Home » फोनचा अधिक वापर जीवघेणा ठरेल

फोनचा अधिक वापर जीवघेणा ठरेल

by Team Gajawaja
0 comment
Mobile Use Causes
Share

ज्या प्रकारे लाइफस्टाइल बदलत चालली आहे त्यानुसार काही प्रकारचे गंभीर आजार व्यक्तीला होत आहेत. व्यक्तींना ब्लड प्रेशर, मधुमेह, हार्ट डिसीज होऊ लागले आहेत. लाइफस्टाइलमध्ये सुधारणा करणे सध्याच्या घडीला फार महत्वाचे झाले आहे. परंतु ही सवय सुधारली नाही तर काही आजारांचा सामना करावा लागेल, असे बहुतांश अभ्यासातून समोर आले आहे. मात्र आता एका नव्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, मोबाईलच्या दीर्घकाळ वापर हा शरिरासाठी घातक आहे. या स्टडीत जे फॅक्ट्स समोर आले आहेत ते हैराण करणारे आहेत. (Mobile Use Causes)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, युरोपियन सोसायटी ऑउ कार्डियोलॉजीने या संबंधित एक रिपोर्ट जारी केला. रिपोर्टनुसार, प्रत्येक आठवड्याला ३० मिनिट किंवा त्यापेक्षा अधिक वेळ मोबाईलचा वापर केल्यास ब्लड प्रेशरचा धोका उद्भवतो.

सदर्न मेडिकल युनिव्हर्सिटी, ग्वांगझू चीनचे अध्ययन लेखर प्रोफेसर जियानहुई किन यांनी असे सांगितले की, लोक ज्या प्रकारे गरजेपेक्षा अधिक मोबाईलचा वापर करतात त्यामुळे हार्ट अटॅकची समस्या उद्भवू शकते. यामुळेच अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

तज्ञांनुसार, मोबाईलचा वापर करताना रेडियोफ्रिक्वेंसी एनर्जीचा लो लेवर रिलिज करतात. यामुळे ब्लड प्रेशनचा धोका अधिक वाढला जातो. नव्या अभ्यासात फोन घेणे, फोन करणे या संदर्भात ही अभ्यास करण्यात आला. स्टडीत युके बायोबँकच्या डेटाचा वापर करण्यात आला.अभ्यासकांनी काही दृष्टीकोनातून यावर तपास केला. त्यांनी वय, लिंग, बॉडी मास इंडेक्स, स्मोकिंग हिस्ट्री, ब्लड प्रेशर हिस्ट्री, ग्लुकोजचा स्तर आणि फोनचा वापर यावर तपास केला. त्यानंतरच फोनचा अधिक वापर आणि ब्लड प्रेशर संबंधित तपास केला गेला.(Mobile Use Causes)

हेही वाचा- रोगांच्या पेशी नष्ट करू शकते आणि ट्यूमर तयार होण्यापासून थांबवू शकते

तसेच युरोपियन हार्ट जर्नल डिजिटल हेल्थच्या रिपोर्टनसुसार मोबाईल फोनचा वापर आणि हायपर टेंन्शचा थेट संबंध असल्याचे समोर आले. २१२,०४६ लोकांच्या डेटावर करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये त्या लोकांना घेण्यात आले जे युके बायोबँकेचा हिस्सा होते. युरोपीय केंद्रित या शोधात सामान्यत: वापरला जाणारा डेटा सेट केलेला आहे. संशोधनादरम्यान संशोधकांना असे दिसले की, जी लोक मोबाईलचा ३० ते ५९ मिनिट वापर करतात त्यांच्यामध्ये उच्च रक्तदाबचा धोका ८ टक्के असतो. या व्यतिरिक्त १-३ तास फोनवर घालवणाऱ्यांमध्ये १३ टक्के, ४ ते ६ तास मोबाईलचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये १६ टक्के आणि प्रत्येक आठवड्याला ६ तास मोबाईलचा वापर करणाऱ्यांमध्ये हाय ब्लड प्रेशरचा धोका २५ टक्क्यांपर्यंत असतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.