सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाच्याच हातात आपल्या स्मार्टफोन दिसून येते. कारण स्मार्टफोन हा आता आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच झाला आहे. फोन हातात नसेल आपल्याला बैचैन वाटू लागते. परंतु आजही अशी काही माणसं आहेत ज्यांना फोनपासून दूर राहणेच उत्तम वाटते. अशातच एक व्यक्ती आहेत ज्यांनीच मोबाईलचा शोध लावला (Mobile phone inventor). त्यांचे नाव मार्टिन कूपर असे आहे. नुकत्याच एका मुलाखतीत कूपर यांनी ते स्वत: किती वेळ मोबाईलचा वापर करतात याचा खुलासा केला आहे.
मार्टिन कूपर हे ९३ वर्षांचे आहेत. पेशाने ते इंजिनिअर आहेत. मात्र नुकत्याच त्यांनी बीबीसी ब्रेकफास्टसोबत दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपणच मोबाईलचा शोध लावला आणि आता ते किती वेळ त्यासाठी देतात याबद्दल सांगितले. मार्टिन कूपर यांनी असे म्हटले की, दिवसभरातील फक्त ७२ मिनिटेच मी मोबाईलचा वापर करतो. यावर शो च्या होस्ट यांनी म्हटले की, त्या ५ तास वेळ हा मोबाईलसाठी देतात. यावर होस्टने कूपर यांनी तुम्ही अधिक वेळ मोबाईलवर असलेल्या लोकांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारला. तेव्हा कूपर यांनी म्हटले की, तुम्ही जे ५ तास मोबाईलवर फुकट घालवता तेव्हा तुम्ही खरंच मोबाईलचा वापर करता का? असे म्हणत ते हसले.
हे देखील वाचा- स्थापत्यकलेचा अद्भुत चमत्कार असणारं हे मंदिर बांधलं आहे एलिअन्सनी!
मोबाईल फोनचा आविष्कार करणारे मार्टिन कूपर यांनी लोकांना फोन वापरण्यासंदर्भात एक मोलाचा संदेश दिला आहे. त्यांनी असे म्हटले की, मोबाईलचा अत्यंत कमी वेळ वापर करा. कारण लोकांनी वर्च्युअल आयुष्य जगण्यापेक्षा प्रत्यक्षात जे आयुष्य आहे ते जगावे. त्याचसोबत जी लोक आता सुद्धा खुप वेळ मोबाईलचा वापर करतात त्यांनी ही तो कमी केला पाहिजे. मोबाईल फोन पेक्षा ही एक वेगळे जग तुमच्यासमोर आहे.(Mobile phone inventor)
दरम्यान, मोबाईच्या दुनियेत ७० वे दशक हे खुप क्रांतिकारक होते. त्यावेळी बहुतांशकरुन कारच्या बॅटरीने चालणारे फोन लावले जात होते. परंतु मार्टिन यांनी असा एक फोन मार्केटमध्ये आणला जो पोर्टेबल होता. त्याला तारेची आवश्यकता नव्हती. या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीला विविध क्रमांक दिले जाण्याची कल्पना सुद्धा मार्टिन कूपर यांचीच होती. त्याचसोबत सेल फोन टॉवरच्या माध्यमातून फोन चालवण्याची कंन्सेप्ट ही कूपर यांनी आणली होती.
मार्टिन कूपर यांनी तयार केलेला जगातील पहिला फोन हा आताच्या फोनपेक्षा खुप वेगळा होता. त्याची बॅटरी फक्त २५ मिनिटे चालायची. त्याचसोबत तो चार्ज करण्यासाठी त्याला १० तास लागायचे. पहिला फोन वजनाने ही अत्यंत जड होता. याचे वजन एक किलो तेरा ग्रॅम होते. याची लांबी १० इंच मोठी होती. मार्टिन यांना आता पंन्नास वर्षानंतर असे वाटते की, लोक मोबाईलच्या कारणास्तव आपले आयुष्य जगत नाही आहेत. त्यांच्या बहुतांश वेळ हा मोबाईलचवर जातो. त्यामुळेच त्यांनी आपल्या सर्वांना मोबाईलचा कमी वापर करण्याचा सल्ला दिला आहे.