ब्रिटेनमध्ये राहणारा आहे. त्याने ब्रिटेनच्या तुरुंगात शिक्षा भोगण्यापूर्वी एका लॉटरीचे तिकिट काढले होते आणि तो त्यासाठी विजेता सुद्धा ठरला होता. सध्या तो एक पेंटर आणि डेकोरेटरच्या रुपात काम करतो. परंतु त्याच्या आयुष्यात अशी एक वेळ आली होती की तो झटक्यात करोडपती झाला होता.

Money lottery
खरंतर ही गोष्ट १९९५ मधील आहे. डेली स्टारच्या रिपोर्ट्सनुसार ली याने ६.५ मिलियन पाउंड म्हणजेच आजच्या हिशोबाने जवळजवळ ६८ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली होती. ती त्यावेळी ब्रिटेन मधील सर्वाधिक मोठी लॉटरी होती. ली ला यामुळे ऐवढा आनंद झाला होता की, त्याला कळत नव्हते की, त्या पैशांचे नक्की काय करावे. त्याने एखाद्या श्रीमंत व्यक्तीसारखे आलिशान आयुष्य जगण्यास सुरुवात केली होती. सर्वात प्रथम त्याने आलिशान बंगला खरेदी केला. त्यानंतर डुकाटी सुपरबाइक, एक हेलिकॉप्टर आणि काही आलिशान गाड्या सुद्धा खरेदी केल्या, मात्र २०१० मध्ये तो अचानक कंगाल झाला. त्याकडे राहण्यासाठी घर सुद्धा राहिले नाही. तो बेघर ढाला. तेव्हा त्याला पश्चिम लंडन मधील रस्त्यावरील झोपडीत राहत असल्याचे पाहिले गेले.

Money lottery
रिपोर्ट्सनुसार, ली ने तुरुंगाची शिक्षा भोगली होती. हैराण करणारी गोष्ट अशी की, बंपर लॉटरी जिंकल्याच्या ९ महिन्यानंतर त्याला कार चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तो दीर्घकाळ तुरुंगातच होता. मात्र ली असे म्हणतो की, हे पहिल्यांदा असे झाले नव्हते जेव्हा त्याला तुरुंगाची शिक्षा दिली गेली. तो १९८६ मध्ये सुद्धा तुरुंगात गेला होता. (Money Lottery)
हेही वाचा- तृतीयपंथ्यांकडून मिळालेल्या 1 रुपयाचे ‘हे ‘ आहे महत्त्व
ली आजही असे म्हणतो की, त्याला विश्वास आहे त्याचे नशीब पुन्हा एकदा पालटले जाईल आणि त्याला बंपर लॉटरी लागेल. मात्र आता तो असे म्हणतो की, जर तो पुन्हा करोडपती झाला तर त्याला सर्वात प्रथम बेघर लोकांसाठी एक हॉटेल सुरु करायचे आहे. त्यांची त्याला मदत करायची आहे.