सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ‘सौदी व्हिजन 2030 प्रोजेक्ट’ जाहीर केला आणि अवघ्या जगभरातून सौदीमध्ये जाणाऱ्या गर्भश्रीमंत पर्यटकांमध्ये वाढ झाली. हजारोंनी सौदीमध्ये गुंतवणूक करण्यास पुढाकार घेतला. मात्र आता प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे हे स्वप्न हजारो मजूरांच्या जीवावर बेतल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण या ‘सौदी व्हिजन 2030 प्रोजेक्ट’ च्या उभारणीपासून 20 हजाराहून अधिक मजूरांनी जीव गमावला आहे. त्यातच या प्रोजेक्टमुळे सौदीचे आर्थिक समिकरण बिघडल्याचीही टिका करण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट थांबवावा अशी मागणी सौदीमध्ये जोर पकडू लागली आहे. (Prince Mohammed Bin Salman)
सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे सत्तेची धुरा आल्यावर त्यांनी सौदीमध्ये अनेक बदल करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये ‘सौदी व्हिजन 2030 प्रोजेक्ट’ हे महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट मानले गेले. सुरुवातील यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांची रांग सौदीच्या दारात लागली होती. मात्र आता या प्रोजेक्टवर स्थानिकांकडूनच होत असलेल्या टिकेमुळे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे हे स्वप्न अर्धवट रहाणार अशी चर्चा आहे. सौदीच्या वाळवंटाच्या मधोमध नंदनवन उभं करणारा हा प्रोजेक्ट आहे. एक अत्याधुनिक असे शहर यात उभारले जात आहे. व्हिजन 2030 अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या या शहरासाठी त्यांनी लाल समुद्राजवळील किनारपट्टीचा भाग निवडला आहे. गेल्या आठ वर्षापासून या प्रोजेक्टचे काम सुरु असून त्यासाठी 20 हजाराहून अधिक मजदूरांनी आपला जीव गमावला आहे. या प्रोजेक्टवर काम करणा-या मजदूरांची अतिशय दारुण अवस्था आहे. या मजदूरांना आशियाई देशांतून अतिशय कमी मजदूरीवर आणण्यात येते. (International News)
तसेच या कठीण वातावरणात त्यांच्याकडून अतिरिक्त काम करुन घेण्यात येत आहे. यासंदर्भात अनेक संघटनांनी टिका करत सौदी प्रिन्सच्या या प्रोजेक्टचा उल्लेख मजदुरांचे कब्रस्तान असा केला आहे. ‘सौदी व्हिजन 2030 प्रोजेक्ट’ अंतर्गतच निओम हे जादुई शहरही उभारण्यात येत आहे. सौदी अरेबियाला जागतिक पर्यटनाचे केंद्र म्हणून रुपांतरित करण्यात भविष्यात या निओम शहराचा समावेश असणार आहे. ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाच्या उभारणी दरम्यान 1 लाखांहून अधिक कामगार बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे अनेक मानविधिकार संघटना यावर टिका करीत आहेत. या सर्व प्रकल्पांवर सौदीच्या स्थानिक नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. कारण या प्रकल्पासाठी जी हजारो एकर जमिन घेण्यात आली आहे, त्यातून अनेक मुळ सौदीचे नागरिकच स्थलांतरित आयुष्य जगत आहेत. (Prince Mohammed Bin Salman)
25 एप्रिल 2016 रोजी सौदी सरकारने सर्वप्रथम याची घोषणा केली. त्यानंतर क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी 2017 मध्ये या प्रकल्पाची कल्पना जगासमोर ठेवली. सुरुवातील पर्यावरण मुक्त पहिले शहर म्हणून या प्रकल्पाचा उल्लेख करण्यात येत होता. लाल समुद्राच्या उत्तरेकडील टोकावर, इजिप्तच्या पूर्वेला, अकाबाच्या आखात आणि जॉर्डनच्या दक्षिणेपर्यंत या प्रकल्पाची व्याप्ती आहे. सौदी अरेबियाच्या वास्तविक जीडीपीमध्ये तेलाचा वाटा 43% आहे. मात्र भविष्यात तेलावर अवलंबून असणारी सौदीची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या बेतात असणार आहे. कारण तेलाचे साठे कायमस्वरुपी रहाणार नाहीत. अशावेळी सौदीची आर्थिक व्यवस्था मजबूत राहिल म्हणून सौदीचे जागतिक पर्यटन क्षेत्रामध्ये नाव उंचावण्याचा प्रयत्न सुरु झाला. तेल संसाधनावरील अवलंबित्व कमी करण्याचा एक भाग म्हणून ‘सौदी व्हिजन 2030 प्रोजेक्ट’ ची जाहीरात करण्यात आली. (International News)
======
हे देखील वाचा : मंजिरींना सुद्धा गुप्तहेर म्हणून वापरतात ?
====
यातूनच सौदी अरेबियालाजागतिक गुंतवणूक शक्ती बनणे आणि देशाचे स्थान आफ्रो-युरेशियाला जोडणाऱ्या केंद्रामध्ये बदलणे, ही उद्दीष्टेही ठेवण्यात आली आणि सौदीमध्ये अनेक प्रकल्प सुरु झाले. या सर्व प्रकल्पावर भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळमधील कामगार काम करत आहेत. त्य़ातील अनेक कामगार बेपत्ता झाल्याची नोंद आहे. सौदीच्या या प्रोजेक्टमध्ये अशा अनेक इमारती आहेत, की ज्या स्वप्नवत वाटणार आहेत. तेथील मनोरंजन केंद्रांमध्ये जगातील सर्वात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध रहाणार आहेत. त्यासाठी जगभरातील हजारो इंजिनिअरही काम करत आहेत. या मजदूरांपासून अभियांत्यांपर्यंतच सगळ्यांना चोवीस तास काम करावे लागते. सतत काम केल्यानं अनेकांना थकवा येतो, आजारपण येते, मात्र या सर्वांसाठी योग्य आणि पुरक अशी आरोग्य व्यवस्थाच नसल्यानं या कामगारांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. (Prince Mohammed Bin Salman)
सई बने