भारत किंवा अन्य देशांमध्ये तुम्ही जे काही पैसे कमावता त्याच्या हिशोबाने तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. या व्यतिरिक्त तुम्हाला हे सुद्धा सांगावे लागते की, तुम्ही हे पैसे कशाप्रकारे कमावले. सोर्स ऑफ इन्कम लपवणे, टॅक्स भरण्यापासून बचाव आणि अवैध पद्धतीने पैसे कमावण्यासाठी लोक विविध मार्ग अवलंबतात. मनी लॉन्ड्रिंग (money laundering) हा सुद्धा त्यापैकीच एक प्रकार आहे. जसे की, मनी लॉन्ड्रिंग म्हणजे पैशांची धुलाई. थोडक्यात काय काळा पैसा, जो विविध मार्गाने व्हाइट म्हणजेच वैध धनात बदलला जातो.
टॅक्स पासून बचाव करण्यासाठी, बनावट गुंतवणूक आणि खर्च दाखवणे, चुकीच्या मार्गाने दुसऱ्या देशात घेऊन जाणे आणि कायद्याचे उल्लंघन करत तेच पैसे दुसऱ्या मार्गाने आणण्यासाठी काही प्रकारचे लोक काम करतात. खरंतर गेल्या काही काळापासून आपण पाहिले की, एखाद्याच्या घरात हजारो-कोटी रुपयांची कॅश मिळणे पण त्याचे उत्पन्न हे मध्यम आहे. या व्यतिरिक्त काही लोक चुकीच्या मार्गाने पैसा कमावतात आणि तेच पैसे दुसऱ्या मार्गाने आपल्याकडे ठेवतात.
सध्या देशात विविध राज्यातील काही नेतेमंडळी आणि मंत्री मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्याअंतर्गत तुरुंगात बंद आहेत. मनी लॉन्ड्रिंग संबंधित प्रकरणात हल्लीच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली. तर दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहे. आणखी काही नेत्यांना सुद्धा या प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे.
मनी लॉन्ड्रिंग का करतात?
अवैध पद्धतीने कमावलेला पैसा कायद्याअंतर्गत घेऊन येणे, अशा प्रकारे कमावलेला पैसा एजेंसिच्या नजरेतून वाचणे आणि या पैशांवरील टॅक्स वाचणे. या अशा काही गोष्टी आहेत ज्या मनी लॉन्ड्रिंगची प्राथमिक कारणे आहेत. या व्यतिरिक्त दहशतावादी हालचाली आणि अपराधिक कृत्यांसाठी पैसे उपलब्ध करुन देण्यासाठी सुद्धा मनी लॉन्ड्रिंगचा वापर केला जातो. अशा काही गोष्टी सुद्धा आहेत ज्या पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या कामांसाठी वापरण्यात येणारा पैसा सुद्धा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून चॅनलमध्ये आणला जातो. जेणेकरुन ज्याच्याकडून पैसा पुरवला जात आहे त्याने नाव समोर येऊ नये.(money laundering)
हे देखील वाचा- बंगाल मधील SSC घोटाळ्याचे नेमके काय प्रकरण? ज्यामुळे अभिनेत्री अर्पिता मुखर्जी आहे चर्चेत
कशा प्रकारे केली जाते मनी लॉन्ड्रिंग?
-अवैध पद्धतीने पैसा एकत्रित केला जाते, खासकरुन हा पैसा कॅशमध्ये असतो
-हा पैसा बनावट कंपन्यांमध्ये गुंतवला जातो
-मनी लॉन्ड्रिंग करणारे एजेंट हे विविध शेल कंपन्या तयार करुन त्यात पैसे टाकतात
-हे पैसे विविध देशात पाठवले जातात जेथे टॅक्स संबंधित नियम अगदी सोप्पे असतात
-उदाहरणार्थ, पनामा सारख्या देशात, जेथे बनावट कंपन्यांच्या नावावर बक्कळ पैसे लपवले जातात
-त्यानंतर हेच पैसे भारतातील कंपन्यांमध्ये गुंतवणूकीसाठा आणले जातात
-हे पैसे अशा प्रकारे फिरवले जातात की त्यांचा सोर्सचा पत्ताच लागत नाही आणि हा पैसा बनवणारा सुद्धा बचावतो
काय होते शिक्षा?
मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत दोषी आढळल्यास त्यांच्याकडील सर्व पैसा हा जप्त केला जातो. या पैशांनी खरेदी केलेली माया सील केली जाते. त्यावर भारत सरकार आपले हक्क दाखवतो. या व्यतिरिक्त मनी लॉन्ड्रिंग आणि हेरफेरमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना सुद्धा दोषी मानत त्यांना ही शिक्षा सुनावली जाऊ शकते.