प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मान मिळावा असे ही वाटत असते. परंतु आपल्या वर्तवणूकीतून आपण कसे आहोत हे समोरचा व्यक्ती पारखतो. तर आचार्य चाणाक्य यांनी घर-परिवार आणि समाजात आपण कसे आयुष्य जगावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांनी केवळ परिवारच नव्हे तर कामाच्या ठिकाणी सुद्धा आपले वर्तवणूक कसे असावे हे सांगितले आहे. चाणाक्य असे म्हणतात की, व्यक्तीला आपल्या कर्मांवर जोर देत भविष्याचा मार्ग ठरवला पाहिजे. काम कमी आणि त्यापासून पळ काढणे अशा काही चुका या व्यक्तीच्या प्रोफेशनलच नव्हे तर खासगी आयुष्यात ही समस्या उद्भवू शकतात. परंतु जो व्यक्ती आपले काम आणि खासगी आयुष्य यामध्ये संतुलन राखतो त्यांना कठीण परिस्थितीवेळी कसे समोरे जायचे असते हे अचूक माहिती असते. त्यामुळे चाणाक्य नितीनुसार, तुम्ही कोणत्या चुका नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी करु नयेत याच बद्दल अधिक जाणून घेऊयात. (Mistakes in Office Life)
-कामाच्या प्रति गांभीर्य नसणे
चाणाक्य असे म्हणतात की, व्यक्ती कोणतेही कार्य करो किंवा मनापासून करो.परंतु त्या कामातून तुम्हाला समानाध मिळत नसेल तर वेळोवेळी समस्या उद्भवू शकतात. त्याचसोबत कामाच्या प्रति गंभीर नसल्याने आपल्यासोबत जोडली गेलेल्या माणसांचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हा धोक्यात पडू शकतो. आपल्या कामालाच आयुष्य मानावे, जेणेकरुन यामुळे आयुष्य सुरळीत जगण्यास मदत मिळते.
-दुसऱ्यांवर अंधविश्वास
चाणाक्य निती असे म्हणते की, जर तुम्ही नोकरदार असाल तर तुम्ही कधीच दुसऱ्यांवर अंधविश्वास ठेवू नये. कारण हाच अंधविश्वास तुम्हाला धोक्यात टाकू शकतो. हे खरं आहे की, तुम्ही ज्यांच्यासोबत काम करता त्यांच्यावर विश्वास ठेवा. परंतु अंधभक्त कधीच होऊ नका.(Mistakes in Office Life)
हे देखील वाचा- संविधानातील ‘या’ मुलभूत हक्कांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
-चालून आलेली संधी सोडणे
आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा ऐवढी वाढली आहे की, तुम्ही वेगळे काय करता हे दाखवण्याची गरज भासत आहे. अशातच तुमच्याकडे एखादी संधी चालून आली असेल आणि तुम्ही त्यासाठी नकार दिल्यास यामध्ये तुमचेच नुकसान होणार आहे. खरंतर नोकरी आणि व्यवसायात प्रत्येक संधीचा फायदा घेतला पाहिजे. मेहनतीने आपले उत्तम काम दाखवले पाहिजे. अशा प्रकारच्या संधी वेळोवेळी येत नाहीत हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे. आळसपणा हा तुम्हाला नोकरीत किंवा व्यवसायात फार मोठा फटका देऊ शकतो.