मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी म्हणतात. मोक्षदा एकादशीचे महत्त्व इतर एकादशींपेक्षा जास्त आहे, याचे कारण म्हणजे, या एकादशीच्या दिवशी कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती. दरवर्षी मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती हे सण एकाच दिवशी साजरे केले जातात. या एकादशीच्या नावातच मोक्ष आहे, त्यामुळे मोक्षदा एकादशीला विष्णूची पूजा आणि उपवास करणाऱ्यांना वैकुंठाचे दरवाजे उघडले जातात अशी मान्यता आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशी ही १ डिसेंबर रोजी साजरी केली जाईल. याच दिवशी गीता जयंती देखील साजरी होणार आहे. मान्यतेनुसार मोक्षदा एकादशीला भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केल्याने जीवनात समृद्धी येते. यादिवशी जर काही छोटे सोपे उपाय केले तर त्याचे शुभ आणि लाभदायक परिणाम तुमच्या जीवनात दिसून येतात. (Mokshada Ekdashi)
– मोक्षदा एकादशीच्या दिवशी ओम भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि। ओम भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि। या मंत्राचा जप केल्याने आर्थिक भरभराट होते. (Marathi News)
– मोक्षदा एकादशीच्या दिवशी पांढऱ्या हत्तीची मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मकता उर्जा येते तसेच पैशांचा ओघ वाढतो. तुम्हाला हवं असेल तर ही मूर्ती तुम्ही घराच्या देवघरात ठेवू शकता किंवा घराच्या ईशान्य दिशेला ठेवू शकता. हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहील आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल. (Top Stories)
– मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा आणि २१ वेळा प्रदक्षिणा घालून ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. हा उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल. (Todays Marathi Headline)

– मोक्षदा एकादशीला भगवान विष्णूंना अर्पण केलेली तुळशीची पाने पाण्यात बुडवावीत किंवा पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवावीत. कारण तुळशीला मोक्ष देणारी देखील मानले जाते. ही प्रथा पूर्वजांना प्रसन्न करते. (Marathi News)
– मोक्षदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला किंवा पिंपळाच्या झाडाखाली तुमच्या पूर्वजांच्या नावाने शुद्ध तुपाचा दिवा लावा. या दिवशी तुमच्या पूर्वजांना दिवे अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात.
– मान्यता आहे की, मोक्षदा एकादशीच्या दिवशी गरीब, गरजू किंवा अनाथांना अन्न, कपडे किंवा धनदान केल्याने मोक्ष प्राप्त होतो. मोक्षदा एकादशीचे व्रत श्रद्धा आणि भक्तीने केल्यास पापमुक्ती, मानसिक शांती आणि जीवनातील सकारात्मक उर्जा प्राप्त होते. (Top Marathi News)
– मोक्षदा एकादशीच्या दिवशी पिवळ्या फुले, तुळस, दिवे आणि धूप यांनी भगवान विष्णूची पूजा करावी. विष्णू सहस्रनाम, गीता आणि विष्णू मंत्राचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. संध्याकाळी भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण करावीत.
– मोक्षदा एकदशीच्याच दिवशी गीता जयंती येत असल्याने या दिवशी श्रीमद्भगवद्गीतेचे पठण करावे. यामुळे पुण्यफळ मिळते आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. (Latest Marathi HEadline)
========
Lord Vishnu : नव्या वर्षात कधी आहे, अधिक महिना !
Gita Jayanti : जाणून घ्या गीता जयंतीचे महत्त्व
========
मोक्षदा एकादशीच्या ‘हे’ करू नका
* मोक्षदा एकादशीला लसूण, कांदा किंवा इतर तामसिक पदार्थ काऊ नये.
* मोक्षदा एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजेच भात खाऊ नये. (Top Trending News)
* मोक्षदा एकादशीच्या दिवशी केस व नखे कापणे अशुभ मानले जाते.
* या दिवशी कुटुंबातील व्रत करणाऱ्यासोबत इतरांनीही सात्विक भोजन करावे.
* मोक्षदा एकादशीच्या दिवशी दुपारी झोपू नये.
* या दिवशी कोणाकडून काहीही उधार घेऊ नये.
* या दिवशी हिंसा करू नये.
* मोक्षदा एकादशीला कोणत्याही झाडावरची फुले, फळे किंवा पाने तोडू नयेत. (Social News)
(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. कोणतेही उपाय तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
