Mistakes in Diabetes : मधुमेहाची समस्या आजकाल झपाट्याने वाढत चालली आहे. भारतातील बहुतांश घरांमधील एका व्यक्तीला मधुमेह झालेला आढळतो. मधुमेहावर ठोस असे उपचार नाहीत. यामुळे औषधे आणि हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करुन मधुमेहावर नियंत्रण मिळवू शकता. ज्यावेळी आपले शरीर इंन्सुलिन्स हार्मोनची निर्मिती अथवा उपयोग व्यवस्थितीत करू शकत नाही तेव्हा समस्या उद्भवते.
मधुमेहाच्या रुग्णांनी आपले डाएट आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे असा सल्ला दिला जातो. बहुतांशजणांमा टाइप-2 मधुमेहाची समस्या उद्भवते. गोड खाण्याव्यतिरिक्त मधुमेह होण्यामागे काही कारणे असू शकतात. मधुमेह झाल्यानंतर तुम्ही काही खास गोष्टींचे पालन केल्यास नक्कीच आजाराचा अत्याधिक त्रास सहन करावा लागणार नाही. जाणून घेऊया कोणत्या कारणांमुळे मधुमेह होतो अथवा झाल्यानंतर वाढण्याचा धोका अधिक असतो याबद्दल सविस्तर…
पचनासंबंधित समस्यांकडे लक्ष न देणे
हेल्दी राहण्यासाठी पचनक्रिया व्यवस्थिती काम करणे महत्वाचे असते. खासकरुन, तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असल्यास तुम्ही खाल्लेले अन्नपदार्थ पचत आहेत की नाही याकडे लक्ष द्यावे. आजकाल पचनासंबंधित अनेक समस्या उद्भवत आहेत. घाईघाई खाणे, चुकीच्या वेळेस खाणे अशा काही गोष्टी शरिरात हार्मोनल इंबॅलेन्स निर्माण करू शकतात. यामुळे पचनक्रिया बिघडली जाते.
शुगर लेव्हल तपासून न पाहणे
काहीवेळेस शुगरची सर्वसामान्य लक्षणे म्हणजे तहान लागणे, लघवी सातत्याने होणे, भूक अथवा वजनमध्ये बदल होणे अशी असतात. याकडे काहीजण दुर्लक्ष करत रक्तातील शुगर तपासून पाहत नाही. वेळोवेळी रक्तातील शुगर पाहणे महत्वाचे आहे. काही महिन्यांमध्ये शुगरची चाचणीही करावी.
वजनाकडे लक्ष द्या
लठ्ठपणा मधुमेहाचे एक कारण असू शकते. तुमचे वजन वाढत असल्यास तर लगेच कंट्रोल करण्याचा प्रयत्न करावा. लठ्ठपणामुळे मधुमेहाचे शिकार होऊ शकते. योग्य डाएट आणि एक्सरसाइज देखील करावी. (Mistakes in Diabetes)
बॉडी डिटॉक्सकडेही लक्ष द्यावे
शरिरात घाण जमा झाल्यास मधुमेहासह काही आजार उद्भवण्याचा धोका वाढला जातो. अशातच बॉडी डिटॉक्स करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या शरिरात टॉक्सिन्स वाढत असल्यास त्याकडे वेळीच लक्ष द्या. डाएट आणि शरिराला डिटॉक्स करणाऱ्या गोष्टींचा समावेश तुमच्या दैनंदिन आयुष्यात करा.