Moisturizer according to skin : मॉइश्चराइजर त्वचेवर सुरक्षा कवचप्रमाणे काम करते. त्वचेवरील बाहेरच्या लेअलरला मॉइश्चराइजरमुळे मजबूतपणा मिळतो. वाढत्या वयानुसार त्वचेमधील कोलेजन आणि इलास्टिनचे प्रमाण कमी होऊ लागते. यामुळे त्वचेवर सुरकुत्या आणि एजिंग साइन्स दिसून येऊ लागतात. कोरड्या त्वचेमुळेही सुरकुत्या आणि फाइन लाइन्ससारखी समस्या होऊ शकते. पण मॉइश्चराइजरच्या दररोजच्या वापरामुळे त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते. जाणून घेऊया स्किन टाइपनुसार कशाप्रकारचे मॉइश्चराइजर खरेदी करावे याबद्दल सविस्तर…
सामान्य त्वचा
ज्या व्यक्तींची त्वचा सामान्य किंवा कॉम्बिनेशन असते त्यांनी जेल किंवा क्रिम बेस्ड मॉइश्चराइजरचा वापर करावा. यामुळे त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते. याशिवाय पिंपल्सची समस्याही कमी होते.
तेलकट त्वचा
तेलकट त्वचा असणाऱ्यांना असा प्रश्न पडतो की, मॉइश्चराइजरचा वापर करावा की नाही. यासाठी ऑइल फ्री असणाऱ्या मॉइश्चराइजरचा वापर करू शकता. याशिवाट लाइट वेट,जेल रुपातील मॉइश्चराइजरचा पर्यायही निवडू शकता.
कोरडी त्वचा
कोरडी त्वचा असणाऱ्यांनी क्रिमी मॉइश्चराइजरचा वापर करावा. दिवसातून दोन ते तीन वेळा मॉइश्चराइजर जरुर लावावे. (Moisturizer according to skin)
स्किन टाइप सर्वप्रथम ओळखा
मॉइश्चराइजर खरेदी करण्याआधी तुमचा स्किन टाइप ओखळणे अत्यावश्यक आहे. काहींना स्वत:च्या स्किन टाइपबद्दल माहिती नसते. यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या मॉइश्चराइजरचा वापर करतात. स्किन एक्सपर्ट्स असा सल्ला देतात की, स्किन टाइप समजून न घेतल्याशिवाय मॉइश्चराइजर खरेदी करू नये. स्किन टाइप समजून घेण्यासाठी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर एखादी क्रिम त्वचेवर लावून ठेवा. क्रिम त्वचेवर व्यवस्थितीत एब्जॉर्ब झाल्यास त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. पण त्वचेवर क्रिम राहिल्यास तर त्वचा तेलकट असू शकते.