Home » मिथुन चक्रवर्तींच्या एका खोटेपणामुळे ऋषी कपूर यांना गमवावा लागला असता जीव, वाचा किस्सा…

मिथुन चक्रवर्तींच्या एका खोटेपणामुळे ऋषी कपूर यांना गमवावा लागला असता जीव, वाचा किस्सा…

डेब्यू सिनेमात नॅशनल अवॉर्ड जिंकत बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाऱ्या मिथुन चक्रवर्ती करियरच नव्हे खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिले आहेत.

by Team Gajawaja
0 comment
Mithun Chakraborty Birthday
Share

Mithun Chakraborty Birthday : हिंदी सिनेमातील डांन्सिंग सेंसेशन मिथुन चक्रवर्ती आज (16 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. दीर्घकाळ रुपेरी पडद्यावर अधिराज्य करत प्रेक्षकांच्या मनात नेहमीच आपल्या कामाचा ठसा मिथुन चक्रवर्तींनी उमटवला आहे. मिथुन चक्रवर्तींना त्यांच्या पहिल्याच सिनेमासाठी नॅशनल अवॉर्डही मिळाला होता. अशातच मिथुन चक्रवर्तींच्या आयुष्यातील अनेस किस्से तुम्ही वाचले, ऐकले असतील. पण ऋषी कपूर यांच्यासोबतचा मिथुन चक्रवर्तींचा एक किस्सा अत्यंत खास आणि धक्कादायकही आहे. याबद्दलच जाणून घेऊया…

मिथुन चक्रवर्तींमुळे धोक्यात आले होते ऋषी कपूर
वर्ष 1978 मधील किस्सा आहे. सिनेमा फूल खिले हैं गुलशन गुलशनची शूटिंग सुरु होती. या सिनेमाचे दिग्दर्शक सिकंदर खन्ना होते. सिनेमात मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर, अशोक कुमार, मौसमी चॅटर्जी, मुकरी, असरानी , हेलेन आणि रंजीत अशी तगडी स्टारकास्ट होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमाचा एक सीन शूट करताना दिग्दर्शक सिकंदर खन्ना यांनी मिथुन यांना कार चालवता येते का असा प्रश्न विचारला. यावर मिथुन चक्रवर्तींनी काहीही विचार न करता कार चालवण्यासाठी होकार दिला. त्यांना असे वाटले की, नकार दिल्यास सिनेमा हातातून निसटेल. (Mithun Chakraborty Birthday)

सीनचे शूटिंग सुरु झाले असता मिथुन चक्रवर्तींना वेगाने कार चालवत ऋषी कपूर आमि मुकरी यांच्याजवळ जाऊन ती थांबवायची होती. जेणेकरुन दोघेही लवकर गाडीत बसतील. हे ऐकून मिथुन चक्रवर्ती घाबरले. त्यांना कळत नव्हते की, आपण आता खोटं बोललो आहे ते कसे लपवायचे. अशातच मिथुन चक्रवर्तींनी वेगाने कार चालवण्यास सुरुवात केली असता आणि ऋषी कपूर यांच्याजवळ आल्यानंतर त्यांचे तोंड बोनेटवर आदळले गेले. ऋषी कपूर यांच्या तोंडातून रक्त वाहू लागले. सुदैवाने ऋषी कपूर यांना अधिक दुखापत झाली नाही. जर गाडी वेळेवर थांबवली नसती तर ऋषी कपूर गंभीर जखमी होण्याची शक्यता होती.

दिग्दर्शकांनी मिथुन चक्रवर्तींना सुनावले
या घटनेनंतर मिथुन चक्रवर्ती खूप घाबरले गेले. त्यांनी ऋषी कपूर आणि दिग्दर्शक सिकंदर खन्ना यांची माफी मागितली. यानंतर कार चालवण्याचा अनुभव नसल्याचेही सांगितले. यावर दिग्दर्शकांनी मिथुन चक्रवर्तींना खूप सुनावले होते.


आणखी वाचा :
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चेमागचं लव्ह जिहाद कनेक्शन
5 तास 150 प्रश्न, घरावर गोळीबार झाल्यावेळी काय करत होता सलमान खान?

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.