वेगाने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाच्या जगात प्रत्येक दिवशी नवं काहीतरी पहायला मिळते. अशातच मोबाईल तर प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग झाला आहे. मोबाईल डिवाइसच्या पोर्टेबिलिटीने फोनवर अधिक विश्वास ठेवण्यास मजूर केले आहे. यामध्ये वेब सर्फिंग, अपॉइंटमेंट बुक करायची असो किंवा अन्य काही काम असो. प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीसाठी मोाईलचा वापर करत आहे. अशातच गरजेपेक्षा अधिक मोबाईलचा वापर केल्यास आपण त्याचा गैरफायदा ही हल्लेखोरांकडून घेतला जाऊ शकतो. कारण आपले त्यामध्ये महत्वाचे पासवर्ड, लॉगिन डिटेल्स असातत. जे हॅकर्स अगदी सहज तुमच्याकडून चोरू शकतात.(Mobile Security Tips)
याच कारणास्तव आपल्याला फार मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते, त्यामुळे काही सिक्युरिटी थ्रेटमध्ये मोबाईलसाठी डिझाइन करण्यात आलेले मॅलवेअर म्हणजेच वर्म्स आणि स्पायवेअर, अनअथॉराइज्ड एक्सेस, फिगिंश आणि चोरीचा समावेश आहे. अशातच आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे डिवाइस डिजिटल धोक्यांपासून दूर राहू शकते.
-एक स्ट्राँन्ग पासवर्ड सेट करा
एक स्ट्राँन्ग पासवर्ड आणि बायोमेट्रिक फिचर्स जसे की, फिंगरप्रिंट ऑथेंटिकेटर, अनथॉथराइज्ड एक्सेस सुद्धा करणे कठीण होते. तुमचा पासवर्ड आठ किंवा त्यापेक्षा अधिक कॅरेक्टर्सचा असावा. परंतु त्यामध्ये अल्फान्युमेरिक कॅरेक्टर्स असावेत.
-मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन
जर तुमचा मोबाईल टू-फॅक्टर ऑथेंटिकेशला परवानगी देत असेल तर त्याचा अधिक वापर करु नका. जेव्हा मोबाईलमध्ये 2FA अनेबल असेल तेव्हा काही अॅप्स किंवा वेबसाइटच्या येथे लॉग इन करतेवेळी दुसऱ्या मेथडचा वापर करत ऑथेंटिकेट करण्याची गरज असेल.
-वीपीएनचा वापर
ज्या नेटवर्कशी कनेक्ट असाल त्याचा सिक्युरिटी स्टेटस संदर्भात माहिती नसेल तर वीपीएन क्लाइंटचाच वापर करा. एक वीपीएन तुम्हाला एका नेटवर्कशी सुरक्षितपणे कनेक्ट करेल.(Mobile Security Tips)
-आपले डिवाइस एन्क्रिप्ट करा
बहुतांश मोबाईल हे इन-बिल्ट एन्क्रिप्शन फिचरसह येतात. हे फिचर एन्क्रिप्शन डेटाला अनरीडेबल बनवण्याची एक प्रोसेस आहे. डिक्रिप्शन, या व्यतिरिक्त हे एक्सेसेबल डेटाला अनरीडेबल डेटात बदलतो.
हेही वाचा: अँन्ड्रॉइड युजर्सला स्टोरेजी चिंता सतावतेय तर आता गुगलची ही सुविधा येईल कामी
-अँन्टीवायरस अॅप इंस्टॉल करा
तुमच्याकडून डाऊनलोड केल्या जाणाऱ्या फाइल्स किंवा आपल्या मोबाईल डिवाइसवर इंस्टॉल केल्या जाणाऱ्या अॅपमध्ये मॅलेशियस कोड असू शकतो. एकदा लॉन्च झाल्यानंतर हा कोड तुमचा डेटा हल्लेखोरांना पाठवू शकतो आणि त्यामुळे तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते.