तुमच्या करियरमध्ये तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल हे फार महत्वाचे असते. त्यामुळे विचार करुनच काही गोष्टी कराव्या लागतात. कारण तुमचा एक चुकीचा निर्णय हा तुमच्या करियरची वाट लावू शकतो. जेव्हा करियरबदद्दची गोष्ट येते तेव्हा लहान लहान गोष्टींकडे फार काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. तर होणाऱ्या चुकांमधून आपण शिकले पाहिजे. मात्र तुम्यच्या अशा काही चुकांचा तुमच्या करिवर फार मोठा प्रभाव पडतो. आपल्या प्रोफेशनल लाइफमध्ये अत्यंत जागृक असावे लागते. त्यामुळेच आम्ही तुम्हाला प्रोफेशनल लाइफमध्ये कोणत्या चुका करणे वेळीच टाळल्या पाहिजेत याबद्दल अधिक सांगणार आहोत.(Mistakes in professional life)
-पैसाच आपलं सर्वकाही असे मानू नका
तुम्ही किती ही श्रीमंत असाल, तुमच्याकडे बक्कळ पैसा ही असेल पण त्याच्या मागे पळू नका. अशी एक नोकरी शोधा किंवा व्यवसाय करा ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे आणि त्यासाठी ठरवलेले लक्ष्य तुम्ही पूर्ण कराल. तुम्हाला तुमच्या करियरमध्ये काय करायचे आहे, त्यावर ही लक्ष द्या. पैशांनाच आपली प्राथमिकता बनवू नका. कारण यामध्ये भावना नसतात.
हे देखील वाचा- ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे सर्व श्रेय दुसराच कोणी घेऊन जातोय? तर करा ‘हे’ काम
-स्वत: ला कमी लेखू नका
जेव्हा लोक तुम्हाला तुमच्याकडील कलाकौशल्यांबद्दल विचारतात तेव्हा मनमोकळेपणाने सांगा. कारण सर्व व्यक्तींमध्ये एकमेकांसारखे गुण नसतात. त्यामुळे आपल्याला जे काही येते त्यासाठी स्वत: ला कमी लेखू नका. कारण तुमच्या मधील वेगळेपण हिच खरी तुमची ओळख असते हे नेहमीच लक्षात ठेवा.(Mistakes in professional life)
-एकमेकांसोबत अधिक संपर्क वाढवण्याकडे दुर्लक्ष करु नका
प्रोफेशनल लाइफमध्ये तुमचे एकमेकांसोबतचे संबंध कसे आहेत हे फार महत्वाचे आहेच. पण तुमचे नेटवर्किंग ही किती मजबूत आहे ते सुद्धा तुमच्या करियरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. त्यामुळे एकमेकांसोबत अधिक संपर्क वाढवण्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण जर तुमचे नेटवर्क फार मोठे असेल तर एखाद्या कामात जरी अडथळा आला तर ती लोक तुम्हाला नक्कीच मदत करतील.
-काही गोष्टी स्वत:हून शिका
विविध कलाकौशल्ये शिकल्याने आपल्याकडे भरपूर संधी उपलब्ध होतात. परंतु प्रोफेशनल वर्ल्डमध्ये अशा प्रकारचा सल्ला दिला जात नाही.. येथे तुम्हाला तुमच्या आवडीच्या फिल्डमध्ये तरबेज व्हावे लागते तर काही गोष्टी तुम्हाला स्वत:हून शिकाव्या लागतात. याचा तुम्हाला करियरमध्ये कुठे ना कुठे तरी नक्कीच फायदा होईल. त्यामुळे नव्या गोष्टी शिकण्यापासून कधीच दूर राहू नका.