Home » Narendra Modi : वाढदिवस खास! आंतरराष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदींना मिळालेले पुरस्कार

Narendra Modi : वाढदिवस खास! आंतरराष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदींना मिळालेले पुरस्कार

by Jyotsna Kulkarni
0 comment
Narendra Modi
Share

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरातून त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहे. सोशल मीडिया देखील मोदीमय झाले असून, सर्वत्र फक्त ‘नमो’ हीच चर्चा होते. सध्या मोदींची देशासोबतच विदेशात देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. त्यांचे अनेक निर्णय खूपच गाजताना दिसत आहे. भारतात २०१४ साली मोदी लाट आली जी आजतागायत कायम आहे. (Todays Marathi Headline)

मोदी हे फक्त नेते नाही तर उत्तम वक्ते, विचारवंत, साहित्यिक, लेखक आहे. त्यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले, ज्यामुळे भारताचा चेहरा खऱ्या अर्थाने बदलला. मोदी हे फक्त भारतातच लोकप्रिय आहे, असे अजिबातच नाही. त्यांनी जगभरात आपली ओळख कमवत, प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे तर नरेंद्र मोदी यांची गणती जगातील शक्तिशाली आणि लोकप्रिय नेत्यांमध्ये होते. त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक लहान मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

मोदी यांना २६ पेक्षा अधिक देशांनी त्यांचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन गौरवले आहे. इतकेच नाही तर, २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांना लागोपाठ अनेक देशांकडून त्यांचे सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळालेले आहेत. काही मुस्लीम बहुल देशांनीही मोदी यांचा गौरव केला आहे. एवढे पुरस्कार मिळवणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. जाणून घेऊया त्यांना आजवर मिळाले पुरस्कार. (Top Trending News)

Narendra Modi

> २४ ऑगस्ट २०१९ रोजी, पीएम मोदींना बहरीनने ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स’ने सन्मानित केले.
> २२ मे २०२३ रोजी, फिजीने आपला सर्वोच्च नागरी सन्मान, ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ प्रदान केला.
> १४ जुलै २०२३ रोजी फ्रान्सने पंतप्रधान मोदींना ‘लीजन ऑफ ऑनर’ने सन्मानित केले.
> २०१९ रोजी पंतप्रधान मोदींना पहिला फिलिप कोटलर राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
> २०१८ साली पंतप्रधान मोदींना बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन कडून ग्लोबल गोलकीपर पुरस्कार युनायटेड नेशन्स चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले होते. (Top Stories)
> २०२१ साली पंतप्रधान मोदींना जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार देण्यात आला होता.
> सौदी अरब – ऑर्डर ऑफ किंग अ ब्दुलअजीज अल सऊद
> संयुक्त अरब अमीरात – ऑर्डर ऑफ जायेद
> रशिया – ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू
> ब्राझील – ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द साउदर्न क्रॉस
> घाना – ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना
> मालदीव – ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रूल ऑफ निशान इज्जुद्दीन
> बहारीन – किंग हमद ऑर्डर ऑफ द रिनेसां
> अमेरिका – लीजन ऑफ मेरिट (Marathi News)
> सायप्रस – ड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस थर्ड
> मॉरिशस – ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार एंड की ऑफ द इंडियन ओशन
> कुवैत – ऑर्डर मुबारक अल कबीर,
> गयाना – ऑर्डर ऑफ द फ्रीडम
> नायजेरिया – ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द फेडरल रिपब्लिक
> डोमिनिका – डोमिनिका अवार्ड ऑफ ऑनर
> ग्रीस – ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर (Top Marathi News)
> पॅलेस्टाईन – ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन
> अफगानिस्तान – स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्लाह खान
> इजिप्त – ऑर्डर ऑफ द नाईल
> नामिबिया – ऑर्डर ऑफ द मोस्ट एंशिएंट वेलविट्सकिया मिरेबिलिस
> त्रिनिदाद व टोबैगो – र्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद एंड टोबैगो
> पलाऊ – एबाकल अवॉर्ड
> पापुआ न्यू गिनी – ऑर्डर ऑफ लोगोहू
> फिजी – कंपैनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी
> भूतान – ऑर्डर ऑफ द द्रुक ग्यालपो
> तिमोर – लेस्ते ग्रँड ऑर्डर ऑफ तिमोर-लेस्ते (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.