बहुतांश जणांना पुस्तक वाचनाची फार आवड असते. त्यामुळे एखाद्या लायब्ररीतून किंवा किताबखान्यातून विविध विषयांची पुस्तक आणून ती आवर्जून वाचली जातात. कारण पुस्तक ही एका मित्रासारखी असतात. एकटं असलो तरीही ती नेहमीच आपल्यासोबत असतात. पुस्तकातून आपल्याला ज्ञान मिळतेच पण आयुष्यातील घडामोडींची कथा सुद्धा काही वेळेस पुस्तकातून उलगडली जाते. सध्या फिजिकल रुपात पुस्तक वाचण्याचा कंटाळा येत असेल तर डिजिटल पद्धतीने पुस्तक ही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे सर्व साध्य झालेयं ते म्हणजे फक्त तंत्रज्ञानामुळेच. अशातच दुबईतील अशी एक लायब्रेरी जी हायटेक आहेच. पण तेथे रोबोटच्या माध्यमातून आपल्याला पुस्तकांची निवड करता येते.मोहम्मद बिन राशिद असे दुबईतील या हायटेक लायब्रेरीचे (Mohammed bin rashid library) नाव आहे.
तंत्रज्ञानाच्या जोरावरच ही लायब्रेरी अत्यंत हायटेक असून येथे दिली जाणारी सुविधा ही अन्य दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी मिळत नाही. दुबईतील राशिद लायब्रेरीत तब्बल 11 लाख पुस्तक आहेत.या व्यतिरिक्त 60 लाखांहून अधिक निबंध, 73 हजार गाण्याच्या नोट्ससह काही लिट्रेचर ही आहेत. पुस्तकप्रेमींसाठी ही लायब्रेरी तर स्वर्गाहून मोठी आहे. त्यामुळे पुस्तरकप्रेमींनी नक्कीच येथे एकदा भेट द्यावी.
हे देखील वाचा- चुकूनसुद्धा वाचू नका ही ३ रहस्यमयी पुस्तके, वाचाल जाल सैतानाच्या ताब्यात!
खलीज टाइम्सच्या एका रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद बिन रशिद लायब्रेरीत (Mohammed bin rashid library) 75 हजार व्हिडिओ, 5 हजार पांडुलिपीसह 35 हजार वृत्तपत्रांच्या प्रत वाचण्यासाठी मिळतात. या व्यतिरिक्त येथे 325 वर्ष जूनी असलेली पुस्तक ही पुस्तकप्रेमींसाठी ठेवण्यात आली आहेत. या लायब्रेरीत फक्त फिजिकल पुस्तकच नव्हे तर डिजिटल पुस्तकांचा सुद्धा समावेश आहे. या लायब्रेरीला भेट देणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर ही करण्यात आला आहे. म्हणजेच येथे रोबोटिक गाइडच्या मदतीने आपल्या आवडीची पुस्तक निवडता येतात. यासाठी येथे AI कियोस्क सुद्धा लावण्यात आले आहेत.
दुबईतील ही लायब्रेरी ऐवढी प्रशस्त आहे की. येथे येणाऱ्या प्रत्येकाला पुस्तकांपर्यंत पोहचण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. उंचच उंच पुस्तकांचे शेल्फ येथे असल्याने तेथपर्यंत ही पोहचण्यासाठी शेल्फला ऑटोमॅटिक सिस्टिमला जोडले गेले आहे. म्हणजेच येथे येणाऱ्या प्रत्येकाला बटणाच्या माध्यमातून शेल्फच्या जवळ पोहचता येते. तसेच शेल्फ मधील पुस्तक ज्या ठिकाणी ठेवले आहे तेथ पर्यंत ही जाण्याची सुविधा आहे. या लायब्रेरीत लहान मुलांसाठी सुद्धा काही खास पुस्तक आहेत. या व्यतिरिक्त प्रत्येक 3 महिन्यात दुबईतील फोटोंसंदर्भातील एक प्रदर्शन ही भरवले जाते. ज्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला दुबईतील सौंदर्याबद्दल अधिक माहिती मिळेल.